मोसंबीवरील साल खाणारी अळी, कोळी, रसशोषक पतंग 
ॲग्रो गाईड

मोसंबीवरील साल खाणारी अळी, कोळी, रसशोषक पतंग

मराठवाड्यातील अनेक भागात मोसंबी, संत्रा फळपिकावर साल खाणारी अळी, कोळी आणि रसशोषक पतंगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. वेळीच सावध होऊन या किडीच्या प्रादुर्भावाची लक्षणे ओळखून तातडीने व्यवस्थापनासाठी उपाय योजावेत.

डॉ. संजोग बोकन, डॉ. अनंत लाड

मराठवाड्यातील अनेक भागात मोसंबी, संत्रा फळपिकावर साल खाणारी अळी, कोळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. काही भागांत कोळी किडीने आर्थिक नुकसान पातळीही ओलांडली आहे. कोळी प्रादुर्भाव वर्षभर दिसून येत असला, तरी प्रामुख्याने ऑगस्ट ते ऑक्टोबरदरम्यातन त्याचे प्रमाण जास्त असते. वेळीच सावध होऊन या किडीच्या प्रादुर्भावाची लक्षणे ओळखून तातडीने व्यवस्थापनासाठी उपाय योजावेत. साल खाणारी अळी  ओळख 

  • मादी पतंग मे-जूनमध्ये झाडाच्या सालीवर अंडी घालते. अंड्यातून ८ दिवसांनंतर अळी बाहेर येते.
  • अळी अवस्था ८ ते १० महिन्यांची असते. अळी काळपट रंगाची असून, ऑगस्ट ते मार्च महिन्यापर्यंत सक्रिय असते.
  • कोष अवस्था ३० ते ४० दिवसांची असते.
  • पतंग कालावधी ३-४ दिवसांचा असतो.
  • प्रादुर्भावाची लक्षणे : अळी दिवसा खोडात लपून राहते व रात्रीच्या वेळी खोड पोखरते. सुरुवातीस फांद्या, खोड तसेच खोडापासून फांद्या निघण्याच्या जोडावर साल कुरतडून खाल्लेली व तेथे जाळी झालेली दिसते. ही जाळी अळीने कुरतडलेल्या सालीचा भुगा, अळीची विष्ठा व लाळ यापासून तयार होते. जाळ्या खाली राहून अळी साल खाते व खोडात छिद्र करते. त्यामुळे फांद्या वाळतात.
  • व्यवस्थापन 

  • प्रादुर्भावग्रस्त झाडाच्या फांद्या व खोडावर अळीने तयार केलेल्या जाळया काढून साफ कराव्यात.
  • छिद्रातील अळी जाड अणकुचीदार तारेचा वापर करून मारावी.
  • कोळी ओळख कोळी ही अष्टपाद वर्गातील कीड असून, अतिसूक्ष्म आकारामुळे सहजासहजी डोळ्याने दिसत नाही. कोळी प्रौढ व पिले पिवळसर असून, त्यांच्या फक्त आकारात फरक असतो. कोळी पानांच्या शिराजवळ व फळाच्या सालीवर अंडी घालते. प्रादुर्भावाची लक्षणे प्रौढ व पिले पाने, फळातील रस शोषतात. पानावर राख किंवा धूळ साचल्याप्रमाणे पानांचा पृष्ठभाग धुळकट दिसतो. जास्त प्रादुर्भावात करड्या रंगाचे चट्टे पडून तो भाग वाळतो. यामुळेच शेतकरी ‘लाल्या’ या नावानेही ओळखतात. प्रादुर्भावामुळे अनियमित आकाराची फळे तयार होऊन फळांची प्रत खालावते. फळांना योग्य दर भेटत नाही. व्यवस्थापन  कोळी प्रादुर्भाव दिसताच, फवारणी प्रति लिटर पाणी डायकोफॉल (१८.५ ईसी) २.७ मिलि किंवा डायफेन्थुरॉन (५० डब्ल्यूपी) २ ग्रॅम. दुसरी फवारणी आवश्यकता असल्यास १५ दिवसांच्या अंतराने करावी. पाने पोखरणारी अळी (लीफ मायनर)  लहान रोपट्यावर या किडीचा प्रादुर्भाव जास्त होतो. या किडीची अळी फिकट पिवळसर असून, प्रथम अळी अवस्थेत पानात शिरते. आतील हरितद्रव्य खाते. पानावर नागमोडी रेषा दिसतात. शेवटी अशी पाने वेडीवाकडी होऊन वाळतात. व्यवस्थापन 

