Brown fruit rot control in citrus fruits Agrowon
ॲग्रो गाईड

Brown Rot: संत्रा, मोसंबीवर ‘ब्राऊन रॉट’चा प्रादुर्भाव

ढगाळ वातावरण, पावसाची रिमझिम, अपुरा सूर्यप्रकाश, थंड हवा, अधिक आर्द्रता, कमी तापमान तसेच बागेतील ओलसर जमीनीमुळे या बुरशीचा प्रादुर्भाव होतो.

Team Agrowon

आंबिया बहारच्या संत्रा, मोसंबी फळांवर फायटोप्थोरा बुरशीचा प्रादुर्भाव होतोय. त्यामुळे पाने काळी पडणे, पानगळ होणे आणि फळांवर तपकिरी डाग अशी लक्षणं दिसून येत आहेत. ढगाळ वातावरण, पावसाची रिमझिम, अपुरा सूर्यप्रकाश, थंड हवा, अधिक आर्द्रता, कमी तापमान तसेच बागेतील ओलसर जमीनीमुळे या बुरशीचा प्रादुर्भाव होतो. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने बुरशीचा प्रादुर्भाव आणि उपाययोजना याविषयी पुढील माहिती दिली आहे.

बुरशीचा प्रादुर्भाव कसा ओळखावा ?

१. पानावरील चट्टे

जमिनीलगतच्या फांद्यावरील पाने व फळांना या बुरशीचा प्रादुर्भाव सगळ्यात आधी होतो. पाने टोकाकडून करपल्यासारखी दिसतात. ती मलूल होतात. अशी पाने हातात घेऊन त्यांचा चुरा केला की त्यांची घडी होते, मात्र पाने फाटत नाहीत. टोकाकडून झालेला प्रादुर्भाव पूर्ण पानावर होऊन पाने तपकिरी काळी पडतात. नंतर अशी पाने गळून झाडाखाली त्यांचा खच पडतो. फांद्यांवरची पानं गळून पडतात. झाड जणू खराट्यासारखे दिसते. परिणामी अकाली फळगळ होते. ही लक्षणे रोपवाटिकेमधील कलमामध्ये तसेच नुकत्याच लागवड केलेल्या कलमांवर सुद्धा दिसून येतात.

२) फळ कूज

पानांवर प्रादुर्भाव झाल्यानंतर जमिनी लगतच्या हिरव्या फळांवर तपकिरी करडे डाग पडतात. फळे एका बाजूने करपतात. पूर्ण फळ हे तपकिरी, काळ्या रंगाचे दिसते. फळे सडून गळतात. या फळसडीच्या अवस्थेला ब्राऊन रॉट किंवा तपकिरी रॉट म्हणतात. फळे खाली पडल्यानंतर फळांच्या पृष्ठभागावर पांढऱ्या बुरशीची वाढ दिसून येते. करड्या रंगाची फळे निरोगी फळात मिसळल्यास निरोगी फळेही सडतात.

नियंत्रण कसं करायचं?

  • खाली पडलेल्या पानांची आणि फळांची विल्हेवाट लावावी. ती शेतात तशीच राहू देऊ नयेत. अन्यथा या रोगाची तिव्रता वाढते. रोग मोठ्या प्रमाणावर पसरतो.

  • प्रतिबंधात्मक उपाय म्हणून संपूर्ण झाडावर फासिटील ए. एल. २.५ ग्रॅम किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड (५० डब्लू पी) ३ ग्रॅम प्रति लिटर पाणी घेऊन फवारणी करावी. झाडाच्या परिघामध्येसुद्धा फवारणी करावी. जेणेकरुन खाली पडलेल्या फळांवरील बुरशीचा नायनाट होईल. जमिनीतील सक्रिय बिजाणूंचा नायनाट होण्यासाठी मदत होईल. चांगले परिणाम मिळण्यासाठी या औषधामध्ये कोणतेही बुरशीनाशक, कीडनाशक आणि विद्राव्य खत मिसळू नये.

  • रासायनिक किडनाशकाच्या फवारणीनंतर १५ दिवसानंतर ट्रायकोडर्मा हार्जियानम अधिक सुडोमनास फ्ल्युरोसन्स १०० ग्रॅम प्रत्येकी प्रति झाड १ किलो शेणखतात मिसळून झाडाच्या परिघात जमिनीतून द्यावे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Union Budget: अन्नदाता शेतकरी पुन्हा एकदा वाऱ्यावर...!

Chief Secretary Review: नोंदणी, मुद्रांक विभागाचा मुख्य सचिवांकडून आढावा

Ajit Pawar Condolence Meeting: दादांच्या योगदानाबाबत बारामतीत कृतज्ञता व्यक्त

Natural Farming: नैसर्गिक शेतीसाठी साधन निर्मिती गरजेची: डॉ. नारनवरे

Union Budget Agri: शेतकऱ्यांना ‘नारळ’

SCROLL FOR NEXT