अतिपाण्यामुळे क्षारपड होतेय जमीन
अतिपाण्यामुळे क्षारपड होतेय जमीन 
ॲग्रो गाईड

अतिपाण्यामुळे क्षारपड होतेय जमीन

डॉ. श्रीमंत राठोड

क्षारपड-पाणथळ जमिनीची उत्पादनक्षमता वाढविण्यासाठी निचरा पद्धती, भूसुधारके, पीक फेरपालट आणि व्यवस्थापकीय उपायांचा एकत्रितपणे वापर करणे आवश्यक आहे. या जमिनीत लागवड करताना एकदल, द्विदल, नगदी पिके, हिरवळीची पिके इ. पिकांचा फेरपालटमध्ये समावेश करावा.

सांगली, कोल्हापूर, सातारा, सोलापूर, पुणे, नगर, नाशिक, जळगाव, नंदूरबार; विदर्भामध्ये वर्धा, अमरावती, अकोला आणि मराठवाड्यात औरंगाबाद, परभणी, नांदेड इ. जिल्ह्यांमध्ये क्षारपड - पाणथळ समस्येमुळे जमिनी नापीक होत आहेत. एकेकाळी प्रति हेक्‍टरी १५० ते २०० टन ऊस उत्पादन असणाऱ्या जमिनीत सध्या क्षारपडीमुळे केवळ ५० ते ६० टन ऊस उत्पादन मिळते. जमिनी क्षारपड - पाणथळ होण्यामध्ये अनियंत्रीत सिंचनाचा अतिशय महत्त्वाचा वाटा आहे. जमिनी क्षारपड - पाणथळ होण्याची कारणे नैसर्गिक कारणे ः

  • कमी पाऊस आणि अधिक बाष्पीभवनामुळे क्षारांचा निचरा व्यवस्थित होत नाही.  बाष्पीभवन क्रियेमुळे क्षार भूपृष्ठावर साचून जमिनी क्षारपड होतात.
  • मध्यम ते भारी काळ्या जमिनीची जास्त पाणी धरून ठेवण्याची तसेच निचरा क्षमता इतर जमिनीपेक्षा कमी असल्यामुळे अशा जमिनी लवकर पाणथळ आणि क्षारपड होतात.
  • नैसर्गिक ओढे, नाले यांची निचरा क्षमता कमी झालेली आहे.
  • उंच भागाकडून सखल भागाकडे पाण्याचे वहन झाल्यामुळे सखल भागातील जमिनी पाणथळ होतात.
  • कालवे, तलाव, लहान, मध्यम लघुपाटबंधारे प्रकल्पातून होणाऱ्या गळतीमुळे जमीन पाणथळ होतात.
  • मानवनिर्मित/ कृत्रिम कारणे ः

  • बागायती शेतीसाठी पाण्याचा अतिवापर.
  • ५ ते ७ टक्के लागवडीखाली असणाऱ्या उसासाठी ६० ते ६५ टक्के शेतीसाठी उपलब्ध असणारे पाणी वापरले जाते.
  • मचूळ/ खारवट पाण्याचा शेतीसाठी वापर.
  • पारंपरिक जलसिंचनाची ४० ते ५० टक्के कार्यक्षमता असल्याने जास्त पाण्याचा वापर. क्षारपड - पाणथळ जमिनी लागवडीखाली आणण्यासाठी उपाययोजना   
  • अ) विविध निचरा पद्धतींचा वापर ः

  • उघडे निचरा चर पद्धत, भूमिगत सच्छिद्र पाईप निचरा पद्धत,
  •  कमी खर्चीक मोल निचरा पद्धत.
  • ब) भूसुधारकांचा वापर ः

