Yellow Mosaic On Rajma Agrowon
ॲग्रो विशेष

Soybean Yellow Mosaic : ‘पिवळा मोझॅक’चा सोयाबीनच्या ४९ हजार हेक्टरला फटका

Soybean Disease : या वर्षाच्या खरीप हंगामात सोयाबीन पिकावर ‘पिवळा मोझॅक’चा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादनाला मोठा फटका बसला.

 गोपाल हागे

Akola News : या वर्षाच्या खरीप हंगामात सोयाबीन पिकावर ‘पिवळा मोझॅक’चा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादनाला मोठा फटका बसला. या नुकसानाची संयुक्त पंचनामे करण्याबाबत प्रशासनाला आदेश देण्यात आले होते. याची माहिती संकलित झाली आहे.

जिल्ह्यात सुमारे ४९ हजार हेक्टरवर प्रादुर्भाव झाल्याचे समोर आले. या बाबतचा अंतिम अहवाल तयार झाल्यावर शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठीचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

जिल्ह्यात खरीप हंगामात सोयाबीनची २ लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर लागवड झाली होती. या पिकाला सुरवातीला कमी पावसाचा फटका बसला. त्यानंतर पिवळा मोझॅक सर्वत्र आला होता. हे संकट दर दिवसाला वाढत होते.

त्याचा परिणाम सोयाबीनच्या उत्पादनावर झाला. या प्रादुर्भावाचा प्रशासनाने सर्वे करीत माहिती संकलित केली. त्यानुसार एकूण लागवडीच्या सुमारे २५ टक्के क्षेत्र या किडरोगांनी ग्रस्त झालेले होते.

सोयाबीनला प्रामुख्याने यंदा पिवळा मोझॅक, खोड व मूळ कूज या रोगांनी पोखरले. उत्पादित सोयाबीनचा दर्जाही खालावलेला आहे. या नुकसानाची मदत शेतकऱ्यांना मिळावी, या साठी एकत्रित अहवाल पाठविला जाणार आहे.

तालुकानिहाय बाधित क्षेत्र (हेक्टर)

बाळापूर... ३ हजार ५०८

पातूर...११ हजार ३०२

बार्शीटाकळी...१२ हजार १४५

मूर्तिजापूर...२२ हजार ४५६

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

EL Nino 2026 : तेलंगणामध्ये पावसाची तूट; केंद्र सरकारकडे २० हजार कोटींच्या मदत पॅकेजची मागणी

Weekly Weather: उघडिपीसह अल्प पावसाची शक्यता

Delhi University Election: शितावरून भाताची परीक्षा

Maharashtra Drought Situation: दुष्काळदाहातील बेपर्वाई

Sangli APMC: सांगली बाजार समिती त्रिभाजनासाठी मुदतवाढ

SCROLL FOR NEXT