Solapur ZP : सोलापूर जिल्हा परिषदेचे ४५ कोटींचे अंदाजपत्रक सादर

Zilla Parishad Budget : सोलापूर जिल्हा परिषदेचे २०२५-२६ या आर्थिक वर्षाचे ४५ कोटी ३ लाख ९० हजार रुपयांचे अंदाजपत्रक बुधवारी (ता..१९) विशेष सभेत सादर झाले.
Solapur ZP
Solapur ZP Agrowon
Published on
Updated on

Solapur News : सोलापूर जिल्हा परिषदेचे २०२५-२६ या आर्थिक वर्षाचे ४५ कोटी ३ लाख ९० हजार रुपयांचे अंदाजपत्रक बुधवारी (ता..१९) विशेष सभेत सादर झाले. त्यास प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी मंजुरी दिली. मागील योजना कायम ठेवताना, यंदा जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील महिला शेतकरी गटांना फवारणीसाठी ड्रोन देण्यात येणार आहेत.

तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी ई-ओपीडी, गर्भवतींना दवाखान्यात नेण्यासाठी आशांना खर्च, जनईत्री कार्ड, रुग्णांना युनिर्व्हस डिस्चार्ज कार्ड आणि शाळांमध्ये सौरऊर्जा यंत्र यासारख्या नावीन्यपूर्ण योजनांचा समावेश आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या अंदाजपत्रकात ३ कोटींची घट झाली असली, तरी ७ लाख ७३ हजारांचा शिलकी अंदाजपत्रक सादर झाला आहे.

Solapur ZP
Solapur ZP : ‘झेडपी’ स्वनिधीतून तीनशे तेहतीस शेतकऱ्यांना कडबाकुट्टीचा लाभ

निधी उपलब्धतेबाबत व्हर्च्युअल पर्सनल डिपॉझिट अकाउंट अॅडमिनिस्ट्रेटर प्रणाली सुरु झाल्यानंतर व्याजाच्या उत्पन्नात घट अपेक्षित आहे. त्यामुळे यंदा अंदाजपत्रक तयार करताना लेखा व वित्त विभागाने व्याजातून सुमारे १० कोटी कमी आणि गतवर्षी इतकेच म्हणजे १८ कोटी ५१ लाखांचे उत्पन्न गृहीत धरले आहे.

व्याजातून १८ कोटी ५१ लाख रुपये, उपकरातून १० कोटी रुपये, पाणीपट्टीतून १ कोटी २५ लाख रुपये, बांधकामकडील १ कोटी ४२ लाख रुपये उत्पन्न गृहीत धरून व आरंभीचे शिल्लक ८ कोटी १४ लाखांचे समावेश करून अंदाजपत्रक बनवले आहे.

Solapur ZP
Solapur ZP : सोलापूर जिल्हा परिषदेत ३१ लिपिकांना समुपदेशनाने पदोन्नती

या वेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मीनाक्षी वाकडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, प्रसाद मिरकले, प्रकल्प संचालक सुधीर ठोंबरे आदी उपस्थित होते.

कृषी विभागाला अधिकची तरतूद

कृषी विभागासाठी गतवर्षीच्या मूळ तरतुदीपेक्षा १४ लाखांची अधिकची तरतूद केली आहे. एकूण ३ कोटी ८६ लाखांची तरतूद केली आहे. महिला शेतकरी गटांना ड्रोन फवारणीसाठी ५० लाखांची तरतूद असून, त्याशिवाय शेतकऱ्यांना मधुमक्षिका पेटी देण्यात येणार आहे. तसेच कडबाकुट्टी, ताडपत्री, स्लरी, फिल्टरसाठी ९५ लाख रुपये, अभियांत्रिकी योजनेसाठी ९५ लाख, सिंचनासाठी पंप, तुषार सिंचनासाठी ७५ लाख रुपयांची तरतूद त्यात केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com