  • लहान झाडावरील कीडग्रस्त पाने तोडून टाकावे. ही क्रिया फक्त पावसाळ्यातच करावी. नवीन पालवी फुटतेवेळी करू नये.
  • नत्रयुक्त खताचा जास्त प्रमाणात वापर करू नये.
  • सुरुवातीपासून निंबोळी अर्क (५ टक्के) किंवा ॲझाडिरॅक्टिन १०, ००० पीपीएम २ ते ३ मिलि प्रति लिटर पाणी याप्रमाणे प्रतिबंधात्मक फवारणी करावी.
  • जास्त प्रादुर्भाव असल्यास इमिडाक्लोप्रिड (१७.८ एसएल) ०.२५ मिलि प्रति लिटर पाणी फवारणी करावी.
  • फळातील रस शोषक पतंग रस शोषक पतंगामुळे सुमारे ५० ते ६० टक्क्यापर्यंत नुकसान होऊ शकते. पतंगाचा प्रामुख्याने सप्टेंबर ते ऑक्टोबर दरम्यान अधिक प्रादुर्भाव. तुलनात्मकदृष्ट्या उशिराचा आंबिया बहार आणि मृग बहरात जास्त प्रादुर्भाव. मुख्य प्रजाती ओथ्रिस मॅटरना, ओथ्रिस फुल्लोनिका व अकिया जनाटा. ओथ्रिस मॅटर्ना :  समोरील पंख तपकिरी आणि मागील पंख नारंगी असून त्यावर मध्यभागी एक काळा ठिपका असतो. पंखाच्या कडा काळ्या असून त्यावर पांढरे ठिपके असतात. ओथ्रिस फुलोनिका : मागील पंख नारंगी, त्यावर मध्यभागी इंग्रजी 'C' अक्षरासारखा काळा ठिपका. अकिया जनाटा : समोरील पंख तपकिरी व मागील पंख पांढरे असून, त्यावर काळे चट्टे असतात. जीवनक्रम

  • पतंगापूर्वीच्या अवस्था (उदा. अंडी,अळी आणि कोष) अन्य वेलवर्गीय वनस्पतींवर (उदा. गुळवेल, वासनवेल, चांदवेल इ.) पूर्ण होतो. त्यामुळे नियंत्रण करणे कठिण होते.
  • अंडी अवस्था - एक मादी पतंग जवळपास ८०० अंडी वनस्पतींच्या पानांवर घालते. ही अंडी २ ते ३ दिवसात उबतात.
  • अळी अवस्था - अंड्यातून बाहेर पडलेल्या लहान पिवळसर अळ्या वेलींची पाने खरवडून खातात. वाढीच्या अवस्थेत नंतर त्या पूर्ण पाने कुरतुडून खातात. अळीची पूर्ण वाढ होण्यास १२ ते १४ दिवसांचा कालावधी लागतो. पूर्ण वाढ झालेल्या अळीचा रंग तपकिरी होतो.
  • कोष अवस्था - पूर्ण वाढ झालेली अळी स्वतःभोवती कोष विणून वेलीवरच कोषावस्थेत जाते. (१० ते १५ दिवस.)
  • पतंग अवस्था - पतंग कोषातून बाहेर पडल्यानंतर खाद्य शोधण्यास फळबागांकडे धाव घेतात. निशाचर पतंग दिवस मावळल्यापासून ते मध्य रात्रीपर्यंत पक्व फळ शोधून, त्याला सोंडेने सूक्ष्म छिद्र पाडून रस शोषतात.
  • नुकसान : कालांतराने छिद्र पडलेल्या जागेवर गोलाकार तपकिरी चट्टा तयार होतो. त्या जागी फळ सडू लागते. तिथे बुरशींचा शिरकाव होऊन प्रादुर्भावग्रस्त फळे गळून पडतात. फळांची प्रत कमी होऊन विक्रीयोग्य राहत नाहीत.
  • अंडी, अळी आणि कोषाला पूरक असणाऱ्या फळ बाग आणि आजुबाजूच्या गुळवेल, वासनवेल व चांदवेल इ. वेलींचा वेळीच बंदोबस्त करावा.
  • जमिनीवर पडलेली प्रादुर्भावग्रस्त फळे ताबडतोब जमा करुन जमिनीमध्ये पुरावीत.
  •  प्रादुर्भाव दिसून येताच सायंकाळी बागेमध्ये धूर केल्यास पतंगांचा बागेतील शिरकाव रोखता येईल.
  • शक्य असल्यास फळांना कागदी किंवा कापडी पिशवीने झाकावीत.
  • पिकलेली केळी बागेमध्ये ठेवून त्यावर आकर्षित झालेले पतंग पकडून नष्ट करावेत.
  • बागेतील संपूर्ण झाडे ०.५ सेंमी मेश पेक्षा कमी असलेल्या नायलॉनच्या जाळीने झाकावे.
  • बागेमध्ये प्रकाश सापळा लावून, त्याकडे आकर्षित झालेले पतंग पकडून नष्ट करावेत.
  • - डॉ. संजोग बोकन (संशोधन सहयोगी), ९९२१७५२००० डॉ. अनंत लाड (सहायक प्राध्यापक), ७५८८०८२०२४ (कृषी कीटकशास्त्र विभाग, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

    Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

    Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

    Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

    Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

    SCROLL FOR NEXT