Agriculture Input Agrowon
ॲग्रो विशेष

Bogus Agriculture inputs : अनधिकृत कीडनाशके, खतांबाबत कारवाई शून्य

Bogus Fertilizer : काही भागात तपासणी करून पत्रके जारी करण्याचा कार्यक्रम कृषी विभागाने केला. ही बाब वगळता इतर भागात कुठेही कारवाईसत्र राबविलेले जात नसल्याची स्थिती आहे.

Team Agrowon

Jalgaon News : जिल्ह्यात अनधिकृत कापूस बियाण्याचा मोठा काळाबाजार झाला. आता अनधिकृत कीडनाशके व खतेही गुजरात, मध्य प्रदेशातून येत आहेत. यामुळे शेतकरी नाडला जात असून, भरारी पथके व कृषी विभाग नावालाच असल्याची स्थिती आहे.

काही भागात तपासणी करून पत्रके जारी करण्याचा कार्यक्रम कृषी विभागाने केला. ही बाब वगळता इतर भागात कुठेही कारवाईसत्र राबविलेले जात नसल्याची स्थिती आहे. बियाणे, कीडनाशके व खते पुरवठ्यासंबंधी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाचे नियंत्रण असते.

या विभागात मोहीम अधिकारी हे स्वतंत्र पद अनधिकृत बियाणे, खते यासंबंधी निर्माण केले आहे. पण या विभागाकडून कुठेही अवैध खते, कीडनाशकांबाबत कारवाई झालेली नाही. गेल्या वर्षीदेखील असाच प्रकार झाला.

यंदा कापूस बियाण्याचा लाखो रुपयांचा काळाबाजार चोपडा, यावल, रावेर, मुक्ताईनगर, जामनेर, अमळनेर आदी भागांत झाला. पण फक्त काही कारवायाच झाल्या. धुळे व नंदुरबारमार्गे जळगावपर्यंत बनावट कीडनाशके येत आहेत. बनावट खतेही गुजरातमधून धुळ्यातील शिरपूर, जळगावातील चोपडा, अमळनेर, यावल भागांत येत आहेत.

जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडे अनेक मुद्दे प्रलंबित आहेत. कमी मनुष्यबळ व ठोस तक्रारी नसल्याचे कारण पुढे करून टाळाटाळ केली जाते. जिल्हा परिषदेत सध्या प्रशासकराज आहे. अध्यक्ष व अन्य पदाधिकारी, सदस्य जळगावात नाहीत. प्रशासनाचे ‘हम करे सो कायदा’ असा प्रकार सुरू आहे. धुळे व नंदुरबारातही अशीच स्थिती आहे. कृषी योजनांसंबंधी फायली रखडल्या आहेत.

प्रशासनावर नियंत्रण नसल्याची स्थिती आहे. अनेक कीडनाशके, तणनाशकांचे दर वाढले आहेत. काही भागात कमी दर तर काही भागात अधिक दर अशी विक्री तणनाशके व कीडनाशकांची केली जात आहे. रावेर, यावल, चोपडा, मुक्ताईनगर, जामनेर, पाचोरा भागात खतांची टंचाई अधिक आहे.

पण कारवाई का केली जात नाही हा मुद्दा आहे. चढ्या दरात खतांच्या विक्रीची प्रकरणेही आहेत. पण तक्रारीची प्रतीक्षा कृषी यंत्रणा करीत आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. युरिया, दाणेदार सुपर फॉस्फेटसंबंधी टंचाई, लिंकिंगचा प्रकार सुरू आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय व अन्य यंत्रणाही कुठलीही दखल या समस्येबाबत घ्यायला तयार नाहीत, अशीही स्थिती आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: ‘त्या’ शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचा लाभ; कृषिमंत्री भरणे यांची विधानसभेत माहिती

Monsoon Rain: पुणे जिल्ह्यातील दहा तालुक्यांत पावसाचा जोर

Defective Groundnut Seeds: निकृष्ट भुईमूग बियाणे बदलून मिळणार; कृषिमंत्र्यांच्या निर्देशाने शेतकऱ्यांना दिलासा

Dimbhe Dam Reservoir: डिंभे धरणक्षेत्रात ६७ मिमी पाऊस; पूर्व भागातील शेतकरी अजूनही जोरदार सरींच्या प्रतीक्षेत

Monsoon Alert: मॉन्सूनच्या पावसाला दमदार सुरुवात

SCROLL FOR NEXT