Soil Health : जमिनीचा पोत सुधारण्यासाठी जिवाणूसंवर्धनाचा वापर केला जातो. जिवाणू संवर्धने जमिनीत आढळणाऱ्या उपयुक्त जीवाणू पासून तयार केलेली असतात. जिवाणू संवर्धन स्वस्त किमतीत उपलब्ध होत असल्याने सर्वच शेतकऱ्यांना परवडण्यासारखी आहेत. पण काही वेळा जिवाणू संवर्धनाचा अपेक्षित परिणाम मिळत नाही.
रासायनिक खतांचा वाढलेल्या किंमती, बाजारपेठेत होत असलेली त्यांची कमतरता लक्षात घेता अपेक्षित उत्पादन वाढवण्यासाठी जीवाणू संवर्धनाचा वापर करणं फायद्याचं आहे. जीवाणू संवर्धनापैकी ऍझोटोबॅक्टर, अॅझोस्पीरिलियम, निळे - हिरवे शेवाळ आणि अॅझोला पिकाला नत्र पुरवतात. बॅसिलस मेगॅटेरियम जिवाणू स्फुरदाची उपलब्धता वाढवितात. तर मायकोरायझा सारखे जिवाणू पिकाला स्फुरद, पालाश, नत्र, कॅल्शियम, सोडियम, जस्त, तांबे यासारखे अन्नद्रव्य जमिनीतून शोषण करण्यास मदत करतात. यापैकी अझॅटोबॅक्टर आणि रायझोबियम ही संवर्धने प्रचलित झाली आहेत आणि इतर जिवाणू संवर्धकाचा जास्त प्रमाणात वापर होत नाही. काही वेळेस मातीमध्ये अगोदरच असलेल्या इतर जिवाणूमुळे जिवाणू खताचा पिकावर अपेक्षित परिणाम दिसून येत नाही. यामध्ये
जमिनीत इतर अन्नद्रव्याची कमतरता असणं, जमिनीत उपलब्ध नत्र खताचा साठा जास्त असणं याशिवाय वापरलेले जिवाणू खत निकृष्ट दर्जाचे असल्यासही जिवाणू संवर्धनाचा अपेक्षित परिणाम मिळत नाही.
शिफारशीपेक्षा जिवाणू खताचा वापर कमी केल्यास, बियांमध्ये विषारी पदार्थ असल्यामुळे, जिवाणू खतात इतर जिवाणूंची भेसळ असल्यास जिवाणू संवर्धनाचा चांगला पिरणाम होत नाही. तसच जमिनीचा अयोग्य सामू, जमिनीचे जास्त तापमान, जमिनीतील अपुरा ओलावा या बाबीही जिवाणू संवर्धानाचा परिणाम कमी होण्यास कारणीभूत ठरतात.
जमिनीतील सेंद्रिय कर्ब आणि सेंद्रिय पदार्थांच्या कमतरतेमुळेही जिवाणू खतांचे अपेक्षित परिणाम दिसून येत नाहीत. त्यामुळे जिवाणू संवर्धानाचा वापर करताना वरिल गोष्टी तपासाव्यात त्यामुळे जिवाणूसंवर्धनाचा अपेक्षित परिणाम होऊन उत्पादनात वाढ करणे शक्य होईल.
---------------
माहिती आणि संशोधन - वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.