Cotton Boll Worm Agrowon
ॲग्रो गाईड

Cotton : गुलाबी बोंड अळी व्यवस्थापनासाठी शेती शाळेतून मार्गदर्शन

गुलाबी बोंड अळीच्या व्यवस्थापनासाठी कृषी विभागाकडून विविध ठिकाणी भेटी देऊन शेतीशाळा, शेतकरी सभा, प्रशिक्षण वर्ग, घोंगडी बैठका, प्रक्षेत्रभेटी घेऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जात आहे.

टीम ॲग्रोवन

पैठण : गुलाबी बोंड अळीच्या व्यवस्थापनासाठी (Pink Boll worm Management) कृषी विभागाकडून (Agriculture Department) विविध ठिकाणी भेटी देऊन शेतीशाळा (Farm School), शेतकरी सभा, प्रशिक्षण वर्ग, घोंगडी बैठका, प्रक्षेत्रभेटी घेऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जात आहे.

स्मार्ट कॉटन प्रकल्प/राज्य पुरस्कृत कापूस उत्पादकता वाढ प्रकल्प पैठण तालुक्यात राबविण्यात येत आहे. सध्या कपाशीचे पीक पाते, फुले बोंडे अवस्थेत आहे. या अवस्थेत गुलाबी बोंड आळी चा प्रादुर्भाव होण्याची शक्यता लक्षात घेऊन मंडळ कृषी अधिकारी पैठण विशाल साळवे, कृषी पर्यवेक्षक किशोर पाडळे हे कार्यक्षेत्रातील गावांमध्ये प्रत्यक्ष मार्गदर्शन करीत आहेत.

मुधळवाडी येथे शेतीशाळा व प्रक्षेत्र भेट आयोजित करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. मंडळ कृषी अधिकारी पैठण श्री. साळवे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना गुलाबी बोंडअळी नियंत्रणाकरिता एकरी ८ते १० कामगंध सापळे लावणे, रस शोषण करणाऱ्या किडींकरिता एकरी २५ प्रत्येकी निळे व पिवळे चिकट सापळे लावणे, प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून निमार्क/अझाडिरेक्टीन १०००० पीपीएम १ मि.लि. प्रति लिटर किंवा१५०० पीपीएम २.५ मि.लि. प्रति लिटर फवारणी करने, गुलाबी बोंड आळी प्रादुर्भाव आढळून आल्यास प्रोफेनोफॉस ५० टक्के ४०० मिली प्रती एकर किंवा इमामेक्टिन बेंझोएट ५ टक्के ८८ ग्रॅम प्रती एकर किंवा प्रोफेनोफोस ४० टक्के अधिक सायपरमेथ्रीन ४ टक्के (पूर्व मिश्रित कीटकनाशक) ४०० मिली प्रती एकर आलटून पालटून फवारावे (यासोबत इतर कीटकनाशके, बुरशीनाशके, विद्राव्य खते,सूक्ष्म मूलद्रव्ये अथवा रसायने मिसळू नये.) असे आवाहन केले.

यावेळी कृषी पर्यवेक्षक किशोर पाडळे यांनी शेतकऱ्यांना प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया योजना व नॅनो युरिया वापर याविषयी माहिती दिली. शेतीशाळा वर्गात कृषीसहाय्यक सुवर्णा अकोलकर यांनी शेतकऱ्यांना पीक प्रतिज्ञा दिली तसेच कापसाचे निरीक्षणे घेऊन शेतकऱ्यांना शत्रू किडी व मित्र किडी ओळख व पीक संदेशाचे सादरीकरण केले. या कार्यक्रमास कृषी सहाय्यक सचिन खराद, चंद्रकांत कुसळकर, बी.जे.साबळे, रजनी पवार, जयश्री पिंपरीये उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mango Loss 2026: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा, काजू नुकसानीचे पंचनामे सुरू

Satana APMC: सटाणा बाजार समितीमध्ये भरती रद्द करण्याच्या हालचाली

Farmers Protest: बारदानाअभावी गहू खरेदी ठप्प, दोन दिवस रांगेत उभ्या शेतकऱ्यांचा संयम सुटला

Agrowon Podcast: सोयाबीनमध्ये सुधारणा; कापसातील वाढ कायम, कलिंगडाची आवक टिकून, मोहरीच्या भावात तेजी तर कांदा दबावातच

Farm Road Opens: अतिक्रमणमुक्ती मोहिमेत पाणंद-शेतरस्ते खुले

SCROLL FOR NEXT