Fruit Market Impact: उन्हाळ्याच्या तोंडावर चांगला दर मिळणाऱ्या लिंबाला यंदा मात्र विपरीत परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. गेल्या काही दिवसांतील गॅस टंचाई आणि त्यानंतर झालेल्या अवकाळी पावसाचा लिंबाच्या बाजारावर मोठा परिणाम झाला आहे. परिणामी, ऐन हंगामातच लिंबाची मागणी निम्म्याने घटली असून दरातही लक्षणीय घसरण झाली आहे..पुणे मार्केटयार्डात गेल्या पंधरा दिवसांत लिंबाच्या गोणीमागील दरात तब्बल ७०० रुपयांनी घट झाली आहे. सध्या दर्जा व आकारानुसार प्रति गोणी ५०० ते १८०० रुपये असा दर मिळत आहे. त्यामुळे उत्पादन व वाहतूक खर्चही निघणे कठीण झाले असून उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत..Cotton Market: आगामी हंगाम कापसास पोषक?.या बाजारात प्रामुख्याने सोलापूर व अहिल्यानगर जिल्ह्यांतून लिंबाची आवक होते. सध्या दररोज सुमारे ६०० ते ८०० गोण्यांची आवक होत आहे. एका गोणीत आकारानुसार २०० ते ५०० लिंबे असतात. हंगामानुसार ही आवक सामान्य असली तरी मागणीत झालेली घट ही चिंतेची बाब ठरत आहे, अशी कैफियत शेतकऱ्यांनी मांडली..Lemon Rate: अमरावतीत लिंबाला ६००० ते ७००० रुपये दर.लिंबाचे प्रमुख ग्राहक हॉटेल्स व खानावळी असून गॅस टंचाईमुळे या व्यवसायांवर परिणाम झाला आहे. परिणामी, मोठ्या प्रमाणावर होणारी खरेदी थांबली आहे. घरगुती ग्राहकांकडून होणारी मर्यादित मागणी बाजाराला आधार देऊ शकत नाही. त्यामुळे गाळ्यावर लिंबाचा साठा वाढत असून विक्री मंदावली आहे, असे निरीक्षण विक्रेत्यांनी नोंदवले. एकंदरीत, ऐन उन्हाळ्यात अपेक्षित नफा न मिळाल्याने लिंब उत्पादक शेतकरी हवालदिल झाले असून परिस्थिती सुधारण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे..उन्हाळ्यात लिंबाला कमी भाव मिळण्याची ही इतिहासातील पहिलीच वेळ आहे. कोरोना काळातही इतकी कमी मागणी नव्हती. मात्र, गॅस टंचाईमुळे हॉटेल, खानावळ बंद झाल्याचा फटका बसला आहे.रोहन जाधव, लिंबाचे व्यापारी, मार्केट यार्ड.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.