Pollution Health Risks: देशात वायू प्रदूषणामुळे मृत्यूचे प्रमाण १८ टक्के असून ही गंभीर बाब असल्याची खंत हवामान प्रदूषणावरील एका कार्यशाळेत व्यक्त करण्यात आली आहे. वायू प्रदूषणात देश जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. पावसाळा संपला की हवेतील आर्द्रतेचे प्रमाण कमी होते. रस्त्यावरील धूळही वाढते. याच काळात देशाची राजधानी दिल्लीमध्ये हवेच्या प्रदूषणाने तेथील नागरिकांचे जगणे असह्य होते..२०१७ मध्ये तर पर्यावरण व प्रदूषण नियंत्रण अधिकारणीला दिल्लीत आरोग्य आणीबाणी घोषित करावी लागली. अलीकडच्या काही पाहणीत हवेच्या प्रदूषणात महाराष्ट्रातील मुंबई, पुणे ही शहरे देखील मागे नसल्याचे दिसून आले आहे. पीएम २.५ धूलिकण कार्सिनोजेनिक असल्याने श्वसनासाठी घातक असतात. हवेच्या प्रदूषणामुळे श्वसनाचे रोग, दमा, टीबी, कॅन्सर, हृदयरोग, स्मृतिभ्रंश, त्वचेचे विकार आदी आजारांचे प्रमाण वाढत असून त्यातून मृत्यूचे प्रमाणही वाढत आहे. हवेच्या प्रदूषणाची कारणे स्पष्ट आहेत. वाहनांतून बाहेर पडणारा धूर हवेच्या प्रदूषणात मोठ्या प्रमाणात भर घालतो..Air Pollution: वायू प्रदूषणामुळे देशात १८ टक्के मृत्यू.शहर परिसरात बहुतांश कारखाने औद्योगिक विषारी वायू बाहेर सोडत असतात. खराब रस्ते हेही हवेतील धूलिकणांचे प्रमाण वाढण्याचे एक प्रमुख कारण आहे. देशभरात रस्ते विकासाची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. यामुळे हवेतील धुळीचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. वाढत्या बांधकामांनी हवेचे प्रदूषण वाढते. पीक अवशेष जाळण्यानेही दिल्लीसारख्या शहरांना प्रदूषणाचा थोडा फार फटका बसत आला आहे..एकविसाव्या शतकामध्ये संपूर्ण मानवजातीपुढे सर्वांत मोठे आव्हान जागतिक तापमानवाढीचे आहे. तापमानवाढीबाबत संपूर्ण जगभर चिंता व्यक्त केली जाते. परंतु तापमानवाढीचे मुख्य कारण असणारे वायू प्रदूषण रोखण्याबाबत ठोस पावले मात्र उचलली जात नाहीत. भारत देश तर यामध्ये खूपच मागे आहे. आपल्याकडे विकासाच्या लालसेपोटी आणि आधुनिकतावाद, चंगळवाद यामुळे बदललेल्या जीवनशैलीच्या गरजा भागविण्यासाठी सुरू असलेल्या गोष्टींमुळे वायू प्रदूषण दिवसागणिक वाढत चालले आहे..Air Pollution: जनावरांमुळे होणारे वायुप्रदूषण कमी करण्याचे उपाय.अर्थात, हवेच्या वाढत्या प्रदूषणाला सर्वस्वी आपणच जबाबदार आहोत. एका पाहणीनुसार २०५० पर्यंत भारतीय रस्त्यांवर ६१.१ कोटी वाहने धावताना दिसतील आणि ही संख्या जगातील सर्वाधिक वाहनसंख्या असेल. वाढत्या वाहनसंख्येवर शासनाचे कसलेही नियंत्रण नाही. वास्तविक पाहता चार जणांच्या कुटुंबाकडे किती वाहने असावीत, याबाबत काही नियम असावेत का? याचा विचार करण्याची वेळ आता आली आहे..वाहनांची संख्या कमी करण्यासाठी शहरांमध्ये सिटी बस, लोकल-मेट्रो-मोनो रेल्वे अशा सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वाढवून लोकांना याचाच वापर करण्यासाठी आग्रह करायला हवा. हवेतील कार्बन डायऑक्साइड शोषण्याचे काम झाडांकडून केले जाते. धूळ झाडांकडून शोषली जात नसली तरी ती पानांवर चिकटून राहते. झाडांमुळे धूलिकणांचे प्रमाण कमी होण्यास मदत होते..असे असताना रस्त्यापासून ते इतरही अनेक विकासकामांसाठी झाडांची कत्तल सर्रास सुरू आहे. दरवर्षी कोट्यवधी वृक्ष लागवडीचे आकडे दिले जातात. परंतु प्रत्यक्षात त्यापैकी किती झाडे वाचतात, याचा लेखाजोखा कुठेही नाही. येथून पुढे औद्योगिक वसाहती शहरांभोवती विळखा घालणार नाहीत, हेही पाहावे लागेल. उद्योगाचे विकेंद्रीकरण करून ते ग्रामीण भागात न्यावे लागतील. पीक अवशेष जाळल्यानंतर होणारे हवेचे प्रदूषण रोखण्यासाठी त्यांचा वापर सेंद्रिय खते, वीजनिर्मितीसाठी करायला हवा. असे झाले तरच वायू प्रदूषणाला आळा बसून त्याद्वारे होणारा मृत्यूचा टक्का घटेल..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.