वाळा लागवड 
ॲग्रो गाईड

वाळा लागवडीबाबत माहिती द्यावी.

औषधी व सुगंधी वनस्पती प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी

वाळ्याच्या सुगंधी तेलाचा वापर अत्तरे, सौंदर्य प्रसाधने, साबण उद्योगात मोठ्या प्रमाणावर केला जातो. हे तेल अन्य सुगंधी तेलांबरोबर (पाचौली, गुलाब, चंदन) उत्तम रीतीने मिसळते. वाळ्याची मुळे चटया, पंखे, टोपल्या बनविण्यासाठी वापरतात. वाळा (खस) गवताची जमिनीची धूप थांबविण्यासाठी लागवड करतात.

वाळा हे बहुवार्षिक गवत एक ते दोन मीटर उंच वाढते. याला भरपूर तंतू-मुळे असून, ती अतिशय खोलवर गेलेली असतात. मुळे सुवासिक असतात. पाने गवतासारखी, ३० ते ९० सें. मी. लांब असून, रंगाने फिकट हिरवी, वरून गुळगुळीत व कडांना कुसळे असतात. हलक्‍या ते भारी जमिनीमध्ये लागवड करता येते. तांबड्या व गाळाच्या जमिनीत मुळांची चांगली वाढ होत असून, मुळांमध्ये तेलाचे प्रमाण जास्त असते.

जून, जुलैमध्ये ६० ते ७५ सें. मी. अंतरावर सरी- वरंबे किंवा जमिनीचा उतार व मगदुरानुसार योग्य आकाराचे (२ x ४ मीटर) सपाट वाफे तयार करावेत. ७५ x ३० सें. मी. अंतरावर लागवड करावी. लागवडीसाठी एका वर्षाच्या गवतापासून आलेले फुटवे वापरावेत. लागवडीसाठी के. एस.- १, के. एस.- २ व सुगंधा या जाती निवडाव्यात. संपर्क ः ०२४२६ - २४३२९२ औषधी व सुगंधी वनस्पती प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Subsidy : २०२३ च्या कांदा अनुदानासाठी २८ कोटी रुपये मंजूर; शासन निर्णय प्रसिद्ध

Hydrogen Fuel cooking: आता हायड्रोजन इंधनावर स्वयंपाक शक्य

Heavy Rain: दमदार पावसाने ४६ हजार हेक्टरवरील पिकांना संजीवनी

Agriculture Success: तांत्रिक व्यवस्थापनातून फळबाग शेतीत समृद्धी

Dairy Business: दुग्ध व्यवसायाने पालटेल विदर्भाचे चित्र

SCROLL FOR NEXT