water planning is important in melon crop  
ॲग्रो गाईड

खत, पाणी नियोजनातून दर्जेदार खरबूज उत्पादन..

वाय. एल. जगदाळे, डॉ. सैय्यद शाकीर अली

माती परीक्षण अहवालानुसार खरबूज पिकात खत नियोजन करावे. फळधारणेनंतर व फळ वाढेपर्यंत एक सारख्या प्रमाणात पाणी द्यावे. फळ परिपक्वतेवेळी पाण्याचे प्रमाण कमी करावे. त्यामुळे फळांमधील साखरेचे प्रमाण व गराचे प्रमाण उत्तम राहते. खरबूज लागवडीसाठी ठिबक सिंचन पद्धत अवलंबवावी. साधारणतः सात फुटांवर लॅटरल असावी. इनलाईन ड्रिपर १.५ फुटावर असावा. या पद्धतीमध्ये चोकअप होण्याचा त्रास नसतो. ठिबक सिंचनासाठी ३० सेमी च्या अंतरावर इमीटर (ठिबक) असलेल्या इनलाईन लॅट्ररल्स (दोन लिटर प्रति तास क्षमतेच्या) वापराव्यात. फळधारणेनंतर एक सारख्या प्रमाणात पाणी द्यावे. पाण्याची बचत, तण नियंत्रण, खतांची बचत तसेच काहीशा प्रमाणात किडींचे नियंत्रण होण्यासाठी खरबूज लागवडीपूर्वी मल्चिंग पेपर अंथरावा. गादीवाफ्यावर ठिबक अंथरल्यावर १.२५ मीटर रुंद आणि ४०० मीटर लांब प्रती रोल (पेपरची जाडी ३० मायक्रॉन) मल्चिंग पेपर अंथरावा. यामुळे जमिनीचे तापमान, आर्द्रता अनुकूल राहून पांढऱ्या मुळांची वाढ उत्तम होते. एकरी पेपरचे ४-५ रोल लागतात. खत व्यवस्थापन

  • लागवडीपूर्वी ५०ः५०ः५० किलो नत्र, स्फुरद, पालाश प्रति हेक्टरी द्यावे. लागवडीनंतर एक महिन्याने ५० किलो प्रति हेक्टर नत्र खताची मात्रा द्यावी. माती परीक्षण अहवालानुसार खत नियोजन करावे.
  • टीपः जमिनीच्या मगदुरानुसार व माती परीक्षण अहवालानुसार खतांची मात्रा द्यावी. छाटणी (प्रुनिंग)

  • वेलीची वाढ एक सारखी होऊन पानाचा आकार मोठा होण्यासाठी, कीड व रोगास वेलाची प्रतिकार क्षमता वाढविण्यासाठी नको असलेला वेलीचा भाग म्हणजे मध्यभागाचा शेंडा, अनावश्‍यक बगल छाटून टाकणे गरजेचे असते. यामुळे फळांचा आकार, रंग, चव, आकर्षकपणा व वजन यामध्ये फायदेशीर बदल होतो.
  • पाणी व्यवस्थापन

  • मल्चिंगवर लागवड असेल तर ठिबकच्या सहाय्याने जमिनीच्या मगदुरानुसार पाण्याचे नियोजन करावे. फळधारणेनंतर व फळ वाढेपर्यंत एक सारख्या प्रमाणात पाणी द्यावे. फळ परिपक्वतेवेळी पाण्याचे प्रमाण कमी करावे. त्यामुळे फळांमधील साखरेचे प्रमाण व गराचे प्रमाण उत्तम राहते. पिकाचा कालावधी ८०-१०० दिवसांचा असतो.
  • फळांची काढणी व उत्पादन

  • फळ पिकू लागल्यावर फळांचा मधूर वास येतो. फळांच्या सालीचा रंग बदलतो. फळे जास्त जाळीदार होतात. जाळीच्या मधील जागा पिवळसर होते.  
  • सुधारीत पद्धतीने लागवड केल्यास २०-२५ टन प्रति हेक्‍टरी खरबुजाचे उत्पादन मिळते.  
  • कृषी विज्ञान केंद्र, बारामतीने २०११-२०१२ पासून खरबूज लागवडीमध्ये रोपवाटिका मल्चिंग बेडवर लागवड ठिबकद्वारे पाणी व खत व्यवस्थापन या पद्धतीचा वापर करून शेतकऱ्यांच्या क्षेत्रावर खरबुजाचे एकरी १०-१२ टन इतके उत्पादन घेतले जाते.
  • संपर्कः वाय. एल. जगदाळे, ०२११२ २५५४२७ (कृषी विज्ञान केंद्र, बारामती, जि. पुणे)

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Tractor GST Reduction : ट्रॅक्टरचे दर साठ हजारांपर्यंत घटणार

    Lemon Rate : बाजारात लिंबाच्या दरात मोठी घट

    IoT Smart Farming : 'छत्रपती'च्या कार्यक्षेत्रात स्मार्ट फार्मिंग

    Rain Forecast Maharashtra : पूर्व विदर्भात विजांसह पावसाची शक्यता

    Chhattisgarh Urea Supply: छत्तीसगडमध्ये शेतकऱ्यांना दिलासा; केंद्राने ६० हजार मेट्रिक टन यूरिया मंजूर केला

    SCROLL FOR NEXT