ॲग्रो गाईड

Backyard Poultry : परसातील कुक्कुटपालनासाठी ग्रामप्रिया कोंबड्या उपयुक्त

Team Agrowon

शेतीला पुरक म्हणून कुक्कुटपालन (Poultry) व्यवसाय एक चांगली संधी आहे. डीप लिटर (Deep Liter) आणि बंदिस्त पद्धतीने कोंबड्याचे संगोपन केले जाते. यासोबतच ग्रामीण भागात परसातील कुक्कुटपालनही मोठ्या प्रमाणात केले जाते. परसातील कुक्कुटपालनामुळे अंडी उत्पादनातून चांगले उत्पन्न मिळते. परसातील कुक्कुटपालनासाठी गिरीराज (Giriraj), वनराज (Vanraj), सुवर्णधारा (Suvarnadhara), कॅरी निर्भिक (Carry Nirbhik) या जातीबरोबर ग्रामप्रिया नावाची जात ग्रामीण व आदिवासी भागात अंडी उत्पादनासाठी उपयुक्त आहे. ग्रामप्रिया ही जात कुक्कुट परियोजना निदेशालय, राजेंद्र नगर, हैदराबाद येथील संशोधन केंद्राने गावठी कोंबडी पासून तयार केलेली जात आहे. ही जात परसबागेतील कुक्कुटपालनासाठी अतिशय चांगली समजली जाते. या कोंबड्या रंगीत आणि पांढऱ्या अशा दोन्ही रंगामध्ये असतात. पांढऱ्या रंगाच्या ग्रामप्रिया कोंबड्या या प्रामुख्याने अंड्याच्या उत्पादनाकरिता प्रसिद्ध आहेत. ग्रामप्रिया कोंबड्यांचे महत्व आणि वैशिष्टे काय आहेत याबाबत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने दिलेली माहिती पाहुया

- या कोंबड्या वयाच्या १६० ते १६५ दिवसानंतर अंडी द्यायला सुरुवात करतात. वयाच्या ७२ व्या आठवड्यापर्यंत २०० ते २५० अंड्याचे उत्पादन मिळते. 

अंड्यांचा रंग फिक्कट तपकिरी असतो. साधारणपने एका अंड्यांचे वजन ५५ ते ६० ग्रॅम एवढे भरते. 

- विविध रंगी पंखामुळे ही जात दिसायला देखणी व आकर्षक वाटते. 

- रंगीत कोंबड्याच्या अंड्याचे उत्पादन हे पांढरा रंगाच्या कोंबडी पासून मिळणाऱ्या अंड्याच्या उत्पादनापेक्षा कमी असते. 

- ही जात काटक असून रेगप्रतिकारक क्षमता ही जास्त असते. पाय मजबूत असून लांब असतात. 

- शत्रूपासून संरक्षण करण्याची क्षमता जास्त असल्यामुळे ही जात परसातील कुक्कुटपालनासाठी अतिशय योग्य आहे. 

- सुरुवातीच्या दीड महिन्याच्या काळात जास्त काळजी घेणे आवश्यक असते. थंड वातावरण असेल तर कृत्रिम उष्णता देणे आवश्यक असते. 

- पिलांना सुरुवातीचे दोन दिवस बारीक भरडलेला मका द्यावा. ज्वारीचा बारीक केलेला चुरा, बाजरी, तांदूळ, शेंगदाणा पेंड, खनिज मिश्रण, जीवनसत्त्वे, कॅल्शियम पासून घरच्या घरी खाद्य तयार होते. 

- या कोंबड्यांना शेवग्याचा पाला, लसूण घास, पालकाची पाने देखील खूप आवडतात. 

- वयाच्या ६ ते ७ आठवड्याच्या पिलांचे वजन ५०० ते ६०० ग्रॅम होते तर बारा आठवड्यात मादीचे वजन हे १.६ ते १.८ किलो होते. कोंबड्यांचे वजन त्यांना दिल्या जाणाऱ्या खाद्यावर अवलंबून असते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Accident Insurance Scheme : अपघात विमा योजनेतून ४५० शेतकरी कुटुंबांना मदत

Banana Sunburn : उन्हाच्या तीव्रतेमुळे जळताहेत केळीची रोपे

Summer Heat : मालेगावात वैशाखाआधीच वणवा

Adulterated Milk : भेसळयुक्त दूध रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात

Water Scarcity : कळंबा परिसरात पाण्याचा प्रश्‍न गंभीर

SCROLL FOR NEXT