Grain Storage : साठवणुकितील धान्यातील किडीला रोखण्याचे घरगुती उपाय?

अनेक वेळा वातावरणातील बदलामुळे किंवा साठवणुकीत योग्य काळजी न घेतल्यामुळे कीड किंवा बुरशी लागून धान्य खराब होते. धान्यामध्ये ८ ते १० टक्क्यांपेक्षा जास्त ओलावा असल्यास किडींचा प्रादुर्भाव वाढतो.
Grain Storage
Grain StorageAgrowon
Published on
Updated on

अनेक वेळा वातावरणातील बदलामुळे किंवा साठवणुकीत योग्य काळजी न घेतल्यामुळे कीड किंवा बुरशी लागून धान्य खराब होते. धान्यामध्ये ८ ते १० टक्क्यांपेक्षा जास्त ओलावा असल्यास किडींचा प्रादुर्भाव वाढतो. 

धान्य साठवणुकीवेळी किडींचा प्रादुर्भाव (Pest Attack) टाळण्यासाठी विविध कीटकनाशकांचा वापर केला जातो. त्यांचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे घरातच उपलब्ध असणाऱ्या पदार्थांचा वापर करुन धान्याचे साठवणूकीतील (Grain Storage) नुकसान टाळता येते.

हे पदार्थ कोणते आहेत याविषयी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने दिलेली माहिती पाहुया.  

घरगुती उपाययोजना 

१) कडुलिंबाची पाने 

धान्याला लागणारी कीड बहुगुणी कडुलिंबाच्या पानांचा वापर करून रोखता येते. यासाठी कडुलिंबाची पाने सावलीमध्ये वाळवून घ्यावीत. वाळलेली पाने प्लॅस्टिक किंवा कापडाच्या पिशवीत भरावीत.

तत्पूर्वी पिशवीला लहान छिद्रे पाडावीत किंवा कापडात बांधावीत. ही पिशवी धान्याच्या गोण्यांमध्ये वेगवेगळ्या थरांमध्ये किंवा साठवणुकीच्या डब्यामध्ये ठेवावीत. कडुनिंब पानांच्या तीव्र वासामुळे धान्याला कीड लागत नाही.

Grain Storage
Stored Grain Pest : साठवलेल्या धान्यातील किडींचे रासायनिक नियंत्रण

२) लसूण 

धान्याला लागणारी कीड रोखण्यासाठी लसूण प्रभावी काम करते. त्यासाठी साल न काढलेली लसणाची संपूर्ण गड्डी वापरावी. प्रथम डब्यात धान्य टाकून त्यावर लसणाची एक गड्डी आणि त्यावर पुन्हा धान्य असे साधारण थर ठेवावेत. तसेच डब्याचे झाकणही बंद राहील याची काळजी घ्यावी.

३) लाल मिरच्या 

धान्यातील कीड आणि अळ्यांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लाल मिरचीचा वापर फायदेशीर ठरतो. त्यासाठी धान्य भरताना प्रत्येक थराला ४ ते ५ लाल सुकलेल्या मिरच्या ठेवाव्यात.

Grain Storage
Food Wastage : उत्पादकतेचे नाही तर नासाडी रोखण्याचे आव्हान

४) लवंग 

या पद्धतीमध्ये कडुलिंबाची वाळवलेली पाने आणि लसूण समप्रमाणात घेऊन त्यात १० ते १५ लवंगा टाकाव्यात. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात थोडे पाणी टाकून कडुनिंब पाने, लसूण आणि लवंग चांगले बारीक करून घ्यावे.

तयार मिश्रणाच्या मध्यम आकाराच्या गोळ्या बनवून २ ते ३ दिवस उन्हामध्ये सुकवाव्यात. या गोळ्या कापडामध्ये बांधून धान्यांच्या थरांत ठेवाव्यात. त्यामुळे कीड आणि अळींचा प्रादुर्भाव कमी होतो.

५) कडुलिंबाच्या बिया 

कडुलिंबाच्या बियांची पावडर ही धान्य साठवणुकीसाठी अत्यंत प्रभावीपणे काम असते. कडुलिंबाच्या बियांची पावडर धान्यात मिसळल्यास किडीपासून संरक्षण होते.

६) पुदिना पानांची भुकटी किंवा राख 

पुदिना पानांची भुकटी किंवा राख धान्यात मिसळल्यास किडींच्या श्‍वसनामध्ये अडथळा येऊन कीड मरते.

७) मीठ किंवा कांदे 

बऱ्याच वेळा साठवलेल्या धान्यामध्ये भुंगेऱ्यांचा प्रादुर्भाव दिसून येतो. नियंत्रणासाठी साठवणुकीवेळी धान्यात मीठ मिसळावे किंवा कांदे ठेवावेत. कांद्याच्या उग्र वासामुळे धान्याला भुंगेरे लागत नाहीत. तसेच मीठ धान्यातील अतिरिक्त पाणी शोषून घेते. त्यामुळे जिवाणूंची वाढ होत नाही.

८) गोडेतेल 

धान्य साठवणुकीवेळी एरंडी, भुईमूग, खोबरेल किंवा मोहरी तेल वापरल्यास किडींचा प्रादुर्भाव रोखता येतो. तेलामुळे किडींची अंडी उबण्यास प्रतिबंध होऊन उत्पत्ती थांबते. त्यासाठी १ चमचा तेल प्रति किलो धान्य याप्रमाणे चोळावे. १ क्विंटल धान्यासाठी अर्धा ते एक किलो तेल वापरावे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com