Urea Use  Agrowon
ॲग्रो गाईड

Urea Use : युरियाचा अवाजवी वापर कसा टाळायचा ?

युरिया खतामुळे पिकांना नत्राची मात्रा तत्काळ लागू पडते. पिकाची वाढ जोमाने होते. पिकांना हिरवा गडद मिळतो. इतर नत्रयुक्त खतांच्या तुलनेत युरियाची किंमत ही कमी असते. या सर्व कारणांमुळे नत्रयुक्त रासायनिक खतामध्ये युरियाचा वापर सर्वाधिक होतो.

Team Agrowon

युरिया खतामुळे (Urea Fertilizer) पिकांना नत्राची मात्रा तत्काळ लागू पडते. पिकाची वाढ जोमाने होते. पिकांना हिरवा गडद मिळतो. इतर नत्रयुक्त खतांच्या तुलनेत युरियाची किंमत ही कमी असते. या सर्व कारणांमुळे  नत्रयुक्त रासायनिक खतामध्ये युरियाचा वापर सर्वाधिक होतो.

युरिया हे कृत्रिम सेंद्रिय नत्रयुक्त खत आहे. यामध्ये ४६ टक्के अमाइड नत्र असत. खत पाण्यात पूर्णपणे विरघळणारे असत. याशिवाय युरिया ची मात्रा पिकाला विभागून देतात. त्यामुळे युरिया ला अधिक पसंती दिली जाते. मात्र अलीकडे युरिया चा वारेमाप वापर होऊ लागलाय त्यामुळे जमिनीची सुपीकता कमी होऊ लागली आहे. याशिवाय पिकांची फक्त शाकीय वाढ होण, रोग, किडीचा वाढता प्रादुर्भाव आणि उत्पादनात घट होत आहे. त्यामुळे युरिया चा काटेकोर वापर करण्याची गरज आहे. युरिया काटेकोर वापर कसा करायचा याविषय़ीची माहिती पाहुया.  म्हणजे काय 

युरियाचा अवाजवी वापर टाळण्यासाठी खते देण्यापूर्वी माती परीक्षण करावे आणि मिळालेल्या अहवालानुसार खते द्यावीत.

नत्रयुक्त खतांचा सेंद्रिय खतांबरोबर वापर करावा. याशिवाय हिरवळीच्या खतांचाही वापर करावा.

नत्रयुक्त खते पेरणीच्या वेळी फेकून न देता, दोन चाड्याच्या पाभरीने पेरून द्यावीत.

कालावधी कमी असल्याने नत्र खताची मात्रा विभागून द्यावी.

एक किलो नत्र देण्यासाठी २.१७ किलो युरिया द्यावा.

युरियाचा वापर कमी करण्यासाठी तृणधान्य पिकांना ॲझोटोबॅक्टर किंवा ॲसिटोबॅक्टर जिवाणू संवर्धक आणि द्विदल पिकांना रायझोबियम या जिवाणू संवर्धकाची पेरणीपूर्वी प्रक्रिया करावी. जिवाणू खताच्या वापरामुळे तृणधान्य, द्विदल पिके व भाजीपाला पिकांमध्ये १५ ते २० टक्के नत्राची बचत होते. उसामध्ये ५० टक्क्यांपर्यंत बचत होते.

भातामध्ये युरिया- डीएपी ब्रिकेटचा वापर करावा.

पाणथळ जमिनीत प्रामुख्याने अमोनियाधारक नत्रयुक्त खतांचा वापर करावा.

कोरडवाहू शेतीमध्ये नत्रयुक्त खते पेरणीच्या वेळेस पेरून द्यावीत.

ऊस, केळी, बीटी कापूस यांसारख्या दीर्घ मुदतीच्या पिकांना युरिया खताची मात्रा विभागून द्यावी.

नायट्रेटयुक्त खते वाहून जाऊ नयेत म्हणून नियंत्रित आणि हलकी ओलिताची पाळी द्यावी. चोपणयुक्त जमिनीत युरिया हे शेणखत, कंपोस्ट खत किंवा गांडूळ खताबरोबरच द्याव. युरिया खताची मात्रा २५ टक्क्यांनी वाढवून द्यावी.

राज्यातील ५२ टक्के जमिनीत गंधकाचे प्रमाण कमी आहे.अशा जमिनीत युरियाला पर्यायी अमोनिअम सल्फेटचा वापर केल्यावर पिकांना नत्राबरोबर गंधक हे अतिरिक्त अन्नद्रव्य मिळून त्याचे चांगले परिणाम दिसतात.

युरिया फेकून किंवा पेरून देण्यापेक्षा पाण्यात मिसळून फवारणीद्वारे दिला तर अत्यंत कमी खतामध्ये चांगले परिणाम दिसतात.

युरियाला पर्याय म्हणून काही नत्रयुक्त विद्राव्य खते बाजारात उपलब्ध आहे. देशात उत्पादित होणारा आणि आयातीत युरिया सर्व उत्पादक व पुरवठादार यांना नीम कोटिंग करूनच पुरवठा व विक्री करणे बंधनकारक आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

livestock Vaccination: पशुवैद्यक महाविद्यालयातर्फे इटलापूर येथे पशुधनाचे लसीकरण

Mahareshim Abhiyan: हिंगोलीत महारेशीम अभियानात १२० शेतकऱ्यांची नोंदणी

Watermelon Disease Control: अवकाळीनंतर कलिंगडावर रोगांचा धोका! कसे करावे नियंत्रण?

Sugarcane Production Drops: ऊस पिकाच्या उत्पादनात मोठी घट

Krushi Kumbh Exhibition: ‘कृषी कुंभ’ प्रदर्शनाचे आयोजन नेटके,मात्र शासकीय यंत्रणांची उदासीनता

SCROLL FOR NEXT