Solar Energy  Agrowon
ॲग्रो गाईड

Solar Energy : अपारंपरिक ऊर्जास्रोतांमध्ये मोठी संधी

ऊर्जेच्या अपारंपरिक स्रोतांमध्ये सौर ऊर्जा, पाणी, वारा, समुद्र लाटा, बायोगॅस यांचा प्रामुख्याने समावेश होतो. यापासून निर्माण होणारी ऊर्जा ही निसर्गाचा समतोल ठेवण्यास उपयुक्त आहे. ग्रामीण भारताचा विचार केल्यास अपारंपरिक ऊर्जा हा स्वस्त व तांत्रिकदृष्ट्या योग्य पर्याय आहे.

Team Agrowon

डॉ.ए.जी.मोहोड

ऊर्जेच्या अपारंपरिक स्रोतांमध्ये सौर ऊर्जा, (Solar Energy) पाणी, वारा, समुद्र लाटा, बायोगॅस (Biogas) यांचा प्रामुख्याने समावेश होतो. यापासून निर्माण होणारी ऊर्जा (Energy) ही निसर्गाचा समतोल ठेवण्यास उपयुक्त आहे. ग्रामीण भारताचा विचार केल्यास अपारंपरिक ऊर्जा हा स्वस्त व तांत्रिकदृष्ट्या योग्य पर्याय आहे.

अ पारंपरिक ऊर्जा स्रोतांमध्ये मुख्यत्वे सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, बायोगॅस व कृषी अवशेषांपासून ऊर्जा, भरती - ओहोटी पासून उत्पन्न ऊर्जा, भू-औष्णिक ऊर्जा, हायड्रोजन वायूपासून ऊर्जा, विद्युत घट, उष्णतेचे विद्युत ऊर्जेत रूपांतर यांचा समावेश होतो. ग्रामीण भारताचा विचार केल्यास अपारंपरिक ऊर्जा हा स्वस्त व तांत्रिकदृष्ट्या योग्य पर्याय आहे. जेथे ऊर्जेची गरज कमी प्रमाणात व विकेंद्रित स्वरूपात असते तेथे अन्न शिजविण्यासाठी प्रकाश योजनेसाठी हाच पर्याय सुयोग्य आहे. या तंत्राने उत्पादित ऊर्जा अधिक स्वच्छ व पर्यावरणास योग्य अशी आहे. अशा या स्रोतांपासून तयार केलेल्या ऊर्जेला अपारंपरिक ऊर्जा व स्रोतांना अपारंपरिक स्रोत म्हणतो. दापोलीमधील कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या प्रक्षेत्रावर महाराष्ट्र ऊर्जा विकास प्राधिकरण यांच्या साह्याने भव्य ऊर्जा संकुल उभारण्यात आले असून त्यामध्ये अपारंपरिक ऊर्जा साधने ठेवण्यात आली आहेत.

सौर ऊर्जा ही अपारंपरिक ऊर्जा स्रोत मोठ्या प्रमाणात निसर्गात उपलब्ध आहे. भारताच्या विस्तीर्ण भूभागावर वर्षाच्या ३६५ दिवसांपैकी जवळपास २८० दिवस भरपूर सूर्यप्रकाश उपलब्ध असतो.

प्रत्येक चौरस मीटर जागेवर सुमारे १५ ते २० मेगा ज्यूल इतकी ऊर्जा दिवसभरात उपलब्ध होते.

दैनंदिन ऊर्जेची गरज भागविण्यासाठी सौरऊर्जेचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जाऊ शकतो.

सौरऊर्जा आधारित विविध साधनांचा विकास करण्यात आला आहे.

सौर उष्ण जल संयंत्र

सौरऊर्जेचा वापर उष्णतेच्या स्वरूपात करता येतो. गरम पाणी मिळविण्यासाठी सौर उष्णजल संयंत्राचा वापर केला जातो. घरगुती वापरासाठी प्रचलित असलेल्या गिझरच्या तुलनेत प्रचंड प्रमाणात ऊर्जेची बचत होते.

सौर उष्णजल संयंत्रामध्ये ६० ते ८० अंश सेल्सिअस तापमानापर्यंत पाणी गरम करता येते.

सौर उष्णजल संयंत्र घर, औद्योगिक क्षेत्र, हॉटेल्स, वसतिगृहे, रुग्णालये इत्यादींमध्ये बसविता येतात.

सौर वाळवणी सयंत्र (ड्रायर)

धान्य, फळे, भाजीपाला, औषधी वनस्पती, मसाला पिके इत्यादी पदार्थ सुरक्षितपणे साठवून ठेवण्यासाठी त्यातील आद्रता कमी करणे आवश्यक आहे.

