In many places, hailstorms and strong winds have broken orange trees and branches 
ॲग्रो गाईड

अवकाळी पाऊस, गारपीटग्रस्त लिंबूवर्गीय फळबागेसाठी उपाययोजना

कत्याच झालेल्या अवकाळी पावसासोबत गारपीट झाल्याने अनेक ठिकाणी संत्रा, लिंबू व मोसंबी बागांचे मोठे नुकसान झाल्याचे समजते. नुकसानग्रस्त बागांची काळजी घेण्यासोबतच संत्रा व मोसंबी आंबिया बहाराचे व लिंबू हस्त बहाराचे व्यवस्थापन प्रभावी करणे गरजेचे ठरेल.

डॉ. दिनेश पैठणकर, डॉ. योगेश इंगळे

कत्याच झालेल्या अवकाळी पावसासोबत गारपीट झाल्याने अनेक ठिकाणी संत्रा, लिंबू व मोसंबी बागांचे मोठे नुकसान झाल्याचे समजते. नुकसानग्रस्त बागांची काळजी घेण्यासोबतच संत्रा व मोसंबी आंबिया बहाराचे व लिंबू हस्त बहाराचे व्यवस्थापन प्रभावी करणे गरजेचे ठरेल.  विदर्भ, मराठवाड्यामध्ये अनेक ठिकाणी १९ ते २३ मार्च यादरम्यान अवकाळी पाऊस व गारपीट झाली. त्याच प्रमाणे पुढील काही दिवस मेघांच्या गडगडाटासह वादळी पाऊस व गारपिटीची शक्यता वर्तविण्यात येत आहे. नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसासोबत गारपीट झाल्याने अनेक ठिकाणी संत्रा, लिंबू व मोसंबी बागांचे मोठे नुकसान झाल्याचे समजते. नुकसानग्रस्त बागांची काळजी घेण्यासोबतच संत्रा व मोसंबी आंबिया बहाराचे व लिंबू हस्त बहाराचे व्यवस्थापन प्रभावी करणे गरजेचे ठरेल.  गारपिटीमुळे बागेमध्ये झाडांची होणारी हानी  गारपिटीमुळे झाडांच्या फांद्यावरील आणि खोडावरील सालीला जखमा होतात. या जखमांतून निरनिराळ्या बुरशींचे उदा. प्रामुख्याने फायटोप्थोरा, कोलेटोट्रीकम, डिप्लोडिया, ऑल्टरनेरिया यांचे संक्रमण होऊन रोगांचा प्रसार वाढतो.

  • झाडाच्या पानांना मार बसल्यामुळे काही पाने फाटली जातात व काही गळतात. परिणामी, झाडांची सूर्यप्रकाशात अन्ननिर्मितीची प्रक्रिया मंदावते. 
  • झाडावर मृग बहर ठेवला असल्यास, मृग बहराच्या फळांची व आंबिया बहरातील फुलांची व लहान फळांची गळ होते.
  • सद्यः स्थितीतील आंबिया व मृग बहाराचे नियोजन

  • आंबिया बहाराची फळे बोराएवढी किंवा त्यापेक्षा मोठ्या आकाराची असलेल्या बागेत झाडांना अन्नद्रव्य व संजीवकांची उपलब्धता होऊन फळे चांगली पोसण्यासाठी पोटॅशिअम नायट्रेट (१३:०:४५) १.५ किलो किंवा ०:५२:३४ अधिक जिबरेलीक ॲसिड १.५ ग्रॅम प्रति १०० लिटर पाणी या प्रमाणात आलटून पालटून झाडावर फवारणी  करावी.
  • आंबिया बहारातील फळांची गळ होत असल्यास जिबरेलीक ॲसिड १.५ ग्रॅम किंवा नॅप्थिल ॲसेटिक ॲसिड (एनएए) १ ग्रॅम आणि युरिया १ किलो प्रति १०० लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. 
  • ढगाळ वातावरणात नवीन नवतीवर सिट्रस सायला या किडीचा प्रादुर्भाव दिसून येतो. याचा झाडांच्या पानांवर व फळधारणेवर विपरीत परिणाम होतो. दुर्लक्ष केल्यास झाडावरील फूलगळ, फळगळ संभवते. या किडीमुळे घातक अशा ग्रिनिंग रोगाचाही प्रसार होतो. या किडीचा वेळीच बंदोबस्त करण्यासाठी, संत्र्याला नवीन नवती आल्यानंतर नीम तेल १० मि.लि. प्रति लिटर पाणी या प्रमाणे १५ दिवसांच्या अंतराने दोन फवारण्या कराव्यात. नीम तेल पाण्यात मिसळत नसल्यामुळे या द्रावणासोबत १० ग्रॅम सरफॅक्टंट प्रति १० मि.लि. नीम तेलात मिसळावे किंवा थायामेथोक्झाम (२५ डब्ल्यूजी) ०.१ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.
  • काही भागात लिंबू फळपिकावर कोळी किडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. कोळी कीड पानातील आणि फळातील रस शोषून घेते. पानांवर राख किंवा धूळ साचल्याप्रमाणे पानांचा पृष्ठभाग धुळकट दिसतो. फळांवरील करड्या रंगाच्या असंख्य छटांमुळे फळाची प्रत बिघडते. यांच्या नियंत्रणासाठी फवारणी प्रति लिटर पाणी डायकोफॉल (१८.५ ईसी) २.७ मि.लि. किंवा डायफेन्थुरॉन (५०% पाण्यात मिसळणारे) २ ग्रॅम.
  • ओलावा असलेल्या ठिकाणी गोगलगाय किंवा शंखी गोगलगायीचा प्रकोप वाढतो. त्यांच्या नियंत्रणासाठी विषारी आमिष तयार करून वापरावे. त्यासाठी मेटाल्डिहाइडच्या (२.५ टक्के भुकटी) आमिष गोळ्या तयार करून सुमारे ५०-८० ग्रॅम १०० चौरस फूट क्षेत्र फळासाठी वापराव्यात. या गोळ्या गोगलगायींचा प्रादुर्भाव झालेल्या ठिकाणी, झाडाच्या पायथ्याजवळ किंवा झाडांच्या ओळीत टाकाव्यात.  
  • पावसामुळे कागदी लिंबूवर खैऱ्या रोगाचा प्रादुर्भाव वाढतो. या रोगापासून झाडांच्या संरक्षणार्थ फवारणी प्रति १० लिटर पाणी कॉपर ऑक्सिक्लोराइड ३० ग्रॅम अधिक स्ट्रेप्टोमायसीन* १ ग्रॅम.
  • ( टीप   :  स्ट्रेप्टोमायसिन हे संक्षिप्त नाव वरील लेखात घेतले असले तरी या प्रतिजैविकातील सक्रिय घटक पुढीलप्रमाणे आहेत. स्ट्रेप्टोमायसिन सल्फेट ९० टक्के अधिक टेट्रासायक्‍लीन हायड्रोक्‍लोराइड १० टक्के.) जखमा लवकर भरण्यासाठी उपाययोजना 

