बदलत्या वातावरणात द्राक्ष बागेचे व्यवस्थापन 
ॲग्रो गाईड

बदलत्या वातावरणात द्राक्ष बागेचे व्यवस्थापन

पावसामुळे बागेतील आर्द्रतेचे प्रमाण वाढलेले आहे. अशा परिस्थितीत दाट कॅनॉपी असल्यास फळकूज, मणीगळ, डाऊनी मिल्ड्यू व भुरी या रोगांचा प्रादुर्भाव वाढू शकतो.

डॉ. सुजोय साहा, डॉ. आर. जी. सोमकुंवर, डॉ. रत्ना ठोसर

पावसामुळे बागेतील आर्द्रतेचे प्रमाण वाढलेले आहे. अशा परिस्थितीत दाट कॅनॉपी असल्यास फळकूज, मणीगळ, डाऊनी मिल्ड्यू व भुरी या रोगांचा प्रादुर्भाव वाढू शकतो. सध्या सर्व द्राक्ष विभागांमध्ये पावसाचे वातावरण आहे. सतत ढगाळ वातावरण व अवेळी पडणारा पाऊस यामुळे द्राक्ष बागायतदारांना अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. बऱ्याच द्राक्ष बागा सध्या प्रीब्लूम, फुलोरा व मणी सेटिंग नंतरच्या अवस्थेमध्ये आहेत. पावसामुळे बागेतील आर्द्रतेचे प्रमाण वाढलेले आहे. अशा परिस्थितीत दाट कॅनॉपी असल्यास फळकूज, मणीगळ, डाऊनी मिल्ड्यू व भुरी या रोगांचा प्रादुर्भाव वाढू शकतो. अचानक सुरू झालेल्या पावसामुळे नियंत्रित झालेले डाऊनी मिल्ड्यू रोगाचे बीजाणू पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे. तसेच रोगकारक नसलेले सूक्ष्मजीवही वाढून द्राक्षघडांच्या नुकसानीसाठी कारणीभूत ठरू शकतात.  फळछाटणी नंतर निघालेल्या फुटी वेळेत काढून टाकल्या नसल्यास बागेमध्ये कॅनॉपी दाट होते. बागेमध्ये रोगास पोषक असे सूक्ष्म-हवामान तयार होते. सद्यःस्थितीत द्राक्षघड अजून नाजूक अवस्थेत आहेत. अशा वेळी पडणाऱ्या पावसामुळे द्राक्षघडांमध्ये पाणी साचून घडकूज होण्याची शक्यता अधिक आहे.  तत्काळ नियंत्रणासाठीचे उपाय 

  • पाऊस थांबताच बागेमध्ये ब्लोअर फिरवून द्राक्ष गुच्छांमध्ये साठलेले पाणी निघून जाईल याची काळजी घ्यावी. जास्त पाऊस झालेल्या ठिकाणी तारेला झटका देऊन व ओलांडे हलवून द्राक्ष गुच्छांमध्ये साचलेले पाणी काढून टाकावे. 
  •  याशिवाय गुच्छातील पाणी काढून टाकण्यासाठी फलोत्पादन ग्रेडच्या खनिज तेलाचा (मिनरल ऑइल) २ मि.लि. प्रति लिटर या दराने वापर करावा. काही विशेष रसायने द्राक्षघड किंवा पानांचा पृष्ठभाग कोरडे करण्यासाठी उपलब्ध आहेत, त्यांचाही वापर करता येईल.    
  • डाऊनी मिल्ड्यूच्या नियंत्रणासाठी पुढील एका बुरशीनाशकाची फवारणी करावी. (फवारणी प्रति लिटर पाणी) डायमेथोमॉर्फ (५०% डब्ल्यू.पी.) ०.५० ते ०.७५ ग्रॅम किंवा मॅन्डिप्रोपॅमिड (२३.४% एस.सी.) ०.८ मि.लि. किंवा अमिसुलब्रोम (१७.७% एस.सी.) ०.३७५ मि.लि. 
  • युरोपियन युनियनला निर्यात होणाऱ्या द्राक्षांसाठी मॅन्कोझेब किंवा प्रोपिनेबचा वापर टाळावा. त्याऐवजी मेटीराम वापरले जाऊ शकते.
  • रोगांच्या प्रभावी नियंत्रणासाठी मांजरी वाईनगार्ड २ मि.लि. प्रति लिटर पाणी किंवा मांजरी ट्रायकोशक्ती १० ग्रॅम प्रति एकर या दराने ठिबकद्वारे वापर करावा. गुच्छांमध्ये ट्रायकोडर्मा वापरसुद्धा फायदेशीर ठरेल. यासोबत जैविक घटक उदा. बॅसिलस सबटिलिस, अँपेलोमायसेस क्विस्क्वालिसचा(प्रमाण- ५ मि.लि. प्रति लिटर ) वापर केल्यास भुरीचे प्रभावी नियंत्रण शक्य होईल.
  • पोटॅशिअम सॉल्ट ऑफ ॲक्टिव्ह फॉस्फरस ४ ग्रॅम प्रतिलिटर पाणी याप्रमाणे फवारणी करून देखील रोग नियंत्रणात ठेवता येईल.
  • वेळेत योग्य कॅनोपी व्यवस्थापन करून बागेत हवा खेळती राहील आणि सूर्यप्रकाश नीट पोहोचेल, याची काळजी घ्यावी.
  • बागेत शेंडापिंचिंग करून घेणे. 
  • बगलफुटी काढून कॅनोपी मोकळी राहील, याकडे लक्ष देणे. 
  • गळ जास्त होत आहे असे आढळल्यास घडाच्या खालील व वरील अशी दोन पाने काढून घेणे. 
  •  काडीच्या तळाजवळ किंवा ओलांड्यावर जखम करणे. 
  •  गळ थांबत नसल्यास गर्डलिंगचा सुद्धा विचार करता येईल.  
  • टीप ः स्ट्रेप्टोमायसिन सल्फेट ९० टक्के अधिक टेट्रासायक्‍लीन हायड्रोक्‍लोराइड १० टक्के या प्रतिजैविकाचा द्राक्षवेलींवरील रोग नियंत्रणासाठी वापर करू नये.  जैविक घटकांसोबत बुरशीनाशक किंवा बुरशीनाशकाचे टॅंक मिश्रण करताना सुसंगतता अभ्यासल्याशिवाय करणे टाळावे. रासायनिक चाचणी किंवा विश्लेषण न केलेल्या ‘टॉनिक्स’ इ. चा वापर टाळावा. - डॉ. आर. जी. सोमकुंवर, ९४२२० ३२९८८ - डॉ. सुजोय साहा, ७०६६२४०९४६ (राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, जि. पुणे)

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Agriculture Scheme : कृषी स्वावलंबन, कृषिक्रांती योजनेकडे शेतकऱ्यांचा कल

    Fertilizer Stock : युरिया, डीएपी खतांचा साठा शेतकऱ्यांसाठी खुला

    Vidarbha Rain : पावसामुळे अनेक मार्गांवरील वाहतूक बंद

    Desi Cow Conservation : सेंद्रिय शेती पद्धतीमध्ये देशी गोवंश पालनास महत्त्व

    Crop Insurance : मराठवाड्यात केवळ १२ लाख ७७ हजार हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित

    SCROLL FOR NEXT