Mustard Management : मोहरीवरील काळ्या माशीचा बंदोबस्त कसा कराल?

एक मादी जवळपास एक-एक अशी ६० अंडी पानाच्या शिरांमध्ये देते. अंड्यांची उबवण ६ ते ८ दिवसांत होऊन अळी बाहेर येते.
Mustard Management
Mustard ManagementAgrowon

डॉ. योगेश मात्रे, डॉ. अनंत बडगुजर

सध्या सकाळी थंडी, मध्येच ढगाळ वातावरण (Cloudy Weather) आणि दुपारी उन्हे अशी विषम स्थिती राहत आहे. असे वातावरण विविध किडींच्या वाढीसाठी पोषक आहे.

रब्बीमधील मोहरी पिकामध्ये (Mustard Crop) सध्या काळी माशीचा प्रादुर्भाव दिसत आहे. या किडीच्या नियंत्रणासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करावा.

काळी माशी (Mustard sawfly)

ओळख :

-प्रौढ माशीचे डोके गडद काळे, पोटाचा भाग केशरी रंगाचा, पंख काळसर.

-अळी : मृदू काळसर रंगाची असून ८ पायांची जोडी असते. अळीला थोडा त्रास झाल्यास खाली जमिनीवर पडून शरीर गोल आकारात करून मेल्याचे ढोंग करते. त्यालाच ‘फेगनिंग डेथ’ असे म्हणतात.

Mustard Management
Mustard Market : मोहरी लागवड विक्रमी टप्प्याकडे; तापमानवाढीचा पिकाला फटका

जीनवक्रम :

एक मादी जवळपास एक-एक अशी ६० अंडी पानाच्या शिरांमध्ये देते. अंड्यांची उबवण ६ ते ८ दिवसांत होऊन अळी बाहेर येते. अळी अवस्था १४ ते १८ दिवसांची असते. अळी मातीमध्ये १० ते १५ दिवसांसाठी कोष अवस्थेत जाते.

या किडीचा जीवनक्रम ३० ते ३५ दिवसांत पूर्ण होतो. नोव्हेंबर ते मार्च या कालावधीमध्ये २-३ पिढ्या पूर्ण होतात.

नुकसानीचा प्रकार :

अळ्या पिकाची कोवळी पाने खातात. या अळ्या कोवळ्या पानाच्या कडेपासून पाने खाण्यास सुरुवात करून संपूर्ण रोपांवरील पाने खातात.

नंतर पानांना छिद्र पाडून त्यातील हरितद्रव्य खातात. मोहरी या पिकांशिवाय पानकोबी, फुलकोबी नवलकोल, मुळा आदी पिकांवरही या किडीचा प्रादुर्भाव होतो.

एकात्मिक व्यवस्थापन-

-प्रादुर्भावग्रस्त पाने दिसल्यास तोडून टाकावीत.

-सुरुवातीला ५ टक्के निंबोळी अर्क किंवा ॲझाडिरॅक्टीन (३०० पीपीम) ५ मिलि प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.

Mustard Management
GM Musterd : जीएम मोहरी विषयीचे गैरसमज दूर होणे गरजेचे

-रासायनिक नियंत्रण (फवारणी प्रति लिटर पाणी)

डायामिथोएट (३० ईसी) १.३ मि.लि. किंवा

क्विनॉलफॉस (२५ ईसी) २.४ मि.लि.

डॉ. योगेश मात्रे, (संशोधन सहयोगी), ७३८७५२१९५७, डॉ. अनंत बडगुजर (सहायक प्राध्यापक), ७५८८०८२०२४ (कृषी कीटकशास्त्र विभाग, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com