Rabbi Jowar Agrowon
ॲग्रो गाईड

Rabbi Jowar : रब्बी ज्वारीतील ओल कशी टीकवाल?

रब्बी ज्वारी हे राज्यातील महत्त्वाचे अन्नधान्य पीक असून, बहुतांश लागवड ही पर्जन्यधारित असते. ओलिताची सोयी कमी असलेल्या भागामध्ये जिरायती पद्धतीने ज्वारी घेतली जाते.

Team Agrowon

रब्बी ज्वारी (Rabbi Jowar) हे राज्यातील महत्त्वाचे अन्नधान्य पीक असून, बहुतांश लागवड ही पर्जन्यधारित असते. ओलिताची सोयी कमी असलेल्या भागामध्ये जिरायती पद्धतीने ज्वारी घेतली जाते.

पिकाच्या सुरुवातीच्या ३५ ते ४० दिवसांत तण व पिकामध्ये जमिनीतून अन्नद्रव्य शोषणासाठी तीव्र स्पर्धा होते. त्यामुळे सुरुवातीच्या ३५ ते ४० दिवसांत पीक तणविरहित ठेवावे.

त्यासाठी आवश्‍यकतेनुसार १ ते २ वेळा निंदणी आणि तीन वेळा कोळपणी (Hoeing) करावी. पहिली कोळपणी पेरणीनंतर ३ आठवड्यांनी फटीच्या कोळप्याने, तर दुसरी कोळपणी ५ आठवड्यांनी पासेच्या कोळप्याने करावी.

तिसरी कोळपणी ८ आठवड्यांनी दातेरी कोळप्याने करावी. शेवटच्या कोळपणीवेळी कोळप्याला दोरी बांधल्यास पिकाच्या मुळांना मातीची भर दिली जाते. तसेच शेतात सऱ्या पडून, पावसाचे पाणी धरून ठेवण्यास मदत होते.

संरक्षित पाणी ः कोरडवाहू रब्बी ज्वारीस संरक्षित पाणी उपलब्ध असल्यास पीक गर्भावस्थेत असताना पेरणीनंतर २८ ते ३० दिवसांनी किंवा पीक पोटरीत असताना पेरणीनंतर ५० ते ५५ दिवसांनी पाणी द्यावे.

दोन पाणी देणे शक्य असल्यास वरील दोन्ही नाजूक अवस्थेत ज्वारीला पाणी द्यावे. पेरणीनंतरचे केलेल्या ओलावा व्यवस्थापनामुळे उत्पादनात २० टक्के वाढ होते.

कोरडवाहू क्षेत्रात आच्छादनाचा वापर ः जमिनीतून ६०ते ७० टक्के ओलावा बाष्पीभवनामुळे नाहीसा होतो.

हा ओलावा टिकविण्यासाठी शेतात उपलब्ध तण, तुरकाट्या यांचे आच्छादन करावे. हे आच्छादन ज्वारी पेरल्यापासून ५० दिवसांच्या आत केल्यास उत्पादनात १४ टक्क्यांपर्यंत वाढ होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी ५ जुलैनंतरच, अटी, निकषांमध्ये बदल, कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत घोषणा

Turmeric Cultivation: जळकोट तालुक्यात शेतकऱ्यांची हळद लागवडीची लगबग

Agriculture Awards: नांदेडमधील चार शेतकऱ्यांना राज्यस्तरीय कृषी पुरस्कार जाहीर

Wildlife Management: जाळी लावून रोखला वन्यप्राण्यांचा उपद्रव

Smart Electricity Meter : वादातही सोलापूर मंडळात ४.१७ लाख स्मार्ट मीटर

SCROLL FOR NEXT