पदार्थाची चव, रंग व गुणवत्ता कायम ठेऊन कमीत कमी वेळात पदार्थ सुकविण्यासाठी सौर ड्रायरचा उपयोग होतो. - धान्य हवाबंद व बंदिस्त संकलकामध्ये सुकविल्यामुळे पक्षी तसेच किड्यांपासून संरक्षण होते.

धान्य, भाजीपाला व फळे वेगाने सुकविल्यामुळे नुकसान कमी होते. पदार्थातील आद्रता कमी केल्यामुळे साठवणीच्या काळात पदार्थाला बुरशी लागण्याचे प्रमाण नगण्य असते.

या प्रक्रियेमध्ये कोणत्याही प्रकारची अतिरिक्त ऊर्जा वापरली जात नाही. सौर ड्रायरमध्ये धान्य सुकविल्यास धान्याचे कापणीपश्‍चात नुकसान कमी होते.

सौर शुद्ध जल संयंत्र

समुद्राच्या खाऱ्या किंवा मचूळ पाण्याचे तसेच अशुद्ध पाण्याचे गोड्या पाण्यात रूपांतर करण्यासाठी सौरऊर्जेचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होतो.

या यंत्रणेद्वारे तयार होणारे पाणी पिण्यासाठी तसेच मोटार उद्योग, लोकोमोटिव्ह स्टेशन, बॅटरी चार्जिंग स्टेशन, आरोग्य केंद्र, शासकीय मोटार कार्यशाळा, प्रयोगशाळा तसेच प्रक्रिया उद्योगामध्ये उपयोग होऊ शकतो.

सर्वसाधारण या संयत्रणेद्वारे १ चौरस मीटर चौकोनी डब्याच्या क्षेत्रफळामधून तीन ते साडेतीन लिटर प्रति दिन शुद्ध पाण्याचे उत्पादन होऊ शकते.

या प्रणालीमध्ये अशुद्ध पाण्याचे विशुद्ध जलामध्ये रूपांतर करण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या खर्चिक ऊर्जेची गरज भासत नाही. या संयंत्राद्धारे कोणत्याही गढूळ तसेच मचुळ पाण्याचे रूपांतर शुद्ध पाण्यामध्ये होते.

या प्रणालीमध्ये कोणताही गंजणारा भाग नसून वापरण्यास अत्यंत सोपे आहे. दुर्गम भाग, समुद्रकिनाऱ्यावर शुद्ध पिण्यायोग्य पाण्याच्या उत्पादनासाठी याचा मोठ्या प्रमाणावर वापर होऊ शकतो.

यापासून कोणतेही प्रदूषण होत नसून याद्वारे स्वयंरोजगाराच्या चांगल्या संधी आहेत.

सौर फोटोव्होल्टाइक साधने

सौरऊर्जेचे विद्युत ऊर्जेत रूपांतर करण्याच्या पद्धतीला सौर फोटोव्होल्टाइक ऊर्जा असे म्हणतात. अशा संचावर सूर्याची किरणे पडल्यास त्यापासून प्रत्यावर्ती वीज प्रवाह निर्माण होतो. त्यापासून बॅटरी विद्युत घट भारित करता येते. अशा विद्युत भारित झालेल्या बॅटरीद्वारे रात्री विजेची प्रत्यावर्ती उपकरणे चालविता येतात.तसेच कनव्हर्टरचा उपयोग करून अप्रत्यावर्ती उपकरणे चालविता येतात. फोटोव्होल्टाईक ऊर्जा ही खात्रीलायक आणि ग्रामीण व दुर्गम भागात जिथे पारंपारिक पद्धतीने विजेचा पुरवठा करणे खर्चिक आहे, अशा ठिकाणी उपयोगी आहे.

सौर फोटोव्होल्टाइक पंप

डोंगराळ भागात सुपारी, नारळ, काजू, आंबा, इत्यादी पिकांसाठी तसेच सामुदायिक पाणी पुरवठा योजनेसाठी नदी, नाले किंवा विहीर इत्यादी स्रोतापासून पाणीपुरवठा करण्यासाठी सौरऊर्जेचा वापर होऊ शकतो.

स्वच्छ सूर्यप्रकाश असताना ०.५ अश्‍वशक्ती सौर पंपामध्ये प्रति दिन २०,००० ते ३०,००० लिटर पाणी उपसण्याची क्षमता असते. त्यामुळे दुर्गम क्षेत्रात पिण्याच्या पाण्याचा सामूहिक पुरवठा करण्यासाठी तसेच कमी लाभ क्षेत्राच्या सिंचनासाठी या पंपाचा उपयोग होऊ शकतो.

सौर प्रत्यावर्ती पंप सकाळी ८.३० वाजल्यापासून ते संध्याकाळी ४.३० वाजेपर्यंत स्वच्छ सूर्यप्रकाश उपलब्ध असल्यास विनातक्रार कार्य करतात.

