Solapur ZP Agrowon
ॲग्रो विशेष

Solapur ZP : जिल्हा परिषदेच्या २३२ कर्मचाऱ्यांच्या बदल्या

ZP Employee Transfer : जिल्हा परिषदेने शुक्रवारी (ता. ३०) ग्रामपंचायत व आरोग्य विभागाकडील एकूण २३२ कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय व विनंती बदल्या केल्या.

Team Agrowon

Solapur News : जिल्हा परिषदेने शुक्रवारी (ता. ३०) ग्रामपंचायत व आरोग्य विभागाकडील एकूण २३२ कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय व विनंती बदल्या केल्या. मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी अनेक वर्षांपासून एकाच ठिकाणी ठाण मांडलेल्या ग्रामपंचायत अधिकारी व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्याने त्यांना मोठा दणका बसला.

नुकतेच राज्य सरकारने जिल्हा परिषदेच्या वर्ग तीन व वर्ग चार संवर्गाच्या कर्मचाऱ्यांच्या जिल्हांतर्गत बदल्यांच्या धोरणात सुधारणा केली आहे. त्यानुसार बदल्या करण्याचे आदेश ग्रामविकास विभागाने दिले होते.

त्यामुळे यापूर्वी झालेल्या बदल्या रद्द करून शुक्रवारी पुन्हा मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम व सामान्य प्रशासनाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषद सभागृहात ही प्रशासकीय व विनंती बदली प्रक्रिया राबविण्यात आली.

यासाठी हजर राहिलेल्या ग्रामपंचायत व आरोग्य विभागाकडील कर्मचाऱ्यांच्या गर्दीमुळे जिल्हा परिषदेला जत्रेचे स्वरूप आले होते. विशेष म्हणजे जिल्हा परिषद प्रशासनाने ठरवल्यानुसार ३१ मे अखेर बदली प्रक्रिया पूर्ण केली.

ग्रामसेवकांच्या विनंती बदल्या करताना प्रशासनाने मोहोळ, अक्कलकोट, दक्षिण सोलापूर व उत्तर सोलापूर हे शहरालगतचे तालुके लॉक केले होते. जिल्ह्यातील सोलापूर शहरालगतच्या कुंभारी, मंद्रूप यासह अनेक ग्रामपंचायतीत ग्रामपंचायत अधिकारी अनेक वर्षांपासून ठाण मांडून होते.

हीच स्थिती आरोग्य खात्याकडील आरोग्य केंद्रांमध्येही होती. त्यांना शहरालगतचे पर्याय न देता अन्य तालुक्यात बदली करून प्रशासनाने कोणाचाही मुलाहिजा बाळगणार नसल्याचा संदेश दिला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी जंगम यांच्यासह जिल्हा परिषद प्रशासनाने समुपदेशाने, पारदर्शकपणे राबविलेल्या बदली प्रक्रियेचे कर्मचारी संघटनांकडून स्वागत होत आहे.

बदली झालेल्या विभागनिहाय कर्मचारी

ग्रामपंचायत आरोग्य

प्रशासकीय ८० प्रशासकीय ११९

विनंती ०७ विनंती २६

एकूण २३२

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disability Certificate Verification: दिव्यांग प्रमाणपत्राची टक्केवारी चाळीस टक्क्यांपेक्षा पेक्षा कमी

Summer Irrigation: उन्हाळी सिंचनातून हजारो हेक्टरला दिलासा

MLA Sanjay Puram: धान खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्याची मागणी

Radhakrishna Vikhe Patil: नांदूर मध्यमेश्वरला शेती नापीक होण्याच्या प्रश्नावर करणार उपाय

Minor Irrigation Tax: पाटबंधारे विभागाने तातडीने ‘मायनर कर’ वसुली थांबवावी

SCROLL FOR NEXT