fruit fly and fruit sucking moth infestation on citrus
fruit fly and fruit sucking moth infestation on citrus 
ॲग्रो गाईड

किटकांमुळे होणाऱ्या फळगळवरील उपाययोजना

डॉ. योगेश इंगळे, डॉ. दिनेश पैठणकर

फळगळतीच्या कारणांमध्ये अपुरे पोषण, रोग व कीड इ. घटकांचा समावेश असतो. त्यातील किटकजन्य फळगळ ओळखून करावयाच्या  उपाययोजनांची माहिती घेऊ. लिंबूवर्गीय फळझाडांवर प्रादुर्भाव करणाऱ्या कीटकांपैकी प्रामुख्याने फळातील रस शोषक पतंग, फळमाशी, सिट्रस सिला व कोळी या किडींमुळे फळगळ दिसून येते. रस शोषक पतंग व फळमाशी या दोन मुख्य किडींमुळे सर्वाधिक फळगळ होते. या किडींसाठी उपाययोजना करणे गरजेचे ठरते.  फळातील रस शोषक पतंग  या किडीमुळे सर्वाधिक फळगळ ऑगस्ट ते ऑक्टोबर महिन्यात दिसून येते. या किडीचा पतंग सायंकाळी सक्रिय होतात. पक्व होत असलेल्या फळाला सुईसारख्या सोंडेद्वारे छिद्र करून रस शोषून घेतात. छिद्र पडलेल्या जागेतून रोगजंतूचा शिरकाव होऊन फळ सडण्यास सुरुवात होते. फळे गळून पडतात. अशी फळे दाबल्यास छिद्रातून आंबलेला रस बाहेर येतो. गळलेले फळ पूर्णतः सडते. त्याला दुर्गंधी येते. त्यावर अनेक छोट्या माश्या घोंगावू लागतात.  फळमाशीमुळे होणारी फळगळ प्रौढ मादी फळाच्या सालीखाली एक वा अनेक अंडी घालते. तीन ते पाच दिवसांत अंडी उबून मळकट पांढऱ्या रंगाच्या लहान पाय नसलेल्या अळ्या बाहेर पडतात. या अळ्या फळामध्ये शिरून त्यातील रस व गर खाऊन टाकतात. फळे खराब होतात. अंडी घालताना पडलेल्या छिद्रातून अन्य रोगजंतूचा शिरकाव होतो. तिथे पिवळे डाग पडतात. अकाली फळगळ होते. फळ दाबल्यास फळातून छिद्रे असलेल्या जागेतून पिचकारीसारखे रसाचे फवारे उडतात.  किडींमुळे होणारी फळगळ रोखण्यासाठी उपाययोजना

  • फुले येतेवेळी सिट्रस सिला या किडीचा प्रादुर्भाव झाल्यास, फवारणी प्रति लिटर पाणी डायमेथोएट २ मिली किंवा इमिडाक्लोप्रीड ०.५ मिली. १५ दिवसाच्या अंतराने दोन फवारण्या कराव्यात.
  • रसशोषक पतंगाकरिता विषारी आमिषे तयार करून बागेत ठेवावी. मॅलेथिऑन (५० ईसी) २० मिली अधिक  २०० ग्रॅम गूळ अधिक खाली पडलेल्या फळांचा रस ४०० ते ५०० मिली प्रति २ लिटर पाणी या प्रमाणे विषारी आमिष तयार करावे. विषारी आमिष रुंद तोंडाच्या  बाटल्यात टाकून प्रत्येक २५ ते ३० झाडांमध्ये एक या प्रमाणात ठेवावे. 
  • बागेत १ दिवसाआड सायंकाळी ७ ते रात्री १० या दरम्यान ओलसर गवत पेटवून व त्यावर कडुनिंबाच्या ओल्या फांद्या किंवा पाने ठेवून धूर करावा. 
  • संत्रा बागेभोवती असलेल्या गुळवेल, वासनवेल, चांदवेल इ. तणाचा नाश करावा. 
  • किडींचा प्रादुर्भाव दिसून येताच निंबोळी अर्क ५ टक्के किंवा निम तेल १० मिली प्रति लिटर पाणी किंवा ॲझाडिरेक्टिन (१० हजार पीपीएम) २ ते ३ मि.लि. प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. 
  • रात्रीच्या वेळेस बागेत तीव्र झोताचे टॉर्च लावून पतंग पकडावेत. ते रॉकेल मिश्रित पाण्यात टाकून नष्ट करावेत.
  • फळमाशीच्या नरांना आकर्षित करण्याकरिता फळमाशी सापळे प्रती हेक्टरी २५ या प्रमाणात ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून किंवा तोडणीच्या साधारण २ महिने आधीपासून बागेत झाडांवर टांगून ठेवावेत.
  • बागेत खाली पडलेली फळे वेचून खड्ड्यात पुरून बाग स्वच्छ ठेवावी. 
  • संपर्क- डॉ. योगेश इंगळे, ९४२२७६६४३७, डॉ. दिनेश पैठणकर, ९८८१०२१२२२ (अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्प (फळे), डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.) (नोंद:* संशोधनावर आधारित ॲग्रेस्को शिफारस; लेबल क्लेम नाही)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

    Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

    Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

    Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय? कापूस, सोयाबीन, गहू, टोमॅटो यांचे दर काय आहेत?

    Sugar Quota : मे महिन्यात साखरेचा कोटा वाढला, घाऊक बाजारात मंदीची लाट

    SCROLL FOR NEXT