Sugar Cane Management
Sugar Cane Management Agrowon
ॲग्रो गाईड

Sugarcane Management : पूर्वहंगामी ऊसासाठी खत, पाणी व्यवस्थापन

डॉ. भरत रासकर

पूर्व हंगामी उसाला (Sugar Cane) माती परिक्षणानुसार खत व्यवस्थापन (Sugar Cane Management) करावे. पीकवाढीच्या टप्यानुसार पाणी व्यवस्थापन करावे. पूर्व हंगामी उसामध्ये बटाटा,कांदा, प्लॉवर, कोबी, हरभरा,वाटाणा यांचे आंतरपीक घेणे फायदेशीर ठरते.

ठिबक सिंचन प्रणालीचा वापर

माती तपासणी अहवालानुसार ठिबक सिंचन प्रणालीचा वापर करावा. तासाला २ लिटर किंवा ४ लिटर पाण्याचा प्रवाह असलेले ऑनलाइन किंवा इनलाईन ड्रीपर बसवावेत. १२ मि.मी. लॅटरल बसवताना सबमेनच्या दोन्ही बाजूंना ३० मीटर अंतरापर्यंत लॅटरल ठेवावेत. तर १६ मि.मी. लॅटरल बसवताना सबमेनच्या दोन्ही बाजूंना ५० मीटर अंतरापर्यंत लॅटरल ठेवावेत. त्यापेक्षा लॅटरलचे अंतर जास्त ठेवल्यास शेवटपर्यंत पाणी सारखे पोहोचत नाही.

पाण्याचे दररोजचे बाष्पीभवन, पीकवाढीचा गुणांक, लॅटरल आणि ड्रीपरमधील अंतर आणि ओलित क्षेत्र गुणांक त्याचप्रमाणे पाण्याचा प्रवाह याआधारे ठिबक संच चालविता येतो. त्यासाठी फुले जल प्रणाली वापरावी.

ठिबक सिंचनाचे पाणी सरीच्या दोन्ही बाजूंस पोहोचत असल्याचे ओलावा चेक करून खात्री करावी. विद्युत प्रवाह खंडित झाल्यास त्याप्रमाणे ठिबक संच चालविण्याचे नियोजन करावे

सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर

सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता असणाऱ्या जमिनीसाठी हेक्टरी २५ किलो फेरस सल्फेट, २० किलो झिंक सल्फेट, १० किलो मँगेनीज सल्फेट आणि ५ किलो बोरॅक्स चांगल्या कुजलेल्या शेणखतामध्ये (१० : १ प्रमाणात) ५ ते ६ दिवस मुरवून सरीतून द्यावे.

हुमणी प्रादुर्भाव कमी होण्यास लागवडीच्या वेळी हेक्टरी ४०० किलो निंबोळी पेंडीचा चुरा जमिनीत मिसळावा.

पूर्वहंगामी उसातील आंतरपिके

पीक जाती कालावधी (दिवस) आंतरपिकाचे प्रमाण

बटाटा कुफरी चंद्रमुखी, कुफरी ज्योती, ९० ते ११० १-२

कांदा(रांगडा) फुले समर्थ, बसवंत ७८०,

एन ५३ ८५ ते ९०,

१०० ते ११० ३-४

लसूण गोदावरी, श्‍वेता, फुले बसवंत १३० ते १३५ ३-४

कोबी गोल्डन एकर ६५ ते ८० २

प्लॉवर पुसा दीपाली, पुसा केतकी, स्नो बॉल १६ ७० ते १०० २

हरभरा विराट, दिग्विजय, विक्रम ९० ते ११५ १ मध्यावर

वाटाणा बोनव्हिला, अर्केल, फुले प्रिया ८० ते १०० २

भाजीपाला गाजर, मुळा, लाल बीट, मेथी, कोथिंबीर पिकानुसार २

पूर्वहंगामी उसासाठी हेक्टरी रासायनिक खत देण्याचे वेळापत्रक (किलो)

अ.

क्र. खतमात्रा देण्याची वेळ पश्‍चिम महाराष्ट्र विदर्भ विभाग मराठवाडा विभाग

नत्र (युरिया) स्फुरद (सिंगल सुपर फॉस्फेट) पालाश (पोटॅश) नत्र (युरिया) स्फुरद (सिंगल सुपर फॉस्फेट) पालाश (पोटॅश) नत्र (युरिया) स्फुरद (सिंगल सुपर फॉस्फेट) पालाश (पोटॅश)

१ लागणीच्या वेळी ३४ (७४) +(५३०) ८५ (१४०) २५ (५४) ५०

(३१३) ५०

(८४) ३०

(६५) ११० १७०

२ लागणीनंतर ६ ते ८ आठवड्यांंनी १३६ (२९५) -- -- ७५ (१६३) -- -- १२० (२६०) -- --

३ लागणीनंतर १२ ते १६ आठवडयांनी ३४ (७४) -- -- २५ (५४) -- -- ३०

(६५) -- --

४ मोठ्या बांधणीच्या वेळी १३६ (२९५) ८५ (५३०) ८५ (१४०) ५० (१०८) ५०

(३१३) ५० (८४) १२० (२६०) ६० --

एकूण ३४० (७३८) १७० (१०६३) १७० (२८४) १७५ (३८०) १०० (६२५) १०० (१६८) ३०० (६५१) १७० (१०६३) १७० (२८४)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Management : खोडवा उसाचे व्यवस्थापन

Agriculture Processing Industry : प्रक्रिया उद्योगात तयार झाली ओळख

Hanneborg Farm : नॉर्वेमधील ग्राहकांची ‘हॅनेबॉर्ग फार्म’ला पसंती

Weekly Weather : मॉन्सूनच्या आगमनाची पूर्वतयारी सुरू झाली

Cotton Seed : कपाशीच्या बियाण्यांसाठी तेलंगणाची वारी

SCROLL FOR NEXT