Soil Ploughing Agrowon
ॲग्रो गाईड

Land Preparation : पेरणीसाठी रान तयार करताना कोणती काळजी घ्यावी?

Soil Ploughing : आपल्याकडे पावसाच गणित तसं निश्चित नाही. त्यामुळे पाऊस कधी कधी जास्त होऊ शकतो किंवा पावसात खंडही पडू शकतो. त्यामुळे जमिनीत तर पावसाचं पाणी मुरविण्यासाठी प्रयत्न केलेचं पाहिजेत.

Team Agrowon

Soil Moisture Conservation : आपल्याकडे पावसाच गणित तसं निश्चित नाही. त्यामुळे पाऊस कधी कधी जास्त होऊ शकतो किंवा पावसात खंडही पडू शकतो. त्यामुळे जमिनीत तर पावसाचं पाणी मुरविण्यासाठी प्रयत्न केलेचं पाहिजेत.

पहिला पाऊस पडल्यावर कुळवाची एक पाळी देऊन उताराला आडवी रानाची बांधणी करून सारे तयार करावेत. जेणेकरून पावसाचं पाणी या साऱ्यात जास्तीत जास्त मुरले जाईल. या साऱ्याचा आकार साधारण ६ बाय ६ मीटर इतका ठेवावा. याशिवाय जमिनीत पाणी मुरण्याचं प्रमाण वाढविण्यासाठी चार मीटर अंतरावर साधारणपणे ६० सेंटीमीटर खोलीचे चर खोदून ठेवल्यास त्याचाही चांगला उपयोग होतो. या उपायांमुळे कोरडवाहू रब्बी ज्वारीच्या उत्पादनात हेक्टरी ४ क्विंटल पेक्षा जास्त वाढ झाल्याचे आढळून आले आहे.

जमिनीत पाणी मुरविण्यासाठी दोन समपातळी बांधाच्या मधल्या जागेत दोन सजीव बांध घालून जमिनीचा उतार कमी करता येतो. यामुळे वाहून जाणाऱ्या पाण्याचा वेग कमी होऊन मातीची धूपही कमी होते. असे सजीव बांध करण्यासाठी सुबाभूळ सारख्या वनस्पतीचा उपयोग करता येतो. अशी लागवड पावसाळ्यात करता यावी म्हणून पूर्वमशागत करताना समपातळीत सरी वरंबा करून सजीव बांधाची मार्गदर्शक रेषा ठरवून ठेवावी. शेतातून पावसाचं जास्तीचं वाहून जाणारं पाणी लवणाच्या जागी शेततळी खोदून अडवून ठेवण्याची योजनाही पूर्वमशागत करताना अमलात आणावी. या पाण्याचा पिकांना संरक्षित पाणी देण्यासाठी उपयोग होतो. याशिवाय नाला सरळीकरण, नाल्यातील प्रवाहाला दगडाचे अडथळे करणं ही कामेही करणे हिताच ठरत.

रान तयार करताना कोणती काळजी घ्यावी?

रान तयार करत असताना, स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून शेताच्या बांधावरील, मशागतीला आणि पिकाच्या वाढीला अडथळा करणारी झुडपे तोडावीत. काही वेळा झाडाच्या वसव्यामुळे पिकांची वाढ होत नाही. अशी झाडे काढून टाकावीत. बांधावरील गवत, काडीकचरा, झुडुपे कापून जाळावीत. त्यामुळे कीड-रोगांच्या अवस्था नष्ट होण्यास मदत होते. फळझाडांची किंवा शेताच्या बांधावरील झाडांची वाढ आटोपशीर ठेवावी. झाडावरील रोगग्रस्त, वाळलेल्या आणि अस्ताव्यस्त वाढलेल्या फांद्या कापून त्यावर बोर्डो पेस्ट लावावी.

साधारणपणे पहिला पाऊस पडून गेल्यानंतर जमीन भुसभुशीत झाल्यावर उतारास आडवी कुळवाची पाळी द्यावी. नांगरटीनंतर १५ दिवसांनी कुळवाची पाळी द्यावी. त्यानंतर ८ ते १० दिवसांच्या अंतराने दोन कुळवाच्या पाळ्या द्याव्यात. कुळवणीमुळे जमीन चांगली भुसभुशीत होते. तसेच जमिनीत हवा खेळती राहते. पिकांची मुळे योग्य खोलीपर्यंत वाढतात. तणांचा बंदोबस्त होतो. याशिवाय शेवटच्या वखरणीपूर्वी शेतात शेणखत टाकावे त्यामुळे शेणखत जमिनीत चांगले मिसळते. जमिनीमध्ये सूक्ष्म जिवाणूंची वाढ होण्यास मदत होते.अशा प्रकारे जमीन तयार करण्याचे नियोजन केले तर पीक उत्पादन वाढण्यास मदत होते. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: हरभरा दरात सुधारणा; केळी दर नरमले, ज्वारीला मागणी कायम, आले दरात सुधारणा तर कांद्याची दरपातळी कायम

Mumbai Rain: मुंबईतील पावसाने २६ जुलै २००५ ची आठवण; अनेक भागात जनजिवन विस्कळीत

Khandesh Cotton Crisis : खानदेशात जिनिंग प्रेसिंग कारखान्यांची धडधड बंद

Crop Insurance Crisis: पीक विम्याकडे शेतकऱ्यांची पाठ; गेल्यावर्षीच्या तुलनेत केवळ २२ टक्के अर्ज

Solapur Power Loss : सोलापूर मंडलाची वीजहानी सर्वाधिक

SCROLL FOR NEXT