Impact of Unseasonal Rain: अहिल्यानगर जिल्ह्यातील बहुतांश भागात पूर्वमोसमी पावसाने गेल्या काही दिवसांपासून नुकसान सुरूच आहे. गुरुवारी (ता. २) सायंकाळी गारपीट, वादळी पावसाने कोपरगाव तालुक्याच्या पश्चिम भागात काढणीला आलेल्या कांदा, गहू, भाजीपाला, फळांचे मोठे नुकसान केले. पाथर्डी, पारनेर, संगमनेर तालुक्यांत पावसाने नुकसान होत आहे..जिल्ह्यामध्ये गेल्या आठवडाभरात झालेल्या पावसाने बुधवार (ता. १) पर्यंत सुमारे ३२ हजार शेतकऱ्यांच्या १८ हजार हेक्टर क्षेत्रावरील शेतीपिकांचे नुकसान झाले आहे. त्यात गुरुवारी (ता. २) सायंकाळी पुन्हा कोपरगाव, पाथर्डी, संगमनेर भागांतील अनेक गावांना पावसाचा फटका बसला. प्रामुख्याने कोपरगाव तालुक्यातील पश्चिम भागात असलेल्या मळेगाव थडी,.Pre Monsoon Rain: नेवासा, पाथर्डी तालुक्यांत पूर्वमोसमी पावसाचा तडाखा.रांजणगाव देशमुख, कोळपेवाडी, शहापूर, बहाद्राबाद, बहादरपूर, पाथरे, मायंगाव देवी, धामोरी, सोनारी, सवंदे, चासनळी आदींसह अन्य भागांत जोरदार पाऊस, वादळ, गारपीट झाली. कोपरगाव तालुक्यात रब्बी कांद्याचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. यंदा रब्बी आणि उन्हाळी मिळून जवळपास १३ हजार हेक्टरच्या आसपास कांदा, सोळा हजार हेक्टरच्या आसपास गव्हाचे क्षेत्र आहे. सध्या बहुतांश कांदा, गहु काढणीला आलेला आहे..गहू काढणी सुरू असली तरी मजुरांच्या टंचाईने आणि काढणी यंत्रही वेळेवर उपलब्ध होत नसलेल्या त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांचे नुकसान केले आहे. कृषी विभागातील अधिकाऱ्यांच्या मते या भागात पाऊस गारपिटीने ३० ते ३५ हजार हेक्टरवर नुकसान झाले आहे..Nashik Rain Damage: वादळी वाऱ्यासह गारपिटीचा पुन्हा तडाखा .साधारण १ एप्रिलपासून कांदा काढणीला सुरुवात होते. बहुतांश कांदा काढणीला आलेला आहे. मात्र या पावसाने सुमारे ९० टक्के नुकसान केले आहे. महसूल व कृषी विभागाचे कर्मचारी पाहणी करत आहेत. पंचनामे केली जातील असे तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे यांनी सांगितले..सरसकट पंचनाम्यांची मागणीकोपरगाव तालुक्यासह संगमनेर, पाथर्डी, अकोले भागांत झालेल्या पूर्वमोसमी पावसाने मोठी हानी केली आहे. हातातोंडाशी आलेल्या घास हिरावला आहे. प्रामुख्याने कांदा, गहू, फळपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे आर्थिक कोंडीत शेतकरी सापडला असल्याने सरसकट पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.