सिलिकॉनच्या वापराने नत्रयुक्त खतांची उपलब्धता २० ते ४० टक्के, स्फुरदयुक्त ४० ते ६० टक्के आणि पालाशयुक्त २० ते ३० टक्क्यांनी वाढते. योग्य प्रमाणात अन्नद्रव्यांचा पुरवठा झाल्यामुळे उत्पादनात निश्चितच वाढ होते. जगभरातील संशोधनानुसार सर्व पिकांमध्ये सिलिकॉनचा वापर फायदेशीर असल्याचे दिसून आले. संशोधकांच्या मते, प्रतिवर्षी हेक्टरी सुमारे २०० ते ८०० किलो सिलिकॉन जमिनीतून निघून जाते. पिकांना जमिनीतून सिलिकॉन उपलब्ध न झाल्यामुळे उत्पादनात घट, रोग व किडींचा प्रादुर्भाव, जमीन भेगाळणे, अन्नद्रव्यांचा ऱ्हास इत्यादी समस्या उद्भवतात. सिलिकॉनयुक्त खतांमधील सिलिकॉन डाय-ऑक्साईड पाण्यामध्ये विरघळते. त्या वेळी पाण्यासोबत त्याची अभिक्रिया होऊन तयार झालेल्या सिलिसिक आम्लाचे पिके शोषण करतात. कांदा पीक रासायनिक खतास विशेषतः नत्रास उत्तम प्रतिसाद देते. कांदा जमिनीतून सुमारे ६५ ते ९० किलो नत्र, ४५ ते ५० किलो स्फुरद व १३० किलो पालाशचे शोषण करते. जास्त उत्पादनासाठी हेक्टरी १०० किलो नत्र, ५० किलो स्फुरद व ५० किलो पालाश याप्रमाणे शिफारस करण्यात येते. जमिनीध्ये वापरलेले नत्र निचरा, बाष्पीभवन आणि पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून जाते. पिकाला ५० ते ६० टक्केच नत्र उपलब्ध होते. स्फुरदाचा जमिनीतील कॅल्शियमसोबत संयोग होऊन ८० टक्के स्थिरीकरण झाल्याने उपलब्धता कमी होते. पालाशची उपलब्धतादेखील ५० ते ६० टक्के एवढीच आहे. परंतु सिलिकॉनयुक्त खतांच्या वापरामुळे अन्नद्रव्याचे शोषण चांगल्या प्रकारे होते. परिणामी नत्रयुक्त खतांची उपलब्धता २० ते ४० टक्के, स्फुरदयुक्त ४० ते ६० टक्के आणि पालाशयुक्त २० ते ३० टक्क्याने वाढते. योग्य प्रमाणात अन्नद्रव्यांचा पुरवठा झाल्यामुळे उत्पादनात निश्चितच वाढ होते. रोग नियंत्रणासाठी सिलिकॉन उपयुक्तता १) फुलकिडे
२) कडा करपा व शेंडा करपा
कृषी विज्ञान केंद्र, बारामती, जि. पुणे येथे घेतलेल्या प्रयोगाअंती मिळालेले निष्कर्ष ः
कृषी विज्ञान केंद्राने बारामती तालुक्यातील पारवडी गावामध्ये काही शेतकऱ्यांच्या शेतावर घेतलेल्या चाचण्यांचे निष्कर्ष ः
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे २०१८ मध्ये सिलिकॉनचा हेक्टरी ३५० किलो वापर केल्यानंतर मिळालेले निष्कर्ष ः
चीनमध्ये २०१४ मध्ये ‘चायनीज स्प्रिंग ओनियन’ या कांद्याच्या दोन जातींवर सिलिकॉनच्या घेतलेल्या चाचणीचे निष्कर्ष ः
विविध संशोधनांअंती मिळालेले निष्कर्ष ः
संपर्क ः शिवाजी थोरात, ९८५००८५८११ (सदस्य - इंटरनॅशनल सोसायटी फॉर सिलिकॉन रिसर्च इन ॲग्रिकल्चर)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.