sucking pest on cotton Agrowon
ॲग्रो गाईड

Cotton Pests : वाढीच्या अवस्थेनूसार कपाशी पिकाचे व्यवस्थापन कसे कराल ?

कपाशी पीक सध्या फुले आणि पाते लागण्याच्या अवस्थेत आहे. काही भागातील कपाशी पिकावर ऱसशोषक किडी आणि बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.

Team Agrowon

कपाशी पीक (Cotton Crop) सध्या फुले आणि पाते लागण्याच्या अवस्थेत आहे. काही भागातील कपाशी पिकावर बोंडअळीचा (Cotton Boll Worm) प्रादुर्भाव दिसून येत आहे. तर काही ठिकाणी अतीवृष्टीमुळे पिकात पाणी साठलेले आहे. अशा परिस्थितीत कपाशी पिकातील व्यवस्थापनाविषय़ी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठने पुढील सल्ला दिला आहे.

कपाशीमध्ये जिथे शक्य असेल तेथे तणांच्या व्यवस्थापनासाठी (Weed Management) आंतरमशागतीची कामे आटपावी. कपाशी पिकावर फुल अवस्थेत २०० ग्रॅम युरियाची दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

चांगल्या उत्पादकतेसाठी फुलांच्या वाढीच्या अवस्थेत दोन टक्के डीएपी ची फवारणी करावी.

ज्या ठिकाणी कपाशी पिकात झाडे अतिपाण्यामुळे मलूल झाली आहेत अशा ठिकाणी कॉपरऑक्सिक्लोराइड (५० % डब्ल्यू पी) २५ ग्रॅम अधिक युरिया १०० ग्रॅम दहा लिटर पाण्यात मिसळून प्रादुर्भावग्रस्त ठिकाणी फवारणी करावी.

पिकामध्ये गुलाबी बोंड अळीचे सर्वेक्षण करून एकरी किमान दोन कामगंध सापळे लावावेत. या सापळ्यामध्ये अडकलेले नर पतंग वेळोवेळी काढून नष्ट करावे. वीस ते पंचवीस दिवसातून एकदा ल्यूर बदलावे.

उपलब्धतेप्रमाणे एकरी तीन ट्रायकोकार्ड याप्रमाणे पात्या अवस्थेपासून दहा ते बारा दिवसाच्या अंतराने आणि चार ते पाच वेळा समसमान अंतरावर पिकाच्या खालच्या बाजूला टाचाव्या.

कपाशी पिकात एकरी दहा प्रमाणे पक्षी थांबे लावावेत. फुलोरा अवस्थेत गुलाबी बोंड अळीचे नियमित निरीक्षण करावे. तसेच गरज पडल्यास अर्धवट उमललेली फुले गुलाबी बोंड आळी ग्रस्त डोमकळ्या तोडून नष्ट कराव्यात किंवा जाळाव्यात.

सुरुवातीला कपाशीवर पाच टक्के निंबोळी अर्काची किंवा अ‍ॅझाडिरेक्टीन ३००० पीपीएम ४० मिली प्रति दहा लिटर पाणी याप्रमाणे प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून फवारणी करावी.

फुलांमध्ये गुलाबी बोंड आळीचा प्रादुर्भाव ५ टक्क्यांपर्यंत आढळून आल्यास क्विनॉलफॉस (२० % ए एफ) २५ मिली किंवा सायपरमेथ्रीन (१० टक्के प्रवाही) २० मिली प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

प्रादुर्भाव पाच ते दहा टक्क्यांपर्यंत अढळून आल्यास थायोडीकार्ब (७५ टक्के डब्ल्यू पी) २५ ग्रॅम किंवा क्विनॉलफॉस (२० % ए एफ) २५ मिली किंवा प्रोफेनोफॉस (५० टक्के) ३० मिली किंवा इन्डोक्साकार्ब (१५.८ %) दहा मिली किंवा डेल्टामेथ्रीन (२.८ %) १० मिली यापैकी कोणतेही एक कीडनाशक प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे.

प्रादुर्भाव १० टक्क्यांच्या वर आल्यास अशा ठिकाणी आवश्यकतेनुसार पुढे प्रादुर्भाव वाढू नये म्हणून मिश्र कीडनाशक क्लोरअॅन्ट्रानिलीप्रोल (९.३ %) अधिक लॅंम्ब्डासायहॅलोथ्रीन ( ४.६ %) ५ मिली किंवा इंडोक्साकार्ब (१४.५ टक्के) अधिक अॅसीटामाप्रीड (७.७ %) १० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

कपाशीवर मावा, तुडतुडे, फुलकिडे व पांढरी माशी या किडी आर्थिक नुकसानीची संकेत पातळी गाठताच पिकावर ५ टक्के निंबोळी अर्काची तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून फवारणी करावी. किंवा बुप्रोफेजीन (२५ %) २० मिली किंवा इमिडाक्लोप्रिड (१७.८ % एस एल) २.५ मिली प्रति १० लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी. पुढील दिवसात अंदाजे पावसानंतर स्वच्छ वातावरण असताना फवारणी करावी.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Winter Livestock Care: थंडीमध्ये जनावरांच्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी?

Farmer Demand: शेतकऱ्यांना हेक्‍टरी एक लाख रुपये मदत करा; संभाजी ब्रिगेड

Crop Loss Inspection: अतिवृष्टी, महापुराची केंद्रीय पथकाकडून पाहणी

Farmers Protest: सातबारा कोरा करण्याची घोषणा फसवी

KGS Sugar Mill: केजीएस साखर कारखान्याचे धुराडे पेटणार

SCROLL FOR NEXT