Humani Control  Agrowon
ॲग्रो गाईड

Humani Control : हुमणीचा बंदोबस्त कसा कराल?

Crop Care : गेल्या काही वर्षांपासून राज्याच्या विविध भागांमध्ये हुमणी किडीचा प्रादुर्भाव वाढत आहे. या किडीच्या नियंत्रणासाठी वेळीच सामुदायिक उपाययोजना करण्याची आवश्‍यकता आहे.

Team Agrowon

गेल्या काही वर्षांपासून राज्याच्या विविध भागांमध्ये हुमणी किडीचा प्रादुर्भाव वाढत आहे. या किडीच्या नियंत्रणासाठी वेळीच सामुदायिक उपाययोजना करण्याची आवश्‍यकता आहे.

राज्यामध्ये खरिपात प्रामुख्याने भात, ऊस, ज्वारी इ. पीक, तर रब्बीमध्ये गहू, हरभरा अशा पिके घेतली जातात.

या पिकांवर हुमणी अळीचा प्रादुर्भाव वाढत आहे. राज्यामध्ये हुमणी किडीच्या प्रामुख्याने दोन प्रजाती आढळतात.

होलोट्रिकीया सेराटा या जातींचा प्रादुर्भाव प्रामुख्याने नांदेड, बुलढाणा, नगर, धुळे, सांगली, कोल्हापूर इ. जिल्ह्यात दिसून येतो. तर ल्युकोफोलीस लेपिडोफोरा या प्रजातीचा तीव्र प्रादुर्भाव कोल्हापूर आणि सांगली जिल्हाच्या पश्चिम भागात दिसून येतो.

हुमणी किडीच्या प्रादुर्भावावरून तिचे नदी काठावरील व माळरान भागातील अशा दोन गटात वर्गीकरण करता येते. नदीकाठी आढळणारी हुमणी ल्युकोफोलीस जातीची असून, नदीकाठापासून दूर म्हणजेच माळ भागात आढळणारी हुमणी ही होलोट्रोकीया या जातीची आहे.

बागायती पिकामध्ये ओलावा आणि अन्नपुरवठा सातत्याने होत असल्यामुळे हुमणी अळीचा प्रादुर्भावही वाढतो.

हुमणीच्या अंडी, अळी, कोष आणि भुंगेरे अशा चार अवस्था असतात. त्यात अळी अवस्था पिकांच्या मुळावर जगत असल्याने सर्वात नुकसानकारक असून, ती तीनवेळा कात टाकत मोठी होते. संपूर्ण जीवनक्रम वर्षभरात पूर्ण होत असला तरी त्यात अळी अवस्था ६ ते ८ महिने इतकी मोठी असते.

नियंत्रणाचे उपाय  

हुमणीच्या जीवनक्रमात भुंगेरे हीच एक अवस्था थोड्या कालावधीसाठी जमिनीबाहेर असते. बाकी सर्व अवस्था जमिनीत असतात. त्यामुळे या अवस्थेत किडीचा बंदोबस्त करण्यावर जास्त लक्ष देणे गरजेचे आहे.

अ) भुंगेऱ्यांचा सामुदायिक बंदोबस्त     

पहिला पाऊस झाल्यावर हुमणीचे भुंगेरे सुर्यास्तानंतर बाभूळ, बोर, लिंब या झाडांवर पाने खाण्यासाठी गोळा होतात. अशा झाडांच्या फांद्या रात्री काठीच्या सहाय्याने हलवून खाली पडलेले भुंगेरे गोळा करावीत.

रॉकेल मिश्रीत पाण्यात टाकून मारावेत. हा उपाय शेतकऱ्यांनी सामुदायिकरित्या केल्यास अंडी घालण्यापूर्वीच भुंगेऱ्यांचा नायनाट करणे शक्य होईल.

ब) हुमणी अळीचा बंदोबस्त  

पीक काढणीनंतर लगेचच १५ ते २० सेंमी. खोल नांगरट करावी. नांगरणीवेळी उघड्या पडणाऱ्या अळ्या गोळा करुन रॉकेल मिश्रीत पाण्यात टाकून माराव्यात. आंतरमशागतीच्या वेळेस अळ्या गोळा करुन लोखंडी हुकच्या सहाय्याने किंवा खुरप्याने माराव्यात. पिकास पाणी देताना एखाद्या दिवशी पाणी जास्त काळ साचून ठेवल्यास अळ्या गुदमरून मरतील. हुमणीग्रस्त शेतातील कीडग्रस्त सुकलेली पिकांचे रोपे उपटावीत. मुळांशेजारील अळ्यांचा नाश करावा. 

हुमणीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तिच्या नैसर्गिक शत्रू महत्वाचे आहेत.

पक्षी : बगळा, चिमणी, मैना, कावळा, घार इ. पक्षी त्यांचा फडशा पाडतात.

प्राणी : मांजर, रानडुक्कर, मुंगूस, कुत्रा इ. प्राणी हुमणीच्या अळ्या आवडीने खातात.

जिवाणू (बॅसीलस पॉपीली) व सूत्रकृमी (हेटरो-हॅब्डेटीस) हे होलोट्रिकीया हुमणीचे नैसर्गिक शत्रू आहेत.

मेटारायझियम अॅनिसोप्ली हे बुरशीजन्य कीटकनाशक २० किलो/हेक्टरी या प्रमाणात कुजलेल्या शेणखतातून जमिनीत मिसळून बुंध्यापाशी द्यावी. त्यानंतर पिकास हलके पाणी द्यावे. ड्रेंचिंग करुन हुमणीचे रासायनिक पद्धतीने  नियंत्रण करता येते.  

स्त्रोत - महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

GM Crops: जीएम आणि जनुकीय संपादित तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांना फायदा होईल का?; तज्ज्ञ म्हणतात...

Chhagan Bhujbal: मराठा आरक्षणाविरोधात छगन भुजबळ न्यायालयात जाणार; कागदपत्रांची बारकाईने पडताळणी सुरू

Shikshanratna Award: डॉ. साताप्पा खरबडे यांचा शिक्षणरत्न पुरस्काराने सन्मान

Poultry Industry : फ्रोझन चिकनवरील जीएसटी हटवण्याची मागणी

UP Kharif Sowing: उत्तर प्रदेशात यावर्षीच्या खरीप हंगामात बंपर पीक उत्पादन अपेक्षित

SCROLL FOR NEXT