Crop Management Agrowon
ॲग्रो गाईड

Monsoon Crop Management : पावसाच्या आगमनानूसार पीक नियोजन कसे करावे?

Kharif Crop : पावसाच्या आगमनानुसार योग्य पीक पद्धतीचे नियोजन केल्यास उत्पादनामध्ये स्थिरता येऊ शकते.

Team Agrowon

Kharif Season : मराठवाड्यातील शेती प्रामुख्याने कोरडवाहू पद्धतीने केली जाते. त्यामुळे पिकाची उत्पादन क्षमता पुर्णपणे पावसावर अवलंबून असते. अशा परिस्थितीत पावसाच्या आगमनानुसार योग्य पीक पद्धतीचे नियोजन (Crop Pattern) केल्यास उत्पादनामध्ये स्थिरता येऊ शकते.

काही वेळा पावसाचे आगमन लवकर आणि निर्गमन उशीरा होतं. तर काही वेळा पावसाच आगमन व निर्गमन वेळेवर होत परंतू पीक कालावधीमध्ये पावसात दीर्घ कालावधीचा खंड पडतो. याशिवाय पावसाची संततधार व अतिवृष्टीमुळेही पिकावर परिणाम होतो.

अशावेळेस पिकांच्या नियोजनात बदल करणे निश्चित उत्पादनाच्या दृष्टीने हिताचे व उपयुक्त ठरते. पावसाचे आगमन आणि निर्गमनाच्या परिस्थितीनुसार पिकांचे नियोजन कसं करावं याविषयीची माहिती पाहुया.  

१५ जून ते ७ जुलै या कालवधीत पावसाचे आगमन झाल्यास सर्व खरीप पिके घेता येतात. 

पावसाचे आगमन जर ८ जुलै ते १५ जुलै या कालवधीत झाले तर कापूस, संकरित ज्वारी, संकरित बाजरी, सोयाबीन, तुर, तीळ, सुर्यफूल ही पिके घ्यावीत तर भुईमूग, मूग, उडीद ही पिके घेऊ नयेत. 

१६ जुलै ते ३१ जुलै या काळात पावसाला सुरुवात झाल्यास संकरीत बाजरी, सुर्यफुल, तुर व सोयाबीन, बाजरी व तुर, एरंडी व धने, एरंडी व तुर ही पिके घ्यावीत तर  कापूस, संकरित ज्वारी, भुईमूग ही पिके घेऊ नयेत. 

१ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट

कोणती पिके घ्यावीत - एरंडी व तीळ, सं. बाजरी, रागी, सुर्यफूल, तूर, एरंडी व धने, एरंडी व तूर, एरंडी व धने (अपरिहार्य परिस्थितीत)

कोणती पिके घेऊ नये - कापूस, सं.ज्वारी, भुईमूग

१६ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट

कोणती पिके घ्यावीत - सं.बाजरी, सुर्यफूल, तुर, एरंडी व धने, एरंडी व तूर आणि धने

कोणती पिके घेऊ नये - कापूस, सं.ज्वारी, भुईमूग, रागी व  तिळ

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : मक्याच्या बाजारात चढ उतार; कापूस, सोयाबीन, ज्वारी तसेच काय आहेत आजचे मका दर ?

Rain Update : 'डाना' चक्रीवादळाचा जमिनीवरील प्रवास सुरू; राज्यात रविवारपासून पाऊस? 

Fodder Production : चारा उत्पादन कमी; पावसाने दर्जा खालावला

Agriculture Work : पावसाने उघडीप दिल्याने शेतीकामांनी घेतला वेग

Shaktipeeth Mahamarg : शक्तीपीठ महामार्गावरून सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांच्यात जुंपली

SCROLL FOR NEXT