Tur Crop Disease Agrowon
ॲग्रो गाईड

Tur Disease : तुरीवरील एरिओफाइड माइटचे नियंत्रण

तूर पिकावर मागील हंगामात वांझ रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला होता. वांझ हा विषाणूजन्य रोग असून, त्याचा प्रसार एरिओफाइड माइट (कोळी) मुळे होतो. हे कोळी ‘पीजन पी स्टरिलिटी मोझॅक’ या वांझ रोगाच्या विषाणूचा प्रसार करतात.

टीम ॲग्रोवन

डॉ. चांगदेव वायळ, डॉ. नंदकुमार कुटे, डॉ. विश्‍वास चव्हाण

तूर पिकावर (Tur Crop) मागील हंगामात वांझ रोगाचा प्रादुर्भाव (Infertility Disease) मोठ्या प्रमाणात झाला होता. वांझ हा विषाणूजन्य रोग असून, त्याचा प्रसार एरिओफाइड माइट (Eriophyid Mite) (कोळी) मुळे होतो. हे कोळी ‘पीजन पी स्टरिलिटी मोझॅक’ (Pigeon Pea Sterility Mosaic) या वांझ रोगाच्या विषाणूचा प्रसार करतात. रोगाच्या प्रादुर्भावामुळे तुरीला फुले व शेंगा लागत नाहीत. त्यामुळे उत्पादनात मोठी घट येते. वांझ रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी एरिओफाइड माइटचे वेळीच नियंत्रण करणे आवश्यक आहे.

किडीची ओळख ः

- कोळी आकाराने अत्यंत सूक्ष्म असून, उघड्या डोळ्यांनी दिसत नाहीत. लांबी साधारण ०.२ मिमी असते. त्यांना पाहण्यासाठी सूक्ष्मदर्शीचा वापर करावा लागतो.

- शरीर पांढरट लांब किंवा पिवळसर रंगाचे असते. पायांच्या दोन जोड्या असतात.

- कोळी तुरीच्या पानांच्या खालच्या बाजूस वास्तव्य करतात. आणि पानांतील रस शोषून त्यावर उपजीविका करतात.

- कोळी तुरीच्या कोवळ्या शेंड्यावर अंडी घालतात. अंडी, पिले आणि प्रौढ असा किडीचा जीवनक्रम दोन आठवड्यांत पूर्ण होतो.

प्रसार ः

- कोळ्यांनी पानांतील रोगग्रस्त झाडांतील रस शोषल्यानंतर त्यांच्या सोंडेमध्ये हरित लवक व रस राहतो. शोषलेल्या रसामध्ये वांझ रोगाचे विषाणू असतात. त्यानंतर निरोगी झाडातील रस शोषण करताना वांझ रोगाचे विषाणू सोंडेतून निरोगी झाडांच्या पानांत शिरकाव करतात. अशाप्रकारे वांझ रोगाचा प्रसार होतो.

- तुरीच्या एका झाडावर जर पाच एरिओफाइड माइट असतील तर झाडाच्या १०० टक्के भागावर वांझ रोगाचा प्रसार होतो.

- कोळी वांझ रोगाचे विषाणू वाऱ्याच्या दिशेने ५०० मीटर अंतरापर्यंत वाहून आणू शकतात.

अनुकूल घटक ः

- कमाल २५ ते ३० अंश आणि किमान १० ते १५ अंश सेल्सिअस तापमान. जास्त पाऊस व आर्द्रता रोगासाठी पोषक.

- उन्हाळ्यात आपोआप उगवलेल्या तुरीच्या रोपावर किंवा तुरीचा खोडवा घेतला असल्यास त्या ठिकाणी कोळी तग धरून राहतात. आणि पुढील हंगामात वाढणाऱ्या तूर पिकावर वांझ रोग आणण्यात कारणीभूत ठरतात.

रोगाची लक्षणे ः

- झाडाची उंची, फांद्यांची अपेक्षित वाढ होत नाही. झाड खुजे राहते.

- पानांचा आकार अनियमित आणि वेडावाकडा होतो. पाने आकसतात.

- किडीने पानांतील रस शोषल्यामुळे पाने निस्तेज हिरवी होतात.

- रोपावस्थेत प्रादुर्भाव झाल्यानंतर पानांवर प्रथम तेलकट पिवळे डाग पडतात. पाने आकाराने लहान राहून आकसतात. पाने पिवळी पडून झाडांच्या दोन पेरांतील अंतरदेखील कमी होते. त्यांना अनेक फुटवे फुटतात व झाडांची वाढ खुंटते.

- रोगग्रस्त झाडांना फुले व शेंगा लागत नाहीत. झाडे झुडपांसारखी होऊन शेवटपर्यंत हिरवी राहतात.

- बऱ्याच वेळा एकाच झाडाच्या काही फांद्यावर वांझ रोगाचा प्रादुर्भाव व इतर फांद्यावर शेंगादेखील लागलेल्या दिसतात. अशा झाडांना ‘अर्ध वंध्यत्व वांझ रोग’ असे म्हणतात.

- रोगाचा प्रादुर्भाव रोपावस्थेपासून ते पक्वतेपर्यंत कधीही आढळून येतो.

व्यवस्थापन ः

- शेतात व बांधावर असलेली मागील हंगामातील तुरीची झाडे काढून टाकावीत. तूर पिकाचा खोडवा घेऊ नये.

- रोगग्रस्त झाडे दिसताच त्वरित उपटून जाळून नष्ट करावीत.

रासायनिक नियंत्रण ः (फवारणी ः प्रतिलिटर पाणी)

- डायकोफॉल (१८.५ ईसी) २ मिलि किंवा

- फेनाझाक्वीन (१० ईसी) १ मिलि किंवा

- पाण्यात मिसळणारे गंधक (८० डब्ल्यूपी) २.५ ग्रॅम किंवा

प्रादुर्भाव दिसून आल्यानंतर त्वरित फवारणी करावी.

- डॉ. चांगदेव वायळ, ९४०५१८६३६६

डॉ. विश्‍वास चव्हाण, ९८६०२८३८१५

(कडधान्य सुधार प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Food Processing Industry : ‘माऊली’ ब्रॅंड उत्पादनांचा होतोय विस्तार

Mango Orchard Management : आंबा मोहोरताना घ्यावयाची काळजी

Postal Votes : पोस्टल मतांनी पटोलेंना तारले

Maharashtra Assembly Election Result 2024 : विदर्भात महायुतीला स्पष्ट कौल, तर महाविकास आघाडीला नाकारले

Jharkhand Assembly Election Result : झारखंडमध्ये पुन्हा हेमंत सोरेन सरकार

SCROLL FOR NEXT