
Plant nutrition : उत्पादनवाढी साठी आपण जी खते पिकाला देत असतो ती खते पिकांकडून पूर्णपणे शोषली जात नाहीत. पिके त्यातील काही अंशच शोषून घेतात. उरलेली खते पाणी, हवा आणि तापमानामुळे वाया जातात. पिकाला दिलेली खतेलागू होण्यासाठी ती योग्य प्रकारे दिली गेली पाहिजेत त्यासाठी कोणते उपाय करायचे याविषयीची माहिती घेऊया.
पिकाला दिलेल्या एकूण खताच्या प्रमाणापैकी जो काही अंश पिके शोषण करतात आणि त्यामुळे जी उत्पादनात वाढ होते, त्याला ‘खत वापराची कार्यक्षमता’ म्हणतात. माती परीक्षणाच्या आधारावर पिकांना द्यायची खतमात्रा ठरवावी लागते. त्यामुळे पिकाला गरजेइतक्याच खतांचा पुरवठा केला जातो. संतुलित खत वापरामुळे उत्पन्नात वाढ होते. जमिनीचे आरोग्य चांगले राहते. पिकांना रासायनिक खतांद्वारे विविध पोषक अन्नद्रव्यांचा म्हणजेच नत्र, स्फुरद, पालाश , सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त खतांचा पुरवठा केला जातो.
खतांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी उपाय
सुरुवातीला खते देताना जमिनीत नेहमी पुरेसा ओलावा असतानाच खते द्यावीत. पिकाला माती परीक्षण करुनच शिफारशींनुसार खते देण्याच नियोजन करावं. कारण माती परिक्षणामुळे आपल्या जमिनीत कोणत्या अन्नद्रव्याची कमरता आहे याची माहिती कळते. काही शेतकरी पिकाला खते फेकून देतात. पण खते फेकून दिल्यामुळे ती मोठ्या प्रामाणात वाया जातात. त्यासाठी पेरणी करताना खते बियाण्याखाली पेरून द्यावीत.
खताचे डोस विभागून देताना ती मुळांच्या सान्निध्यात द्यावीत त्यामुळे खते वाया न जाता ती पिकाला लागू पडतील. खतांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी बाजारात आवरण असलेली खते/ब्रिकेट्स/सुपर ग्रॅन्युलस उपलब्ध आहेत. त्यांचा वापर करावा. पिकाला युरिया देताना तो निंबोळी पेंडीसोबत १ः५ या प्रमाणात द्यावा त्यामुळे युरिया वाया जाणार नाही. पिकांच्या वाढीच्या संवेदनशील अवस्थेत खते विभागून द्यावीत. द्रवरुप जी खते आहेत त्याचा वापर ठिबक सिंचनाने करावा. पाण्याचा जास्त वापर करण टाळावं त्यामुळे खते पाण्यासोबत वाहून जातात.
तृणधान्य पिकांसाठी नत्र, स्फुरद, पालाश आणि गंधक या खतांचा वापर ४:२:२:४ या प्रमाणात, तर कडधान्यासाठी १:२:१:१ या प्रमाणात वापर करावा. सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर हा फवारणीद्वारे करावा. पिकाच्या काढणीनंतर उरलेले अवशेष न जाळता शेतातच कुजतील यासाठी उपाय करावेत. याशिवाय जमिनीची सुपिकता वाढविण्यासाठी हिरवळीची खते, शेणखत, कंपोस्ट खतांचा वापर करणंही गरजेच आहे. त्यामुळे खते रासायनिक खते लागू पडण्यास मदत होते. सेंद्रिय खतांचा नियमित वापर केल्यास जमिनीचा सामू ६.५ ते ७.५ दरम्यान येण्यास मदत होते.
रायझोबियम, पीएसबी, ॲझोटोबॅक्टर यासारखी जिवाणू खतेही वापरावीत जमीन जर क्षारयुक्त किंवा चोपण झाली असेल तर अशा जमिनी सुधारण्यासाठी भूसुधारक खतांचा वापर केला जातो. यामध्ये जिप्सम, सेंद्रिय खते, पेंडीची खते, प्रेसमड, उसाची मळी यासारख्या खतांचा वापर केला जातो. चुनखडीविरहित जमिनीमध्ये जिप्समचा वापर करावा. शेतात मृदा आणि व जलसंधारणाच्या उपाययोजना कराव्यात.त्यामुळे जमिनीवरून वाहून जाणारे पाणी ठिकठिकाणी थोपविले जाऊन पाणी मुरण्याची क्रिया वाढून ओलावा साठविण्यास मदत होते. अशा प्रकारे आपण दिलेल्या खतांचा योग्य वापर होऊन खते वाया जाणार नाहीत.
--------
माहिती आणि संशोधन - वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.