मोसंबी झाडास आळे करावे, ठिबक सिंचनाने पुरेसे पाणी द्यावे.
मोसंबी झाडास आळे करावे, ठिबक सिंचनाने पुरेसे पाणी द्यावे.  
ॲग्रो गाईड

लिंबूवर्गीय फळपीक सल्ला

डॉ. एम. एस. लदानिया, डॉ. दिनकरनाथ गर्ग

सध्या तापमानात वाढ होत असल्यामुळे ७ ते १० दिवसांच्या अंतराने दुहेरी आळे पद्धतीने ओलीत नियमित सुरू ठेवावे.

  • बागेमध्ये ठिबक सिंचन संच असल्यास १ ते ४ वर्षांवरील झाडांना १२ ते ५३ लिटर प्रति दिवस, ५ ते ७  वर्षांवरील झाडांना ७८ ते १२७  लिटर प्रति दिवस आणि ८ वर्षांवरील झाडांना १४५ ते १८० लिटर प्रति दिवस पाणी द्यावे.
  • झाडाभोवती ५ ते १० सें.मी. जाडीचा गवत, तणस, गव्हांडा, कुटाराचा थर देऊन आच्छादन द्यावे. यामुळे बाष्पीभवन कमी होते. जमिनीत ओलावा टिकून राहतो. अंबिया बहराची फळगळ कमी होण्यास त्याची मदत होते.
  • अंबिया बहर व्यवस्थापन : अंबिया बहराची फळ धारणा चांगली होण्यासाठी २, ४-डी १.५ ग्रॅम अधिक युरिया एक किलो प्रति १०० लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी. या महिन्यात तापमान वाढण्याची शक्‍यता आहे. तापमानात ३५ ते ४० अंश सेल्सिअसपर्यंत वाढ झाल्यास २, ४-डी १.५ ग्रॅम अधिक पोटॅशियम नायट्रेट १ किलो प्रति १०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

    रोग नियंत्रण : फांद्या कापणीनंतर कात्री सोडियम हायपोक्लोराईटच्या द्रावणात (१ ते २ टक्के) बुडवून निर्जंतुकीकरण करावे. झाडांच्या बुंध्यावर ब्रशने ६० सें.मी. उंचीपर्यंत बोर्डोपेस्ट (१० टक्के) लावावी. बोर्डोपेस्ट बनविण्यासाठी मोरचूद १ किलो ५ लिटर पाण्यात एका बादलीत तसेच चुना १ किलो ५ लिटर पाण्यात दुसऱ्या बादलीत रात्रभर भिजत घालावा. दुसऱ्या दिवशी सकाळी हे घटक एकत्र करून बारा तासांमध्ये पेस्ट लावावी.

    फायटोफ्थोरा नियंत्रण : फवारणी : प्रति लिटर पाणी मेटॅलॅक्‍झील एम ४ टक्के अधिक मॅंकोझेब ६४ टक्के संयुक्त बुरशीनाशक  २.५ ग्रॅम किंवा फोसेटील ए.एल २.५ ग्रॅम सूचना : संपूर्ण झाड ओले होईपर्यंत फवारावे. हे द्रावण झाडाभोवती शिंपडावे.

    कीड नियंत्रण : सिट्रस सायला : फवारणी : प्रति लिटर पाणी इमिडाक्लोप्रिड ०.५ मि.लि. किंवा ॲसिफेट १ ग्रॅम किंवा नोव्हॅल्युरॉन ०.५५ मि.लि. किंवा डायमिथोएट १.५ मि.लि. टीप :  गरजेनुसार दुसरी फवारणी  १० दिवसांच्या अंतराने कीटकनाशक बदलून करावी.

    पाने पोखरणारी अळी : फवारणी : प्रति लिटर पाणी स्पिनोसॅड ०.३४ मि.लि. किंवा डायमिथोएट १.५ मि.लि. किंवा नोव्हॅल्युरॉन ०.८७ मि.लि  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Orange Farmer : निवडणूक काळात संत्रा उत्पादक उपेक्षित

    Chara Chavani : चारा छावण्या सुरू करण्याची पशुपालकांची मागणी

    Cotton Sowing : महाराष्ट्रात कापसाचा पेरा राहणार ४२ लाख हेक्टरवर

    Animal Heat Stress : वाढत्या उष्म्याचा पशुधनाला धोका

    Agriculture Technology : शेती तंत्रज्ञान, पिकांबाबत शेतकरी साक्षर असणे गरजेचे

    SCROLL FOR NEXT