कांदा पीक संरक्षण  
ॲग्रो गाईड

कांदा पीक संरक्षण

डॉ. विजय महाजन

रोग नियंत्रण : 

तपकिरी करपा : 

  • हा एक बुरशीजन्य रोग असून, प्रादुर्भाव झाल्यावर पानांवर पिवळसर, तपकिरी रंगाचे लांबट चट्टे बाहेरच्या बाजूला दिसतात. चट्ट्यांचा आकार वाढत जाऊन पाने सुकतात. 
  • फुलांचे दांडे मऊ होऊन वाळून मोडतात.
  • नियंत्रण : 

  • दर १० ते १५ दिवसांच्या अंतराने  ०.२ टक्के कार्बेन्डाझिमची फवारणी करावी किंवा ३ ग्रॅम मॅंकोझेब प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. द्रावणात सर्फेक्‍टंटचा वापर करावा.
  • जांभळा करपा : 

  • हा बुरशीजन्य रोग पीक वाढीच्या कोणत्याही अवस्थेत येतो. पानावर सुरवातीस खोलगट, लांबट पांढुरके चट्टे पडतात. चट्ट्यांचा मधला भाग सुरवातीस जांभळट व नंतर काळपट होतो. 
  • चट्टे पान किंवा फुलांच्या दांड्यावर  दिसतात. चट्टे वाढून एकमेकात मिसळून पाने करपून वाळतात.
  • ३० ग्रॅम मॅंकोझेब किंवा २० ग्रॅम कार्बेन्डाझिम  किंवा २० ग्रॅम क्‍लोरोथॅलोनील प्रति १० लिटर पाण्यात मिसळून १५ दिवसाच्या अंतराने आलटून-पालटून फवारणी करावी. द्रावणात सर्फेक्‍टंटचा वापर करावा.
  • बुरशीनाशकांचा वापर :   

    बीजप्रक्रिया : प्रति किलो बियाणे ट्रायकोडर्मा  - चार ग्रॅम थायरम किंवा कॅप्टन -  तीन ग्रॅम 

    फवारणी
    बुरशीनाशक  प्रमाण प्रति लिटर पाणी 
    मॅंकोझेब   २.५ ग्रॅम
    क्‍लोरोथॅलोनील   २ ग्रॅम
    कार्बेन्डाझिम    १ ग्रॅम
    प्रोपिकोनॅझोल   १ मि.लि.
    कॉपर ऑक्‍सिक्‍लोराईड     ३ ग्रॅम

    कीड नियंत्रण : 

    फुलकिडे : 

  • फुलकिडे दिवसा पानाच्या बेचक्‍यात लपून राहतात. रात्री किंवा सकाळी पानातील अन्नरस शोषतात.  यामुळे पातीवर पांढरे ठिपके पडून रोपांची पाने वेडीवाकडी होतात. पानांना इजा झाल्यास कांदा नीट पोसत नाही. 
  • पिकाच्या कोणत्याही अवस्थेत प्रादुर्भाव होतो. या किडीचा प्रादुर्भाव झाल्यास रोगाचे प्रमाण देखील वाढते.
  • रोपांच्या पुनर्लागवडीअगोदर फोरेट (१० जी) एकरी ४ किलो जमिनीत मिसळावे किंवा कार्बोसल्फान (२५ ई. सी.)  १.५ मि.ली. प्रति लिटर पाण्यात मिसळून या द्रावणात रोपांची मुळे दोन तास बुडवून लागवड करावी. यामुळे २० ते २५ दिवसापर्यंत किडींपासून संरक्षण होते. 
  • किडीच्या प्रादुर्भावानुसार १० ते १५ दिवसांच्या अंतराने डायमेथोएट १० मि.लि. किंवा सायपरमेथ्रीन (१० ई.सी.) ५ मि.लि. प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.  फवारणीच्या द्रावणात सर्फेक्‍टंट मिसळावा. 
  • कीडनाशकांची आटलटून पालटून फवारणी करावी.
  • कीटकनाशकांचा वापर
    कीटकनाशक      प्रमाण प्रति लिटर पाणी   कीड 
    कार्बोसल्फान  ( २५ इ.सी)   २ मि.लि.   फुलकिडे
    सायपरमेथ्रीन ( १० इसी) ०.५ मि.लि.  फुलकिडे
    डायमेथोएट  ( ३० इ.सी.)     १ मि.लि.  फुलकिडे
    प्रोफेनोफॉस (५० इसी)  १ मि.लि.  फुलकिडे
    ऑक्सीडिमेटॉन मिथाईल (२५ इ.सी.)  २ मि.लि.  फुलकिडे
    लॅम्बडा सायहॅलोथ्रीन     ०.५ मि.लि.      फुलकिडे
    डायकोफॉल  ( १८ इसी)  २ मि.लि.    लाल कोळी
    इथिऑन   २ मि.लि.   लाल कोळी

    - डॉ. विजय महाजन संपर्क : ०२१३५ - २२२०२६  (लेखक राष्ट्रीय कांदा व लसूण संशोधन संचालनालय,  राजगुरुनगर, जि. पुणे येथे कार्यरत आहेत.)

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Farmer Welfare: निघोज फलोद्यान सहकारी संस्थेचा कारभार शेतकरी हिताचा: प्रदीप वळसे

    Kusum Solar Pump Complaints: कुसुम सौरपंपांबाबत शेतकऱ्यांच्या तक्रारी; लाभार्थ्यांसाठी विशेष कार्यशाळेचे आयोजन

    Panand Road Development: पाणंद रस्त्यांची कामे दर्जेदार करा; सुनेत्रा पवार यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

    Fertilizer Dealers Protest: खत विक्रेत्यांचे आंदोलन बेकायदेशीर; कृषी विभागाची भूमिका

    Krushimitra Recruitment Scam: कृषिमित्र भरती रॅकेट प्रकरणी फौजदारी कारवाईचे आदेश

    SCROLL FOR NEXT