  • सेंद्रिय भूसुधारके ः क्षारपड - पाणथळ जमिनीसाठी ः शेणखत, गांडुळखत,
  • हिरवळीचे खत, पालापाचोळा इ.
  • रासायनिक भूसुधारके  ः  चोपण आणि क्षारयुक्त जमिनीसाठी ः  चोपण जमिनीतील सोडियम क्षारांना विद्राव्य बनवून निचरा पद्धतीद्वारे शेताबाहेर काढण्यासाठी जिप्सम, गंधक, आयर्न पायराईट, प्रेसमड यासारख्या रासायनिक भूसुधारकांचा वापर.
  • क) जमीन आणि पीक लागवडीचे व्यवस्थापन ः

  • जमीन समतल करणे
  • ठिबक सिंचनाचा वापर.
  • कठीण थर तोडण्यासाठी सबसॉयलर, मोल नांगराचा तीन वर्षांतून एकदा वापर.
  • फेरस सल्फेट, झिंक सल्फेट यासारख्या सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता पूर्ण करणे.
  • नत्रयुक्त खतांच्या मात्रा शिफारशीत खतापेक्षा २५ ते ५० टक्के वाढवून देणे.
  • पेरणी करताना शिफारशीत बियाणांपेक्षा २५ टक्के अधिक बियाणे वापरणे. कारण
  • क्षारपड जमिनीत बियाणे उगवण्याचे प्रमाण कमी असते.
  • पेरणी/ टोकणणी सरीच्या वर एक तृतीआंश आणि वरंब्यापासून खाली एक तृतियांश अंतरावर करावी.
  • एकदल, द्विदल, नगदी पिके, हिरवळीची पिके इ. पिकांचा फेरपालटामध्ये समावेश. ऊस, सोयाबीन, गहू, भात, कांदा, पालक, कापूस, शर्कराकंद, इ. पिके निवडावीत.
  • असे आहे क्षारपड   - पाणथळ क्षेत्र

  • जगातील २३० दशलक्ष लाख हेक्‍टर बागायती क्षेत्रापैकी ४५ दशलक्ष हेक्‍टर (१९.२ टक्के) क्षारपड.
  • भारतामध्ये बागायती क्षेत्राच्या १६.६० टक्के क्षेत्र क्षारपड.
  • भारतामध्ये २९.६ लाख हेक्‍टर क्षेत्र क्षारयुक्त, ३७.७ लाख हेक्‍टर चोपण, ४५ लाख हेक्‍टर क्षेत्र पाणथळ.
  • महाराष्ट्रात बागायती क्षेत्रापैकी १८-२० टक्के क्षेत्र क्षारपड - पाणथळ. सुमारे १.८४ लाख हेक्‍टर क्षेत्र क्षारयुक्त, ४.२३ लाख हेक्‍टर क्षेत्र चोपण,१.१० लाख हेक्‍टर क्षेत्र      पाणथळ.
  • जमिनीचे गुणधर्म क्षारयुक्त जमीन

  • सामू (पीएच) ः ८.५ पेक्षा कमी
  • विद्युत वाहकता  (इसी) डेसी सायमन /मिटर ः ४ पेक्षा जास्त.
  • विनिमययुक्त सोडियम ( इएसपी) ः १५ पेक्षा कमी.
  • जमिनीचा पृष्ठभाग ः पांढऱ्या क्षारांचा थर.
  • चोपण जमीन

  • सामू (पीएच) ः ८.५ पेक्षा जास्त
  • विद्युत वाहकता  (इसी) डेसी सायमन /मीटर ः ४ पेक्षा कमी
  • विनिमययुक्त सोडियम ( इएसपी) ः १५ पेक्षा जास्त.
  • जमिनीचा पृष्ठभाग ः राखेसारखा क्षारांचा थर.
  • क्षारयुक्त-चोपण जमीन

  • सामू (पीएच) ः ८.५ पेक्षा जास्त.
  • विद्युत वाहकता  (इसी) डेसी सायमन /मीटर ः ४ पेक्षा जास्त.
  • जमिनीचा पृष्ठभाग ः उन्हाळ्यात क्षारांचा पांढरा थर.
  •   नदीचे पाणी झाले प्रदूषित

