सूज, जखमांवर काळी अळू उपयुक्त 
ॲग्रो गाईड

सूज, जखमांवर काळी अळू उपयुक्त

अश्विनी चोथे
  • स्थानिक नाव    : काळी अळू          
  • शास्त्रीय नाव    : Colocasia esculenta (L.) Schott       
  • इंग्रजी नाव     : Eddo, Kalo, Taro, Wild taro, Dasheen, Taro,  Dasheen/ Eddo Cocoyam, Cocoyam       
  • संस्कृत नाव     : अलुकम, कच्छी, आलुकी, अलुपम        
  • कुळ    : Araceae       
  • उपयोगी भाग    : कोवळी पाने, कोवळे देठ, कंद        
  • उपलब्धीचा काळ    : कोवळी पाने -जुलै-सप्टेंबर, कंद-नोव्हेंबर- जानेवारी        
  • आढळ    : परसबाग, माळरान          
  • झाडाचा प्रकार    : झुडूप          
  • अभिवृद्धी     : कंद        
  • वापर    : शिजवून भाजी, मुटकुळे, पाटवड्या, कंदाची भाजी    
  • आढळ पाणथळ, दलदलीच्या ठिकाणी काळी अळू ही वनस्पती सर्वत्र वाढलेली आढळते. काही माळरानावर, तसेच जंगलात काळी अळू नैसर्गिकपणे उगवलेली दिसते. वनस्पतीची ओळख

  • काळी अळू ही कंदवर्गीय वनस्पती असून, ह्याचे देठ काळसर चॉकलेटी रंगाचे असते.
  • जमिनीत लहान-लहान, गोल कंद वाढत असतो. कंद आतून पांढरा व चिकट असतो.
  • कंदापासून वर पाने तयार होतात. पानाचा देठ २० ते ३० सेंमी. लांब असून, टोकाशी हृदयाकृती साधे पान असते.
  • पानाची लांबी व रुंदी १५ ते २० सेंमी. असते. पानाच्या बेचक्यातून, तळापासून लंबगोलाकार ३५ ते ४० सेंमी. लांब पुष्पमंजिरी तयार होते.
  • पुष्पमंजिरीच्या टोकावर २५ ते ३५ सेंमी. लांब पिवळसर रंगाचे जाड आवरण असते. आतील बाजूस पुष्पदांड्यावर लहान, देठरहित पिवळसर पांढरी व हिरवट रंगाची मादी व नर फुले असतात.  फळे पुष्प दांड्याच्या टोकावर येतात. फळे लांबट गोलाकार. बिया अनेक, लहान गोलाकार असतात.
  • औषधी गुणधर्म

  • काळी अळूच्या देठाचा रस लहान रक्तवाहिन्यांचे संकोचन करतो.
  • जखमेवर रस चोळल्याने रक्त वहाणे बंद होऊन जखमा लवकर भरून येतात.
  • पानाचे देठ मिठाबरोबर वाटून सुजलेल्या गाठी बसण्यास लेप करतात.    
  • टीप : औषधी वापर करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

    पाककृती   पानाच्या पाटवड्या    साहित्यः  १०-१२ काळी अळूची पाने, ६-७ बोडाराची पाने किंवा १-२ चमचे चिंचेचा कोळ, १-१.५  वाटी  बेसनपीठ, अर्धा वाटी तांदळाचे पीठ, २-३ चमचे लसूण-मिरची पेस्ट, १-१.५  चमचे हळद, १-२ चमचे लाल मिरची पावडर, १ चमचा धने पावडर, फोडणीसाठी जिरे, मोहरी, तेल, चवीपुरते मीठ.

