पपई रोपनिर्मिती  
ॲग्रो गाईड

पपई फळपिकाची रोपनिर्मिती करताना...

डॉ. उज्ज्वल राऊत, डॉ. देवानंद पंचभाई

पपई या फळपिकाच्या लागवडीसाठी रोपवाटिकेतील रोपांची निवड करावी. रोपनिर्मितीसाठी बाजारपेठेच्या मागणीनुसार शिफारशीत जातींचे बियाणे वापरावे. निर्जंतुकीकरण केलेले मातीमिश्रण वापरून बियांची टोकणी करावी.

पपई या फळपिकाच्या उभयलिंगी व द्विभक्तलिंगी जाती आहेत. द्विभक्तलिंगी जातीमध्ये नर-मादी फूल वेगवेगळ्या झाडावर तर उभयलिंगी जातीमध्ये एकाच झाडावर येतात. रोपनिर्मितीसाठी उभयलिंगी जातींची निवड करावी.

रोपनिर्मितीची पद्धत

  • रोपनिर्मितीसाठी पॉलिथिनच्या १० सें.मी.x २०सें.मी. आकाराच्या पिशव्या घ्याव्यात. निचऱ्यासाठी तळाकडील भागाला छिद्रे पाडून घ्यावीत. चांगले कुजलेले शेणखत व तेवढीच चांगली माती एकत्र मिसळून पिशव्या भरून घ्याव्यात.
  • सुत्रकृमी नियंत्रणासाठी प्रतिक्‍विंटल शेणखतात १० किलो निंबोळी खत मिसळून ते पिशव्यांमध्ये समप्रमाणात मिसळून घ्यावे. किंवा कॉपर ऑक्‍सिक्‍लोराईड ३ ग्रॅम प्रतिपिशवीतील मिश्रणात मिसळावे.
  • बियांची उगवण चांगली व लवकर होण्यासाठी बी जिब्रेलिक अॅसिडच्या द्रावणात (जिब्रेलिक अॅसिड १०० मिलिग्रॅम प्रतिलिटर ) २ तास बुडवून नंतर सावलीत वाळवून टोकणी करावी. प्रतिहेक्टरी २०० ते २५० ग्रॅम बी पुरेसे होते.
  • पिशव्यातील माती मिश्रण पाण्याने ओले करावे. वाफसा आल्यावर प्रत्येक पिशवीत १ ते २ बियांची १ ते १.५ सें.मी. खोलीवर टोकणी करावी. साधारणपणे ४ ते ६ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. बी उगवण १० ते १५ दिवसांत होते.
  • रोपे ५ ते १० से.मी. उंचीची झाल्यावर कॉपर ऑक्‍सिक्‍लोराईड २ ग्रॅम प्रतिलिटर पाणी या प्रमाणात द्रावण करून प्रत्येक पिशवीत २५ मि.लि. टाकावे.
  • रोपे ४५ ते ६० दिवसांची झाल्यावर लागवड करावी.
  • संपर्क  : डॉ. उज्ज्वल राऊत, ९८५०३१४३५२ (उद्यानविद्या विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला)

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Integrated Nutrient Management: जमीन आरोग्यासाठी एकात्मिक खत व्यवस्थापन आवश्यक: डॉ. संग्राम काळे

    Panchayat Raj Funding: जिल्हा परिषदेच्या पंचायत राज विभागाला निधीचा ‘बूस्ट’

    Khandesh Crop Damage: खानदेशात जानेवारी, मार्च, एप्रिलमध्ये वादळात पिकांची हानी

    Agriculture Challenges: शेतकऱ्यांसमोरील आव्हानाची लढाई एकजुटीतून लढावी लागणार: अजित नवले

    Solapur Crop Insurance: पीक विम्याच्या लाभात ‘शेतकरी उपाशी, कंपन्या मात्र तुपाशी’

    SCROLL FOR NEXT