  • गावातील तसेच उद्योगधंद्यातील सांडपाणी नदीच्या पाण्यात मिसळले जाऊन पाण्याची गुणवत्ता खराब होते. उन्हाळ्यामध्ये नदीतील पाण्याची पातळी कमी असते, अशावेळी नदीतील पाण्यामध्ये सांडपाण्याचे प्रमाण वाढते. उन्हाळ्यात पिकांना जास्त वेळा पाणी द्यावे लागते. अशावेळी नदीतील प्रदूषित पाणी शेतीसाठी वापरल्याने पाण्यातील दूषित घटक जमिनीमध्ये जातात. यामुळे जमिनी खराब होत आहेत. भाजीपाला पिकामध्ये क्षारांचे प्रमाण वाढून त्याचा मानवी आरोग्यावर विपरित परिणाम होत आहेत.
  • नदी- नाल्यात मिसळणारे ३० टक्के सांडपाणी शहरी भागातून.
  • केवळ २० टक्के सांडपाण्यावर प्रक्रिया, ८० टक्के पाणी नदी, नाल्यात थेट मिसळले जाते.
  • सांडपाण्यात ९९ टक्के पाणी, १ टक्के सेंद्रिय, रासायनिक पदार्थ विरघळलेल्या स्वरूपात.
  • सांडपाण्यात क्रिम्नोसेल्यूलोज, सेल्यूलोज, प्रथिने, स्निग्ध पदार्थ आणि इतर रासायनिक पदार्थ न विरघळलेल्या स्वरूपात. तसेच साखर, फॅटीॲसिड, अल्कोहोल, अमिनो ॲसिड आणि काही रासायनिक पदार्थ विरघळलेल्या स्वरूपात.
  • खेडेगावातील सांडपाण्यात सुमारे ३५० पीपीएम जैविक पद्धतीने कुजणारे पदार्थ, ५२ पीपीएम नत्र, ४५ पीपीएम पोटॅशियम, १६ पीपीपीएम फॉस्फरस.
  • सांडपाण्यात झिंक, क्रोमियम, निकेल, शिसे या सारखी जड मूलद्रव्ये असतात.
  • सांडपाण्यात सूक्ष्मजीव जंतू ( बुरशी, जीवाणू,विषाणू, प्रोटोझुआ) मोठ्या  प्रमाणात.
  • सांडपाण्याचा जमिनीवर परिणाम ः

  • सांडपाण्याचा शेतीसाठी वापर केल्याने जमिनीचा सामू, क्षारता, यांच्या प्रमाणात वाढ होते. या पाण्यामध्ये प्रामुख्याने नत्र, स्फुरद, पालाश, कॅल्शियम, सोडियम, सल्फर आयर्न तसेच झिंक, क्रोमियम, निकेल, शिसे यांचे प्रमाण जास्त असते. यामुळे जमीन नापीक होण्याचा धोका वाढतो.
  • सांडपाण्यातील काही घातक क्षार वनस्पती शोषतात. हे क्षार अन्नधान्याच्या माध्यमातून मानवी शरीरात जातात. त्यामुळे गंभीर आजार दिसू लागले आहेत.
  • संपर्क ः डॉ. श्रीमंत राठोड : ०२३३ - २४३७२८८  ( जलसिंचन व निचरा अभियांत्रिकी विभाग,कृषिसंशोधन केंद्र, कसबे डिग्रज, जि. सांगली)  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Agriculture Irrigation : 'शिरसाई'चे दहा दिवसांचे उन्हाळी आवर्तन

    Cotton Bales Production : खानदेशात यंदा २५ टक्के कापूसगाठी निर्मितीत घट

    Paddy Procurement : भरडाई रखडल्याने २१ लाख क्‍विंटल धान गोदामातच

    Water Scarcity : ‘हर घर नल से’ नाही, तर टँकरमधूनच पाणी

    Banana Market : रावेरातून केळीची रेल्वेने वाहतूक सुरू

    SCROLL FOR NEXT