सौर पंपाद्वारे सूर्यप्रकाश उपलब्ध असताना उपसलेल्या व उंचावर साठविलेल्या पाण्याचा उपयोग शेतीच्या सिंचनासाठी होऊ शकतो. सौर पंपाचा उपयोग ठिबक सिंचन प्रणालीद्वारे शेती सिंचनासाठी होऊ शकतो.

सौर पंप उपयोगामध्ये नसताना सौर बॅटरी चार्जिंग प्रणालीद्वारे बॅटरी चार्जिंग करण्यासाठी उपयोग केला जाऊ शकतो. विद्युत भारित बॅटरीद्वारे कन्व्हर्टर वापरून विविध विद्युत उपकरणे घरगुती वापरासाठी उपयोगात येऊ शकतात.

सौर घरगुती दिवे

खंडीत वीजपुरवठ्याच्या काळामध्ये प्रकाशासाठी सौरऊर्जेचा मोठया प्रमाणावर वापर होऊ शकतो. सौर पॅनेलद्वारे तयार झालेली विद्युत ऊर्जा चार्ज कंट्रोल पॅनलद्वारे बॅटरीला पुरविली जाते.

कंट्रोल पॅनेलद्वारे विद्युत ऊर्जा लेड अ‍ॅसिड बॅटरीमध्ये साठवली जाते. बॅटरीचा उपयोग दिवसाच्या सूर्यप्रकाशापासून मिळवलेली विद्युत ऊर्जा साठविण्यासाठी आणि रात्री प्रकाश दिवे लावण्यासाठी होतो.

सौर घरगुती दिव्यांची रचना घरातील ट्यूबप्रमाणे भिंतीवर लावण्यासाठी केलेली असते. या प्रणालीमध्ये एकूण दिव्यांच्या गरजेप्रमाणे १२ व्होल्ट आणि २०, ३०, ७५ वॉटची सौर पॅनलची आवश्यकता असते. दिव्यांची संख्या २,४ किंवा ६ अशा प्रकारे ठेवली जाते.

सौर कंदील

सौर कंदील हा फोटोव्होल्टाइक फलक, दिवा, बॅटरी, यापासून बनविला जातो. तो वजनाला हलका असल्याने सहज वाहून नेता येतो.

सौर कंदील ५/७ वॅट क्षमतेमध्ये उपलब्ध आहेत. पूर्ण भारित सौर कंदील ३ ते ४ तासांपर्यंत वापरता येतो.

सौर फवारणी यंत्र

सौर फवारणी संयंत्राचे मुख्य घटक म्हणजे फोटोव्होइटाइक फलक फवारणी यंत्र, प्रत्यावर्ती पंप आणि कीटकनाशक मिश्रण ठेवण्याचे भांडे.

सौर फवारणी संयंत्राचा उपयोग शेतात पिकांवर कीडनाशक फवारण्यासाठी करण्यात येतो. या संयंत्रामध्ये कोणत्याही प्रकारची इतर पारंपरिक ऊर्जा लागत नाही, तसेच हे वाहतूक आणि वापरण्यास सोपे आहे.

सौर कुंपण

ग्रामीण व दुर्गम भागात जनावरांपासून पिकांचे रक्षण करण्यासाठी सौर कुंपण अत्यंत उपयोगी आहे. अशा उपकरणांपासून जनावराला उच्च दाबाचा विजेचा झटका बसतो, त्यामुळे ते नेहमी लांब राहातात. अशा झटक्यांनी प्राणहानी होत नाही.

सौर कुंपणाची किंमत एकूण लांबीवर आधारित असते. सौर कुंपणामुळे शेतीच्या संरक्षणखर्चात कपात होते.

- डॉ.अतुल मोहोड, ९४२२५४६९०५

(विभागप्रमुख,अपारंपरिक ऊर्जा विभाग, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ,दापोली, जि. रत्नागिरी)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Vidhansabha 2024 Live Result : राज्यातील पहिला निकाल जाहीर; वडाळा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार कोळंबकर विजयी

Satara Assembly Election 2024 : साताऱ्यातील जनतेचा महायुतीकडे कल, सर्वच मतदारसंघात भाजप महायुतीची आघाडी

Maharashtra Vidhan Sabha Result 2024 : आदिती तटकरेंचा विजय निश्चित; कोकणातील पहिला निकाल स्पष्ट

Eknath Shinde On Maharashtra Assembly Election 2024 : लाडकी बहीण, लाडके भाऊ, लाडके शेतकरी यांच्यामुळे आमचा विजय, एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया

Poultry Processing Product : अबब! कडकनाथच्या अंड्यांपासून एवढी उत्पादने?

SCROLL FOR NEXT