Grain Storage  Agrowon
ॲग्रो गाईड

Grain Storage : धान्याची साठवण करताना अशी काळजी घ्या ; लागणार नाही कीड, बुरशी

Grain Pests : धन्याची साठवण करताना योग्य काळजी न घेतल्यास किंडींच्या प्रादुर्भावामुळे धान्याचे नुकसान होऊ शकते. साठवलेल्या धान्यावर सोंडकीडा, छोटे भुंगेरे, खापरा भुंगा, दातेरी भुंगा, कडधान्यातील भुंगा, पतंग, तांबडा भुंगा इ. किडींचा प्रादुर्भाव होऊन नुकसान होऊ शकते.

Team Agrowon

Grain Storage Care : धन्याची साठवण करताना योग्य काळजी न घेतल्यास किंडींच्या प्रादुर्भावामुळे धान्याचे नुकसान होऊ शकते. साठवलेल्या धान्यावर सोंडकीडा, छोटे भुंगेरे, खापरा भुंगा, दातेरी भुंगा, कडधान्यातील भुंगा, पतंग, तांबडा भुंगा इ. किडींचा प्रादुर्भाव होऊन नुकसान होऊ शकते.

नवीन धान्याची एकाचवेळी आवक झाल्याने दर कमी होतात. हे टाळण्यासाठी धान्याला अपेक्षीत बाजारभाव मिळावा यासाठी धान्य साठवून ठेवतात.

धान्यातील किटक २० ते ४० अंश सेल्सिअस तापमानाच्या कक्षेतच क्रियाशील राहू शकतात. धान्यातील ओलाव्याचे प्रमाण ८ ते १० टक्के पेक्षा जास्त असल्यास किंडींचा प्रादुर्भांव होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात वाढते. काही किटकांचे प्रौढ पिकांच्या पक्व अवस्थेतील दाण्यावर अंडी घालतात. अशा धान्याच्या साठवणीत पोषक हवामान मिळाल्यानंतर अळी बाहेर येते आणि धान्य खाण्यास सुरुवात करते. त्यामुळे धान्य चांगले वाळवून साठवावे. 

धान्य साठवणूक करताना घ्यायची काळजी

 - मळणी केल्यानंतर धान्य उन्हामध्ये चांगलं वाळवून घ्यावं. धान्यातील ओलाव्याचं प्रमाण १० टक्क्यांपेक्षा कमी असावं. ओलाव्याचं प्रमाण जास्त असल्यास धान्याला कीड लागण्याची शक्यता असते.

- धान्याची पोती जमिनीवर रचून ठेवू नयेत. जमिनीवर साठविल्यामुळे धान्य जमिनीतील उपलब्ध ओलावा शोषून घेते. परिणामी, धान्य चांगले वाळविलेले असून देखील त्यातील ओलाव्याचे प्रमाण वाढते.

- धान्य साठवणीपूर्वी त्यातील किडलेले, खराब दाणे चाळून आणि उधळणीद्वारे वेगळे करावेत.

- धान्य साठवणुकीसाठी आधुनिक हवाबंद कोठ्या वापराव्यात.जेणेकरून धान्याला कीड लागली तरी हवेचा पुरवठा न झाल्यामुळे कीड आपोआपच मारली जाईल.

- साठवणुकीसाठी वापरलेल्या पारंपरिक कोठार किंवा कणगीला असलेली छिद्रे चुन्याने बुजवून घ्यावीत.

- साठवणुकीच्या खोलीमध्ये उंदरांनी पाडलेली बिळे काचेचा चुरा भरून नंतर सिमेंटने बंद करावा. जेणेकरून उंदरांना पुन्हा सहजरीत्या बिळे पाडता येणार नाहीत.

- धान्य साठवणुकीच्या जागी पावसाळ्यात पाणी येणार नाही याची काळजी घ्यावी.

- धान्य साठवणुकीसाठी शक्यतो लोखंडी किंवा धातूपासून बनविलेल्या पत्र्याच्या कोठ्या वापराव्यात.

- साठवणीच्या गोण्या किंवा पोती गरम पाण्यात ५० ते ५५ अंश सेल्सिअस तापमानाला १० ते १५ मिनिटे भिजवून नंतर वाळवावीत.आणि नंतर त्यात धान्य भरावे.

- पावसाळ्यात धान्य हवाबंद जागी ठेवावे. उन्हाळ्यात धान्य मोकळी हवा लागेल अशा ठिकाणी ठेवावं. धान्याची पोती एका लाकडी फळीवर जमिनीपासून उंचावर आणि भिंतीपासून दूर ठेवावीत. 

- धान्य साठवलेल्या ठिकाणी उंदीर येऊ नये यासाठी दरवाज्याखाली गॅल्व्हनाईज पत्रा बसवून घ्यावा. उंदीर तसंच पक्षांना प्रतिबंध करण्यासाठी खिडक्यांना लोखंडी जाळ्या बसवाव्यात. अशा प्रकारे धान्याची साठवणूक केल्यास धान्याची नासाडी होणार नाही.  

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी नव्हे, कर्जवसुली मोहीम; सरकारच्या शेतकरी धोरणांवर आमदार दानवेंचा जोरदार हल्लाबोल

Maharashtra Monsoon Session 2026: 'शेतकरी हवालदिल, पाणी नाही, रात्री २ वाजेपर्यंत झोप लागत नाही', शेतकरी प्रश्नांवरुन विधानसभेत गदारोळ

Girna Dam Water Release: गिरणा धरणातून टंचाई निवारणासाठी पाचवे आवर्तन

Natural Farming Workshop: केव्हीकेत नैसर्गिक शेतीवरील वैज्ञानिक कार्यशाळेला शेतकऱ्यांचा प्रतिसाद

Banana Farmers Support: केळी उत्पादकांना विमा योजनेचाच आधार

SCROLL FOR NEXT