Indian Farming Agrowon
ॲग्रो गाईड

Power Of Attorney : मुखत्यारपत्र करताना काय काळजी घ्यावी?

मुखत्यारपत्र लिहिताना राजारामने जमिनीच्या खरेदी-विक्रीचे अधिकार देणारे सुद्धा कलम चतुराईने लिहून घेतले होते. एक वर्ष उलटल्यानंतर सुद्धा शंकरला कर्ज मिळाले नव्हते.

शेखर गायकवाड

शेखर गायकवाड

एका गावात शंकर नावाचा एक शेतकरी राहत होता. शंकरने स्वतःची जमीन बागायत करण्यासाठी कर्ज (Loan) काढायचे ठरवले. शंकरला पाइपलाइनसाठी कर्ज काढण्यासाठी अनेक वेळा तालुक्यातल्या बँकेत हेलपाटे मारावे लागले.

तालुक्याच्या गावात राहणारा शंकरचा एक जवळचा नातेवाईक राजाराम भेटला. शंकरने राजारामला सगळी हकिकत सांगितली. त्यावर राजाराम म्हणाला, की मी तुमचं मुखत्यारपत्र लिहून घेतो, म्हणजे तुम्हाला हेलपाटे मारायचा त्रास होणार नाही.

याचा मुख्य उद्देश जी जी कृती शंकरने उपस्थित राहून केली असती ती त्याच्या वतीने राजारामने करण्यास, करारावर सही करण्यास, गहाण खत करण्यास संमती देणे हा होतो! त्याप्रमाणे शंकरने राजारामला मुखत्यारपत्र लिहून देऊन अधिकार दिले.

मुखत्यारपत्र लिहिताना राजारामने जमिनीच्या खरेदी-विक्रीचे अधिकार देणारे सुद्धा कलम चतुराईने लिहून घेतले होते. एक वर्ष उलटल्यानंतर सुद्धा शंकरला कर्ज मिळाले नव्हते.

एक दिवस शंकरला गावातल्या एका माणसाने विचारले, की अरे, शंकर तू तुझी दोन एकर बागायत जमीन का विकलीस? त्यावर आश्‍चर्यचकित होऊन शंकर म्हणाला, ‘‘मी माझी जमीन नाही विकली! मी कशाला माझी जमीन विकू?’’ आणि मला माझी जमीन विकायचे कारणच काय?

त्यानंतर शंकरने तलाठ्याकडे धाव घेतली. शंकरने पूर्ण माहिती घेतली तेव्हा त्याला कळले, की शंकरचा नातेवाईक राजाराम याने शंकर कडून लिहून घेतलेल्या मुखत्यारपत्राच्या आधारे परस्पर तिसऱ्या व्यक्तीकडून पैसे घेऊन ती जमीन अन्य व्यक्तीला विकून पण टाकली होती.

मुखत्यारपत्रात जमिनीच्या खरेदी-विक्रीचे कलम चतुराईने राजारामने लिहून घेतल्यामुळे शंकर काहीही करू शकत नव्हता. शंकरला आता त्याच्या कृतीचा फार पश्‍चात्ताप झाला.

केवळ हेलपाटे मारायला नको म्हणून लिहून दिलेल्या दस्ताचा गैरवापर होईल असे त्याच्या मनीध्यानी पण नव्हते.

सांगायचे तात्पर्य म्हणजे कोणत्याही दस्तऐवजावर सही करण्यापूर्वी त्याचा काय अर्थ होतो हे व्यवस्थित तपासले पाहिजे. विशेषत: मुखत्यारपत्रासारखा दस्तऐवज तिऱ्हाईत व्यक्तीच्या नावे करताना अतिशय काळजी घेतली पाहिजे.

ईमेल- (shekharsatbara@gmail.com)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Water Crisis: अकोला परिमंडळात कृत्रिम जलसंकटाची भीती

Value-Added Products From Grapes: द्राक्षापासून मूल्यवर्धित पदार्थ

Mulberry Cultivation: वाशीम जिल्ह्यात दोनशे एकरांवर तुती लागवडीचे उद्दिष्ट

Importance Of Packaging For Safety: वाहतुकीमध्ये सुरक्षिततेसाठी पॅकेजिंगचे महत्त्व

Petrol Diesel Supply Normal: जालना जिल्ह्यात पेट्रोल-डिझेल पुरवठा सुरळीत; विक्रीवरील मर्यादा रद्द

SCROLL FOR NEXT