Wheat  Agrowon
ॲग्रो गाईड

Wheat Farming : गव्हात आंतरमशागत, पाणी व्यवस्थापन कसे करावे?

भारी जमिनीतील गहू पिकाला १८ दिवसांच्या अंतराने ६ पाण्याच्या पाळ्या द्याव्यात.मध्यम जमिनीसाठी १५ दिवसांच्या अंतराने ७ पाळ्या द्याव्यात. हलक्या जमिनीस १० ते १२ दिवसांच्या अंतराने ८ ते १० पाळ्या द्याव्यात.

डाॅ. आदिनाथ ताकटे

डॉ. आदिनाथ ताकटे

भारी जमिनीतील गहू पिकाला (Wheat Crop) १८ दिवसांच्या अंतराने ६ पाण्याच्या (Wheat Water Management) पाळ्या द्याव्यात.मध्यम जमिनीसाठी १५ दिवसांच्या अंतराने ७ पाळ्या द्याव्यात. हलक्या जमिनीस १० ते १२ दिवसांच्या अंतराने ८ ते १० पाळ्या द्याव्यात. परंतु पीक वाढीच्या (Crop Growth) महत्त्वाच्या अवस्था आणि या अवस्थेत पाण्याचा ताण पडल्यास उत्पादनावर परिणाम होतो.

मुकुटमुळे फुटण्याच्या वेळी (पेरणीनंतर २१-२५ दिवसांनी) : या वेळी जमिनीत पाण्याची उपलब्धता कमी असल्यामुळे मुकुटमुळे कमी फुटतात. फुटलेल्या मुळ्या जास्त पसरत नाहीत.फुटवे कमी येतात.गहू काढणीस लवकर येतो.उत्पादनात घट येते.

फुटवे फुटण्याची अवस्था (पेरणी नंतर ५५-६० दिवसांनी) : ओंब्या कमी बाहेर पडतात. बाहेर पडलेल्या ओब्यांची लांबी कमी होते. पर्यायाने उत्पादनात घट येते.

पीक फुलोऱ्यास येणे (पेरणी नंतर ७०-८० दिवसांनी) : परागसिंचन कमी होऊन दाण्याची संख्या घटते. पर्यायाने उत्पादन घटते.

दाण्यात चीक भरण्याची वेळ (पेरणीनंतर ९०-१०० दिवसांनी) : या अवस्थेत दाणे पोसतात,त्यांचा आकार वाढतो.परंतु जमिनीत ओलावा कमी असल्यास दाण्याचा आकार लहान होतो, वजन कमी होते.

दाणे टणक होण्याची अवस्था (पेरणी नंतर ११० दिवसांनी) : या अवस्थेत जमिनीत ओलावा कमी असल्यास दाण्याचा आकार कमी होतो. दाण्यांवर सुरकुत्या पडून प्रत निकृष्ट होते. पर्यायाने उत्पादनात घट येते.

ज्या शेतकऱ्यांकडे मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध नाही अशा परिस्थितीत पाण्याचे योग्य नियोजन करणे अत्यंत गरजेचे आहे. पाणी अपुरे असल्यास व एक ते पाच पाण्याच्या पाळ्या देणे शक्य असल्यास पुढील प्रमाणे पाणी द्यावे.

एकाच पाणी देणे शक्य असल्यास ते पेरणीनंतर २१-२५ दिवसांनी द्यावे.

दोन पाणी देणे शक्य असल्यास पहिले पाणी पेरणीनंतर २१ ते २५ दिवसांनी व दुसरे ५५-६० दिवसांनी द्यावे.

तीन पाणी देणे शक्य असल्यास पहिले पाणी २१ ते २५ दिवसांनी, दुसरे ५५-६० दिवसांनी तर तिसरे ७०-८० दिवसांनी द्यावे.

चार पाणी देणे शक्य असल्यास पहिले पाणी २१ ते २५ दिवसांनी, दुसरे ५५-६० दिवसांनी, तर तिसरे ७०-८० दिवसांनी द्यावे. चौथे पाणी ९०-१०० दिवसांनी द्यावे.

पाच पाणी देणे शक्य असल्यास पहिले पाणी २१ ते २५ दिवसांनी, दुसरे ४०-४५ दिवसांनी, तर तिसरे ५५-६० दिवसांनी, चौथे पाणी ७०-८० दिवसांनी, तर पाचवे ९०-१०० दिवसांनी द्यावे.

आंतरमशागत

पेरणीनंतर २१-३० दिवसांनी एक खुरपणी आणि कोळपणी करून तणनियंत्रण करावे.

गव्हात चांदवेल, हराळी यांसारख्या तणांचा प्रादुर्भाव होतो. त्याकरिता जरुरी प्रमाणे एक किंवा दोन खुरपणी, तसेच कोळपणी करून जमीन मोकळी करावी. आंतरमशागती मुळे तणांचा नाश होतो व जमिनीत ओलावा टिकून राहण्यास मदत होते.

नत्राची मात्रा

बागायती वेळेवर पेरलेल्या गव्हास खुरपणी झाल्यानंतर (सर्वसाधारणपणे २१-३० दिवसांनी) प्रति हेक्टरी ६० किलो नत्र (१३० किलो युरिया), बागायती उशिरा पेरलेल्या गव्हास प्रति हेक्टरी ४० किलो नत्र (८७ किलो युरिया) द्यावा.

पीक ५५ ते ७० दिवसांचे असताना १९:१९:१९ या विद्राव्य खताची दोन टक्के या प्रमाणे दोन वेळा फवारणी करावी. (१० लिटर पाण्यात २०० ग्रॅम १९:१९:१९)

दाणे भरण्याच्या अवस्थेत दोन टक्के युरियाची फवारणी करावी. (१० लिटर पाण्यात २०० ग्रॅम युरिया)

- डॉ. आदिनाथ ताकटे, ९४०४०३२३८९

(महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Farmer Subcommittee: कांदा उत्पादकांच्या प्रश्नांसाठी उपसमिती; पंधरा दिवसांच अहवाल देण्याचे आदेश

Crop Damage: मे, जूनमध्ये पावसामुळे ५६ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान; कृषी विभागाची माहिती

Goras Bhandar Closure: गोरस भंडारावर कारवाई; दररोज होणाऱ्या ३ हजार ५०० लिटर दूध संकलनावर परिणाम

Offline Fertilizer Purchase: ...तोपर्यंत ऑफलाइन खत खरेदी सुरू ठेवा: शेतकरी संघटना

Banana Rate: खानदेशात केळी दर २९०० रुपयांवर

SCROLL FOR NEXT