Water Conservation Agrowon
ॲग्रो गाईड

Water Conservation : जलसंवर्धनासाठी जैविक बांध फायदेशिर आहेत का?

Soil Conservation : कोरडवाहू शेतीत जास्तीत जास्त पावसाचे पाणी मुरावे यासाठी शेताच्या पृष्ठभागावरून वाहणारे पावसाचे पाणी अडविण्याकरीता समपातळी जैविक बांध घातले जातात.

Team Agrowon

Water Conservation Update : कोरडवाहू (Rainfed) शेतीत जास्तीत जास्त पावसाचे पाणी मुरावे यासाठी शेताच्या पृष्ठभागावरून वाहणारे पावसाचे पाणी अडविण्याकरीता समपातळी जैविक बांध (Biological Bunds) घातले जातात. विशेषत: जमिनीच्या उतारानुसार उतारास आडवे खस गवताचे बांध किंवा सुबाभळीचे बांध तयार केले जातात.

त्यामुळे पाण्यास अडथळा निर्माण होऊन पाणी जमिनीत मुरते, जमिनीतील पाण्याचा ओलावा टिकून राहतो. हे जैविक बांध कसे तयार कलेले जातात याची माहिती पाहुया.

जैविक बांध तयार करताना जैविक बांधात लावण्यात येणाऱ्या झाडा-झुडपांची लागवड दोन फुटांवर करावी. झाडांची उंची दोन फुटांपर्यंत ठेवावी.

जैविक बांधासाठी वापरात येणाऱ्या झाडांचा पाला-पाचोळा जमिनीवर टाकावा किंवा हिरवा चारा म्हणूनही त्याचा वापर करता येतो.

दोन जैविक बांधातील अंतर १२ ते १५ मीटर ठेवावे. जैविक बांधाची रुंदी ३० सें.मी. आणि उंची ३० ते ४५ सें.मी. ठेवावी. यापेक्षा जास्त झाल्यास त्याची छाटणी करावी.

उताराला आडवी मशागत जमिनीला नियमीत उतार असलेल्या क्षेत्रावर उताराला आडवी पेरणी करावी.

अशा जमिनीवर मशागतीची सर्व कामे जसे नांगरणे, वखरणे, कोळपणी करणे तसेच पेरणी यासारखी कामे उताराला आडवी केल्यास,

जमिनीच्या भुपृष्टावरून वाहणाऱ्या पाण्याला अडथळा निर्माण होतो व जास्तीत जास्त पावसाचे पाणी शेतात मुरण्यास मदत होते आणि जमिनीची धूप रोखण्यास मदत होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Rate Protest: ऊसदरावरुन राजू शेट्टी करणार कारखानदारांची कोंडी, पहिली उचल ३,४०० ते ३,४५० रुपये मान्य नाही

Jalyukt Shivar: ‘जलयुक्त’ची कामे कालमर्यादेत पूर्ण करा; गुप्ता

Crop Cutting Experiment: कापणी प्रयोगात विक्रीयोग्य सोयाबीनचे वजन ग्राह्य धरा

Heavy Rainfall: सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांवरील संकट अधिकच गडद

Raj Thackeray: 'काढ रे ते कापड...' म्हणत राज ठाकरेंनी दुबार मतदार असलेल्या याद्यांचा ढीगच दाखवला

SCROLL FOR NEXT