बांबू लागवड 
ॲग्रो गाईड

बांबू लागवड

वनशास्त्र महाविद्यालय, दापोली, जि. रत्नागिरी

प्रश्न : बांबू लागवडीविषयी माहिती द्यावी. 

उत्तर : बांबू लागवडीसाठी उन्हाळ्यात ३ x ३ मीटर अंतरावर आखणी करून कंदापासून लागवड करण्यासाठी ६० x ६० x ६० सें. मी. आकाराचे खड्डे खोदून ठेवावेत. रोपापासून लागवड करावयाची असल्यास ३० x ३० x ३० सें. मी. आकाराचे खड्डे खोदावेत.     कंदाचा आकार मोठा असेल, तर त्यानुसार खड्ड्याचा आकार वाढवावा. पावसाळ्याच्या सुरवातीस खड्ड्यात चांगली माती, २५० ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट मिसळावे. खड्ड्यामध्ये कंद, पॉलिथिन पिशवीत वाढलेली रोपे किंवा गादी वाफ्यावर वाढविलेली रोपे रोपांच्या मुळांना इजा होणार नाही, अशा तऱ्हेने मातीसह काढून लावावीत.

    बांबूस पाणथळ जमीन चालत नाही, त्यामुळे पावसाळ्यात खड्ड्यात पाणी साठणार नाही याची काळजी घ्यावी.बांबू रोपांची पावसाळ्यात लागवड झाल्यानंतर पहिल्या वर्षी डिसेंबर ते मे महिन्यात लागवडीस पाणी द्यावे. निंदणी व भर देण्याचे काम लागवडीपासून तीन वर्षांपर्यंत करावे.     दर वर्षी पावसाळ्याच्या सुरवातीस प्रत्येक रोप/कंदाला १०० ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट व २५ ग्रॅम युरिया ही खते द्यावीत. त्यानंतर दोन महिन्यांनी हीच मात्रा पुन्हा द्यावी.     कंदापासून लागवड केल्यास चार ते पाच वर्षांपासून उत्पादनास सुरवात होते. बांबूची लागवड जर रोपापासून केली, तर सहा ते आठ वर्षांनी उत्पादन मिळण्यास सुरवात होते. संपर्क : ०२३५८- २८२७१७ वनशास्त्र महाविद्यालय, दापोली, जि. रत्नागिरी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rain Crop Damage: एका दिवसात ८४६८ हेक्टरला फटका

Ahilyanagar Crop Damage: अहिल्यानगरमध्ये पूर्वमोसमी पावसाचा पिकांना फटका

Food Processing License: अन्नप्रक्रिया परवाना नूतनीकरणाची अट रद्द

Revenue Department: शासकीय तिजोरीत ६१ हजार कोटी रुपयांचा महसूल जमा

Lemon Price Drop: ऐन उन्हाळ्यात लिंबांच्या दरात घसरण

SCROLL FOR NEXT