Banana Orchard Management Agrowon
ॲग्रो गाईड

Banana Orchard Management : अशी घ्या केळी बागेची काळजी

उघडीप दिलेल्या पावसाचे बऱ्याच ठिकाणी पुनरागमन झाले आहे. अशा लहरी प्रतिकूल हवामानात केळी बागेची काय काळजी घ्यावी याविषयी महात्मा फुले कृषी विद्यापीठाने पुढील माहिती दिली आहे.

Team Agrowon

राज्यात उन्हाचा चटका आणि उकाड्यात वाढ झाली आहे. यातच उघडीप दिलेल्या पावसाचे बऱ्याच ठिकाणी पुनरागमन झाले आहे. अशा लहरी प्रतिकूल हवामानात केळी बागेची (Banana Orchard Care) काय काळजी घ्यावी याविषयी महात्मा फुले कृषी विद्यापीठाने पुढील माहिती दिली आहे.

पाऊस जास्त झाला असल्यास बागेतून अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा. सतत पाऊस असल्यास व जमिनीतून किंवा ठिबक द्वारे खते देणे शक्य नसल्यास अशा परिस्थितीत फवारणी द्वारे खते द्यावीत.

सोसाट्याचा वारा, अतिवृष्टी बरोबरच वादळी वाऱ्यामुळे केळीची पाने फाटून प्रकाश संश्लेषण क्रियेचा वेग मंदावतो. वाऱ्यामुळे झाडे कोलमडूनही फार मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होते. हे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी केळी बागेभोवती दोन मीटर अंतरावर सजीव कुंपणाच्या दोन ओळी केळी लागवडीच्या वेळीच लावाव्यात. सजीव कुंपणासाठी शेवरी, बांबू, सुरू, गिरीपुष्प किंवा निरगुडी यांचा वापर करावा.

कमी तापमानात बागेत रात्रीच्या वेळी पाणीपुरवठा करावा. पहाटे बागेत ओला पाला पाचोळा जाळून धूर करावा.

- केळीच्या झाडाला पिक अवस्थेनुसार प्रति झाड २५० ते १००० ग्रॅम निंबोळी ढेप द्यावी.

- घडाला सहा टक्के सच्छिद्रतेचे पांढऱ्या प्लॅस्टिक बॅगेचे आवरण करावे.

- अति जास्त तापमानात शिफारशीप्रमाणे पाणीपुरवठा करावा. बागेत केळीची पाने व अवशेष, जुना गव्हाचा भुसा, उसाचे पाचट, सोयाबीनचा भुसा यांचा वापर करून सेंद्रिय आच्छादन करावे.

बाग सतत तणमुक्त ठेवावी. बाग स्वच्छ ठेवण्यासाठी उभी आडवी कोळपणी करावी. लागवडीनंतर तीन ते चार महिन्यापर्यंत अशी कोळपणी करता येते.

- दर दोन महिने अंतराने टिचणी बांधणी करावी. झाडांना मातीची भर द्यावी. केळीची पिल्ले धारदार कोयत्याने नियमित काढावीत. केळीचे रोगग्रस्त पाने कापून बागेबाहेर नेऊन नष्ट करावीत. हिरवी पाने कापू नयेत. झाडे पडू नये म्हणून गरजेप्रमाणे बांबूच्या काठ्या किंवा पॉलीप्रोपिलीनच्या पट्ट्यांच्या साह्याने झाडांना आधार द्यावा. घड पूर्ण निसवल्यावर केळफुल वेळीच कापावे.

केळी पिकासाठी ठिबक सिंचन अत्यंत उपयुक्त असून ठिबक सिंचनासाठी सूक्ष्मनलिका पद्धतीपेक्षा ड्रीपर किंवा इनलाईन ड्रीपरचा वापर करणे अधिक योग्य असते.

बाष्पीभवनाचा वेग, जमिनीची प्रतवारी आणि वाढीची अवस्था इत्यादी बाबींवर केळीची पाण्याची गरज अवलंबून असते. केळी लागवडीनंतर दुसऱ्या व चौथ्या महिन्यात इडिटीए जस्त आणि इडिटीए लोह यांची प्रत्येकी ५० ग्रॅम मात्रा दहा लिटर पाण्यात घेऊन फवारणी करावी. पाचव्या व सातव्या महिन्यात जमिनीतून झिंक सल्फेट १५ ग्रॅम आणि फेरस सल्फेट १५० ग्रॅम शेणखतात मुरवून प्रती झाड द्यावे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT