Wedding Code of Conduct: लग्नातील आचारसंहितेची सुरुवात नेत्यांपासूनच व्हावी

Mahant Jangle Maharaj Shastri: ‘‘लग्नात होणारा अमाप खर्च, प्री-वेडिंगसारखे प्रकार, डिजे, थाटमाट यांसारखे प्रकार राजकीय नेत्यांपासून सुरू झाले. त्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे अनुकरण करण्यास सुरुवात केली. त्यामुळे देखावा करण्याचे हे फॅड गावखेड्यापर्यंत पोचले आहे.’’
Maratha Marriage Code of Conduct Conference
Maratha Marriage Code of Conduct ConferenceAgrowon
Published on
Updated on

Ahilyanagar News: ‘‘लग्नात होणारा अमाप खर्च, प्री-वेडिंगसारखे प्रकार, डिजे, थाटमाट यांसारखे प्रकार राजकीय नेत्यांपासून सुरू झाले. त्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे अनुकरण करण्यास सुरुवात केली. त्यामुळे देखावा करण्याचे हे फॅड गावखेड्यापर्यंत पोचले आहे,’’ असे रोखठोक मत डोंगरगण (ता. अहिल्यानगर) येथील महंत जंगले महाराज शास्त्री यांनी व्यक्त केले.

पुण्यातील वैष्णवी हगवणे हिच्या आत्महत्येनंतर व समाजातील महिलांवर होणाऱ्या अत्याचारासंदर्भात अहिल्यानगर शहरातील मराठा समाज बांधवांनी एकत्र येऊन आचारसंहिता तयार केली होती. या संदर्भात अहिल्यानगर येथे रविवारी (ता. ३) पहिले मराठा लग्न आचारसंहिता संमेलन झाले.

Maratha Marriage Code of Conduct Conference
Agriculture Scheme: नव्या विहीरींसाठी राज्य सरकारकडून मिळणार ४ लाख अनुदान; शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारची योजना

या वेळी अध्यक्षस्थानी महंत जंगले महाराज शास्त्री होते. देवगड संस्थानचे महंत भास्करगिरी महाराज, पद्‍मश्री पोपटराव पवार, माजी कुलगुरू सर्जेराव निमसे, आमदार संग्राम जगताप, माजी आमदार साहेबराव दरेकर, उद्योजक बी. एन. धुमाळ, प्राचार्य खासेराव शितोळे यांची प्रमुख उपस्थित होती.

श्री. जंगले शास्त्री महाराज म्हणाले, की अलीकडच्या काही वर्षापासून संस्कृती नष्ट करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्याला आपलेच लोक कारणीभूत आहेत. आपण कोणाला आदर्श मानून जगत आहोत याचा विचार करावा. लग्नसोहळ्यात अनाठायी वारेमाप खर्च करण्याची प्रथा पडली आहे.

Maratha Marriage Code of Conduct Conference
Sarpanch Reservation Maharashtra : पालघरला ४७ ग्रामपंचायतींचे सरपंचपद आरक्षण जाहीर

आता सामाजिक प्रतिष्ठेपायी प्रत्येकाला इतरांचे अनुकरण करावे वाटते. मात्र याची सुरुवात कोठून झाली? कोणी केली? याचा विचार करणे गरजेचे आहे. संकल्पना चांगली असून ज्या राजकीय लोकांपासून लग्नातील वारेमाप खर्चाला सुरुवात झाली. त्यांच्यापासून आचारसंहितेची सुरुवात करायला हवी.’’

प्रास्ताविक सुकाणू समितीचे प्रमुख समन्वयक एन. बी. धुमाळ यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. गणेश भगत यांनी केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com