  • गारपिटीमुळे फांद्या मोडल्या असल्यास आरीच्या साह्याने व्यवस्थित कापाव्यात. कापलेल्या भागावर बोर्डो पेस्ट (१:१:१०) लावावी. गारपीटग्रस्त झाडांच्या बुंध्यास १ मीटर उंचीपर्यंत बोर्डो पेस्ट लावावी. 
  • झाडाची साल फाटली असल्यास १ टक्का पोटॅशिअम परमॅग्नेट द्रावणाने (१० ग्रॅम प्रति लिटर पाणी) स्वच्छ पुसून घ्यावी. जखमेवर बोर्डो पेस्ट (१:१:१०) लावावी.
  • झाडे उन्मळून पडली असल्यास, त्यांना मातीची भर देऊन बांबू किंवा बल्लीच्या साह्याने आधार देऊन उभे करावे. 
  • झाडांची मुळे उघडी पडली असल्यास, वाफे नीट करून घ्यावेत. त्यानंतर वाफ्यामध्ये ड्रेचिंग करावे (प्रमाण प्रति लिटर पाणी).
  • सायमोक्झॅनील अधिक मॅन्कोझेब (संयुक्त बुरशीनाशक) २.५ ग्रॅम  किंवा 
  • मेटॅलॅक्सिल अधिक मॅन्कोझेब (संयुक्त बुरशीनाशक) २.५ ग्रॅम. (लेबल क्लेम नाही, ॲग्रेस्को शिफारस आहे.)
  • प्रति झाड ८ ते १० लिटर द्रावण वापरावे.
  • गारपीटग्रस्त झाडावर कॉपर ऑक्सिक्लोराइड ३ ग्रॅम प्रति लिटर पाणी किंवा बोर्डो मिश्रण (६०० ग्रॅम चुना +  ६०० ग्रॅम मोरचूद + १०० लिटर पाणी) या बुरशीनाशकांची त्वरित फवारणी करावी. 
  • गारपीटग्रस्त झाडांना खते देऊन अन्नद्रव्ये यांचा पुरवठा करावा. 
  • गारपीटग्रस्त सहा वर्षांपेक्षा अधिक वयाच्या व फळावरील झाडास अमोनिअम सल्फेट १ किलो प्रति झाड याप्रमाणे द्यावे. शक्य असल्यास चिलेटेड स्वरूपातील सूक्ष्म अन्नद्रव्यांची (झिंक + कॅल्शिअम + फेरस सल्फेट मिश्र घटक) २ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. 
  • गारपीटग्रस्त झाडांवर कॅल्शिअम नायट्रेट १ टक्का (१ किलो) अधिक जिबरेलिक ॲसिड २ ग्रॅम प्रति १०० लिटर पाणी या प्रमाणे फवारणी केल्यास झाडावरील पानांच्या संख्येत वाढ होईल. 
  • मृग बहाराची फळे गळाली असल्यास त्यांची योग्य विल्हेवाट लावावी. 
  • ( टीप :  ॲग्रेस्को शिफरशी आहेत.) - डॉ. दिनेश पैठणकर,  ९८८१०२१२२२ (प्रभारी अधिकारी, अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्प (फळे), डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला)

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

    Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

    Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

    Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

    Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

    SCROLL FOR NEXT