Soil Health  Agrowon
ॲग्रो गाईड

Soil Health : एक टन शेणखतामध्ये किती अन्नद्रव्ये असतात?

जमिनीत अन्नद्रव्यांचे प्रमाण योग्य ठेवण्यासाठी विविध एकात्मिक खतांचा संतुलित वापर करणे आवश्यक आहे. मात्र आजकाल केवल रासायनिक खतांचा वापर होताना दिसतो.

Team Agrowon

वर्षानुवर्ष जमिनीत घेत असलेल्या पिकांमुळे आणि अधिक उत्पादन देणाऱ्या पिकांच्या नवीन वाणांमुळे जमिनीतील अन्नद्रव्यांचा साठा दिवसेंदिवस कमी होत आहे. जमिनीत अन्नद्रव्यांचे (Soil Nutrients) प्रमाण योग्य ठेवण्यासाठी विविध एकात्मिक खतांचा संतुलित वापर करणे आवश्यक आहे. मात्र आजकाल केवल रासायनिक खतांचा वापर होताना दिसतो.

रासायनिक खताच्या अनियंत्रित वापरामुळे जमिनी नापीक होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे कृषी तज्ञांकडून सेंद्रिय खतांचा वापर करण्याचा सल्ला दिला जातो. सेंद्रिय खतामध्ये विविध खतांचा समावेश होतो.

वनस्पती आणि प्राणी यांच्या अवशेषापासून सेंद्रिय खते मिळतात सेंद्रिय खतांचे प्रमुख दोन प्रकार आहेत. ते म्हणजे भरखते आणि जोरखते.

भरखते

यामध्ये पोषणद्रव्यांचे प्रमाण कमी असल्याने भरखते रासायनिक खतांपेक्षा मोठ्या प्रमाणात वापरावी लागतात. हे खते पिकांना सावकाशपणे लागू पडतात. भरखते वापरल्याने जमिनीच्या प्राकृतिक गुणधर्मात सुधारणा होते त्यामुळे जमिनीची घडण सुधारते. जलधारण शक्ती वाढते व रासायनिक खतांचा कार्यक्षम वापर होण्यास मदत होते. याशिवाय जमिनीचे आरोग्य सुधारते. यामध्ये शेणखत, गांडूळखत, कंपोस्ट खत यासारख्या खतांचा समावेश होतो.

जोरखते

यामध्ये पोषणद्रव्याचे प्रमाण भरखतांपेक्षा अधिक असते. त्यामुळे ही खते कमी प्रमाणात द्यावी लागतात. उदा. सर्व प्रकारच्या पेंडी, हाडांचा चुरा, मासळी खत इत्यादी.

हिरवळीची खते

हिरवळीच्या खतासाठी ताग, शेवरी, चवळी, गवार किंवा धैंचा ही पिके घ्यावीत. पेरणीनंतर एक ते दीड महिन्यांनी जमिनीत गाडावीत. गिरीपुष्प व सुबाभूळ यांचा कोवळा पाला सुद्धा हिरवळीच्या खतासाठी वापरवा. हिरवळीच्या खातापासून हेक्टरी ६० ते ९० किलो नत्र मिळतं. जिरायती किंवा कोरडवाहू क्षेत्रात पाच टन प्रती हेक्टर आणि बागायत क्षेत्रात दहा टन प्रती हेक्टर सेंद्रिय खते द्यावीत.

एक टन शेणखतापासून मिळणारे अन्नद्रव्ये

नत्र ५.६ किलो

स्फुरद ३.५ किलो

पालाश ७.८किलो

गंधक १ किलो

मंगल २०० ग्रॅम

जस्त ९६ ग्रॅम

लोह ८० ग्रॅम

तांबे १५.६ ग्रॅम

बोरॉन २० ग्रॅम

मॉलीब्डेनम २.३ ग्रॅम

कोबाल्ट १ ग्रॅम

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cabbage Farming: कोबी पिकात आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब

Brazil Agricultural Cooperation: ब्राझीलसोबत कृषी क्षेत्रामध्ये सहकार्य संधी

Onion MSP Demand: कांद्याला तातडीने प्रतिक्विंटल २ हजार हमीभाव, १,५०० रुपये अनुदान देण्याची मागणी

Akola Heatwave: अकोला जिल्ह्यात अति उष्णतेमुळे होरपळ

Mini kit Seeds Application: मिनीकिट बियाण्यांसाठी अर्जाचा आज शेवटचा दिवस

SCROLL FOR NEXT