    कृती प्रथम पाने स्वच्छ धुऊन कपड्याने पुसून घ्यावी. नंतर एका पातेल्यात बेसनपीठ, तांदळाचे पीठ, लसूण-मिरचीची पेस्ट, हळद, मिरची पावडर, चवीप्रमाणे मीठ, धने पावडर व थोडे थोडे पाणी ओतून सैलसर पेस्ट करून घ्यावी. त्यानंतर एक-एक पान उलट पसरवून त्याच्या मागच्या बाजूला वरील पेस्ट समांतर लावून घ्यावी, पुन्हा एक पान उलट ठेवावे व त्यावरही वरील पेस्ट निट लावून घ्यावी. असे एका वर एक ३-४ पान ठेवून घ्यावे. नंतर त्याची दोन्ही बाजू दुमडून घ्यावे व सर्व बाजूने गोल-गोल वळकुटी करून घ्यावे, दुमडताना ही थोडी-थोडी पेस्ट लावावी म्हणजे पाने नंतर सुटत नाही. एका पातेल्यात पाणी उकळत ठेवावे. एका प्लेटला तेल लावून त्यात या वळकुट्या शिजवून घ्याव्या. शिजल्यानंतर त्याच्या योग्य आकाराच्या गोल पातळ वड्या कापाव्यात. तव्यावर थोड तेल टाकून ह्या वड्या लालसर तळून घ्याव्यात. या वड्या तश्याच खाण्यासाठीही छान लागतात.

      काळी अळूच्या पानांची पातळ भाजी   साहित्य : ४-५ काळी अळूची देठासहित पाने, १-२ बारीक चिरलेले कांदे, ४-५ ठेचलेल्या लसूण पाकळ्या, १ चमचा हळद, २-३ चमचे लाल मिरची पावडर, १ वाटी तूर डाळ/मसुराची डाळ, थोडे शेंगदाणे, काकड फळ/ अंबाडाची पाने/बोडाराची पाने, चवीपुरता गूळ, फोडणीसाठी मोहरी, जिरे, तेल, मीठ चवीप्रमाणे.

    कृती  काळी अळूची पाने व देठ धुऊन घ्यावीत. देठावरील पातळ पापुद्रा काढून टाकावा. बारीक कापून घ्यावे. वरीलपैकी एका डाळीसोबत व काकड फळ/अंबाडाची पाने/बोडाराची पाने (यापैकी एक) शिजवून घ्यावे. एका कढईत तेल गरम करून त्यात मोहरी, जिरे, लसणाची फोडणी तयार करून त्यात बारीक चिरलेला कांदा सोनेरी रंग येईपर्यंत शिजवून घ्यावा. त्यात लाल मिरची पावडर, हळद, शेंगदाणे टाकून नीट परतून  घ्यावे. नंतर शिजवलेले वरील सर्व जिन्नस मिसळून चांगले उकळून घ्यावे. चवीप्रमाणे गूळ व मीठ मिसळावे.

    टीपः  काळ्या अळूच्या कंदापासून म्हणजेच अळुकुड्यापासून उकडलेल्या बटाट्याप्रमाणे भाजी करता येते.

    - अश्विनी चोथे, ७७४३९९१२०६,

    (क. का. वाघ उद्यानविद्या महाविद्यालय, नाशिक)

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Azolla Cultivation: अझोलाचे उत्पादन कसे करावे?

    Indian Agriculture 2025: थंडी यंदा रब्बी पिकांना असह्य होण्याचा धोका; IMDच्या अपडेटनंतर ICAR अलर्टवर!

    APMC Farmer Facility : शेतीमाल आणणाऱ्या शेतकऱ्यांना मोफत जेवणाचे पास ः सूर्यकांत पाटील

    Cabinet Decision: मंत्रिमंडळ बैठकीत ८ महत्त्वाचे निर्णय; शेतकरी भवनांसाठी १३२ कोटींचा निधी तर आधुनिक संत्रा केंद्र उभारणीसाठी मुदतवाढ

    Maharashtra Weather Update : राज्यातील १३ जिल्ह्यांतील ८१ मंडळांत अतिवृष्टी

    SCROLL FOR NEXT