लिंबुवर्गीय फळपिकांना आच्छादन करुन दुहेरी बांगडी पद्धतीने पाणी देण्याच्या उपाययोजना कराव्यात.  
ॲग्रो गाईड

Mosambi Orange Orchad : वाढत्या तापमानातील संत्रा, मोसंबी फळगळीचे नियंत्रण

डॉ. एम. एस. लदानिया, डॉ. दिनकरनाथ गर्ग

विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये मे महिन्यामध्ये कमाल तापमान ४२ ते ४५ अंश सेल्सिअसपर्यंत पोचले आहे. तापमानातील फरक सरासरीपेक्षा ३-४ अंशाने जास्त आहे. मुख्यतः उशिरा येणाऱ्या फुलोऱ्याच्या बागेत व पारंपरिक पद्धतीने देण्यात येणाऱ्या सिंचनामुळे बागेत पानांची व फळांची मोठ्या प्रमाणात गळ होत आहे. पुरेसे पाणी दिले जात असलेल्या बागामध्ये लहान संत्रा फळांवर जिवाणूजन्य काळे डाग येत आहेत. त्यामुळे लहान फळांची गळ होत आहे.

उपाय योजना :

  • सिंचनाच्या नियमित वेळापत्रकाप्रमाणे प्रति झाड पाण्याचे नियोजन करावे. मे महिन्यामध्ये १६० ते १८० लिटर पाणी/दिवस/झाड ठिबक सिंचनाद्वारे द्यावे. आळे पद्धतीत दुहेरी बांगडी पद्धतीने ३ ते ४ दिवसांच्या अंतराने कमी पाणी जास्त वेळा विभागून द्यावे.

  • या व्यतिरिक्त झाडाच्या भोवताली काळी पाॅलीथीन (१०० मायक्रॉन जाडीची) पसरवावी. आच्छादनासाठी शेतीतील निरुपयोगी सेंद्रीय व असेंद्रीय पदार्थ वापरता येतात.

  • पाण्याची तीव्र टंचाई असल्यास उपलब्ध पाणी किमान ६० ते ८० लिटर/झाड/दिवस याप्रमाणे ठिबक सिंचनाद्वारे द्यावे.

  • २, ४ - डी (१५ पी.पी.एम.) १.५ ग्रॅम अधिक यूरिया किंवा पोटॅशिअम नायट्रेट या पैकी एक २ किलो प्रति १०० लिटर पाणी किंवा जीए-३, (१५ पी.पी.एम.) १.५ ग्रॅम अधिक पोटॅशिअम नायट्रेट २ किलो प्रति १२० लिटर पाणी

  • पुढील फवारणी १५ दिवसांच्या अंतराने करावी.

  • जिवाणूजन्य काळे डाग आढळल्यास, फवारणी काॅपर आॅक्झिक्लोराईड ३ ग्रॅम प्रतिलिटर पाणी

टीप : १० दिवसांच्या अंतराने दोन वेळा फवारणी करावी.

संपर्क : डॉ. एम. एस. लदानिया, ०७१२-२५००३२५ (संचालक, केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्था, नागपूर.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Palm Oil Prices : जागतिक बाजारात पामतेलाचे भाव वाढलेले; मलेशियाला होतोय फायदा

Soybean Cotton Madat : पहिल्या टप्प्यात ४६ लाख शेतकऱ्यांचं सोयाबीन, कापूस अनुदान जमा होण्याची शक्यता

Soybean Subsidy : सोयाबीन अनुदानासाठी आधार संमती पत्र भरून द्या; कृषी सहाय्यकांचं शेतकऱ्यांना आवाहन

Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने कायदा, सुव्यवस्थेचा आढावा

Groundnut Harvesting : बोरपाडळे परिसरात भुईमूग काढणी सुरू

SCROLL FOR NEXT