Ratnagiri News : प्रतिकूल हवामान आणि अवकाळी पावसामुळे यावर्षी आंबा आणि काजू बागायतदारांना चांगलाच फटका बसला आहे. अडीच महिने झाले तरीही ३६ हजार ४६८ बागायतदारांना विमा परताव्याची रक्कम मिळालेली नाही. यंदा मेच्या अखेरीस पडलेल्या मुसळधार पावसाने शेवटच्या टप्प्यातील उत्पादनावर पाणी फिरले गेले. या परिस्थितीत नुकसान भरपाई सोडाच विमा परतावाही दिला न गेल्याने बागायतदारांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. .नैसर्गिक आपत्तीत दिलासा मिळावा म्हणून आंबा आणि काजू बागायतदारांसाठी केंद्र शासनाने विमा योजना लागू केली आहे. त्याचा फायदा गेल्या काही वर्षांत रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना मिळाला आहे. यंदा जिल्ह्यातील ३६ हजार ४६८ बागायतदारांनी विमा योजनेत सहभाग घेतला आहे. .Crop Insurance: अमरावती जिल्ह्यात केवळ २३ टक्के क्षेत्र विमासंरक्षित.त्यात ३० हजार १३५ आंबा बागायतादारांनी १४ हजार ३८८ हेक्टरवरील तर, ६ हजार ३३३ बागायतदारांनी काजूचा ३ हजार ६३६ हेक्टर क्षेत्राचा विमा उतरवला आहे. जिल्ह्यातील १८ हजार ०३४ हेक्टर क्षेत्राला विमा संरक्षण मिळाले आहे.आंबा पिकाला यावर्षी हंगामाच्या सुरुवातीपासून प्रतिकूल वातावरणाचा सामना करावा लागला. अवकाळी पाऊस, त्यानंतर पडलेली कडाक्याची थंडी आणि अति उष्मा या साऱ्या प्रतिकूल स्थितीमुळे यंदा आंब्याचे उत्पादन कमालीचे घटले आहे. .सतत कमी-जास्त राहिलेल्या दरामुळे आंबा बागायतदारांचे कंबरडे मोडले आहे. त्यानंतर हंगामाच्या शेवटी मेमध्ये झालेल्या वादळी पावसाने उरल्या-सुरल्या आशांवरही पाणी पडले गेले. आंबा बागायतदार आर्थिकदृष्ट्या हवालदिल झाले आहेत. .Crop Insurance : विमा कंपनीला मिळाले शेतकऱ्यांपेक्षा अधिक पैसे.दुसऱ्या बाजूला काजूचीही तशीच स्थिती आहे. काजूला प्रतिकूल वातावरण, अवकाळी पाऊस या संकटांसह विविध किडींचा प्रादुर्भाव झाला होता. काजूचे उत्पादन यंदा मोठ्या प्रमाणात घटले. या प्रतिकूल स्थितीत बागायदारांना विमा परताव्याचा मोठा आधार आहे. अडीच महिन्यांचा कालावधी उलटला तरीही विमा परतव्याची रक्कम बागायदारांना मिळालेली नाही..या वर्षीच्या प्रतिकूल हवामानाचा आंबा बागायतदारांना चांगलाच फटका बसला. या नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण मिळावे म्हणून बागायतदारांनी विमा उतरविला होता. मात्र, त्याचा शासनाकडून अद्याप परतावा मिळालेला नाही. नेमका विमा परतवा मिळणार कधी?- ओंकार प्रभूदेसाई, आंबा बागायतदार.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.