Soybean Mosaic Disease Agrowon
ॲग्रो विशेष

Soybean Yellow Mosaic : जिल्ह्यातील सोयाबीनवर पिवळ्या मोझॅकचे संकट

Soybean Disease : सप्टेंबरमध्ये झालेला पाऊस, तापमानातील बदल तसेच इतर काही कारणांमुळे राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये सोयाबीनवर पिवळा मोझॅक, मूळकुज आणि खोडकुज या विषाणुजन्य व बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे.

Team Agrowon

Solapur : राज्यातील सोयाबीनच्या पिकावर पिवळा मोझॅक हा विषाणूजन्य रोग आला असून खोडकूज व मूळकुज या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झालेल्या क्षेत्राचे त्वरित पंचनामे करण्याचे आदेश राज्याचे उपसचिव संजय धारूरकर यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

त्यानुसार निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे यांनी सर्व तहसीलदार, कृषी अधिकारी व गटविकास अधिकारी यांना त्वरित पंचनामे करून छायाचित्रासह अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

यंदाच्या खरीप हंगामामध्ये पावसाचा मोठा खंड पडला असून सप्टेंबरमध्ये झालेला पाऊस, तापमानातील बदल तसेच इतर काही कारणांमुळे राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये सोयाबीनवर पिवळा मोझॅक, मूळकुज आणि खोडकुज या विषाणुजन्य व बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे.

नुकसान झालेल्या क्षेत्रामध्ये विमा संरक्षित क्षेत्राचा अंतर्भाव असल्यामुळे विम्याची मदत वेळेत करणे शक्य व्हावे आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळावा म्हणून त्वरित संयुक्त पंचनामे करावेत, असा निर्णय ३ ऑक्टोबरच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहेत.

त्यानुसार उपसचिव संजय धारुरकर यांनी सर्व बाधित जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले होते. त्यानुसार शुक्रवारी (ता.१३) निवासी उपजिल्हाधिकारी यांनी सर्व तालुक्यातून अहवाल मागविला आहे. तलाठी, कृषी सहायक व ग्रामसेवक या ग्रामस्तरीय समितीने त्वरित पंचनामे करावेत व अहवाल व निधी मागणीचा प्रस्ताव पाठवावा, असे या आदेशात नमूद केले आहे.

ठळक बाबी
मदत, पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून येणार निधी
नाशिक, पुणे, छत्रपती संभाजी नगर, अमरावती व नागपूर विभागात प्रार्दुभाव जिल्ह्यातील बार्शी, मोहोळ, उत्तर सोलापूर व माढा तालुक्यात जास्त सोयाबीन तापमानातील बदल व पावसातील खंड यामुळे रोगाचा प्रार्दुभाव

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT