रंगीत शेडनेटच्या वापराने उत्पादन, दर्जात वाढ  
ॲग्रो गाईड

रंगीत शेडनेटच्या वापराने उत्पादन, दर्जात वाढ

कोजेन्सिस वृत्तसेवा

सामान्यपणे भाजीपाला, फुलपिके आदींच्या उत्पादनासाठी काळ्या रंगाच्या शेडनेटचा वापर केला जातो. मात्र विविध रंगांच्या शेडनेटचा वापर केल्यास भाजीपाला, फुलपिके अादींच्या उत्पादन व दर्जात चांगलीच सुधारणा होत असल्याचे दिसून आले आहे. याबाबत आंतरराष्ट्रीय उद्यानविद्या शास्त्र सोसायटीच्या जर्नलमध्ये माहिती प्रकाशित केली आहे.  

रंगीत शेडनेट हे फोटोसिलेक्टीव्ह (प्रकाशातील विविध रंगांच्या तरंगलहरींची निवड करण्याची क्षमता) असतात. त्यांची निर्मिती करताना त्यात प्रकाशाचे वितरण किंवा परावर्तन करणाऱ्या रंगकारक मिश्रकांचा वापर केला जातो. त्यामुळे सूर्यप्रकाशात अंतर्भूत असणाऱ्या अतिनील, अतिलाल व इतर रंगांच्या तरंग लहरींना रंगीत नेट्स निवडून आत पाठवतात. त्यामुळे शेडनेटमधील उपलब्ध प्रकाशकिरणात विशिष्ट प्रकारच्या किरणांची मात्रा वाढू शकते. पीकवाढीच्या काही अवस्थांमध्ये त्याचा फायदा होतो. तसेच रंगीत शेडनेट्स हे प्रकाशकिरणांचे विखुरणे कमी करून पिकाला ते अधिकाधिक मिळवून देतात. त्यामुळे पिकाच्या आतील भागापर्यंत जास्तीत जास्त प्रकाशकिरण पाेचतात. परिणामी प्रकाशसंश्‍लेषणासारखी क्रिया अधिक प्रमाणात व वेगवान होते. त्याचा  उत्पादनवाढीसाठी फायदा होतो. विशेषत: जांभळ्या, पिवळ्या व लाल रंगांच्या नेटमधून सूर्यकिरण अधिक प्रमाणात विखुरले जातात (वितरण होते). त्यातून लाल, अतिलाल व हिरव्या रंगाच्या तरंग लहरींची भरपूर तर अतिनील व निळ्या तरंगलहरींची कमी मात्रा मिळते.

पीकनिहाय परिणाम भाजीपाला पिके  

  • रंगीत शेडनेटचा वापर भाजीपाला लागवडीत करण्यात आला. त्यासाठी शेडनेटसह कीडविरोधी जाळीचा वापर किंवा हरितगृहातील प्लास्टिक फिल्मचा वापर करण्यात आला. लाल व जांभळ्या रंगांच्या नेटमध्ये पालेभाजी पिकांसाठी प्रमाणभूत मानल्या गेलेल्या नेटपेक्षा अधिक उत्पादन मिळाले.
  • रंगीत शेडनेटमुळे कीडनियंत्रणातही सुलभता येत असल्याचे दिसून आले. पिवळ्या व निळ्या रंगांच्या शेडनेटकडे पांढरी माशी व फुलकिडे या किडी अधिक प्रमाणात अाकर्षित होतात. तर अतिनील किरणे शोषू शकणाऱ्या फिल्म्सचा हरितगृहांसाठी वापर केल्याने अनेक प्रकारच्या किडींची वाढ रोखता येते. नेटच्या बारीक छिद्रातून कीड व रोगकारक विषाणूंचा शिरकाव जरी झाला तरी कीडींचा व विषाणूजन्य रोगांचा नगण्य प्रादुर्भाव झाला. उदा. मावा या किडीमुळे काकडीत कुकुंबर माेझॅक या रोगाचा प्रादुर्भाव होतो. मात्र १० स्तर असलेल्या जांभळ्या किंवा ३ स्तर असलेल्या पिवळ्या शेडनेटमध्ये काळ्या शेडनेटपेक्षा हा प्रादुर्भाव खूपच कमी दिसून आला.  
  • पालेभाजी पिकात लाल व पिवळ्या रंगाच्या शेडनेटमुळे शाकीय वाढीचा वेग वाढला. तर निळ्या रंगाच्या शेडनेटमुळे पीक लहान राहिले. करड्या रंगाच्या नेटमुळे शाकीय वाढ भरपूर झाली, मात्र पानांचा आकार लहान राहिला.
  • फुलपिके

  • लाल व पिवळ्या शेडनेटच्या वापराने लांब व जाड देठाच्या फुलांची निर्मिती झाली. निळ्या रंगाच्या शेडनेटमध्ये लहान देठांची फुले मिळाली. लाल शेडनेटमध्ये फुले लागण्याचा कालावधी खूप कमी होता. जांभळ्या शेडनेटमध्ये काही फुलपिकांमध्ये शाकीय वाढ जास्त झाली तर काही फुलपिकांमध्ये फांदीवरील फुलांची संख्या वाढल्याचे दिसून आले.
  • फळझाडे

  • सफरचंद, पीच, द्राक्ष अशी पिके शेडनेटमध्ये घेतल्यावर प्रकाश संश्‍लेषण क्रियेचा वेग वाढला. परिणामी पानांचा व शाखांचा विस्तार वाढल्याचे दिसून आले. जेव्हा रंगीत नेटचा वापर करण्यात अाला तेव्हा फळे लागणीचे प्रमाण, पीक कालावधी, फळांचा आकार व उत्पादन, रंग आदी गुणधर्मांतही मोठी सुधारणा झाल्याचे दिसून आले.
  • ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Crop Insurance : एक लाख १७ हजार हेक्टरवरील पिकांना विमा कवच नाही

    Industrial Investment : औद्योगिक गुंतवणुकीला सुरक्षा, सुविधा उपलब्ध करून देणार

    Dairy Industry : सलग तीन महिने दूध संकलनात घट

    Loan Waiver : दुसऱ्या टप्प्यात किती शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ?

    Finlay Mill Amravati : फिनले मिलसाठी हवा ४१ कोटींचा निधी

    SCROLL FOR NEXT