Maize  Agrowon
ॲग्रो विशेष

Maize Crop : ‘पिवळे सोने’ मका बनले जिल्ह्याचे प्रमुख पीक

Maize Production : मागील चार ते पाच वर्षापासून कांदा अन् द्राक्षांचा जिल्हा आता मकाचा जिल्हा बनला आहे. यंदाही जिल्ह्यात तब्बल ४६ टक्के क्षेत्रात एकट्या मकाचे पीक शेतकऱ्यांनी घेतले आहे.

Team Agrowon

Nashik News : मागील चार ते पाच वर्षापासून कांदा अन् द्राक्षांचा जिल्हा आता मकाचा जिल्हा बनला आहे. यंदाही जिल्ह्यात तब्बल ४६ टक्के क्षेत्रात एकट्या मकाचे पीक शेतकऱ्यांनी घेतले आहे. मागणी असलेल्या पिवळ्या सोन्याला अर्थात मका पिकाला जिल्ह्यात शेतकऱ्यांची सर्वाधिक पसंती मिळत आहे.

कमी भांडवल, मर्यादित श्रम, अधिक उत्पन्न देणारे पीक आणि पीक काढणीनंतर पुन्हा रब्बीत दुसरे पीक घेण्याची शाश्वती यामुळे जिल्ह्यातील दहा तालुक्यात मका शेतकऱ्यांचे पसंतीचे पीक बनत आहे. जिल्ह्यातील पीक पॅटर्न गेल्या पाच वर्षापासून बदलत असून, बाजरी,डाळी व तेलबियांचे क्षेत्र निम्य्याने घटून त्याची जागा मकासह कांदा व भाजीपाला पिकाने घेतली आहे.

खरिपातील पाच लाख १६ हजार हेक्टरपैकी तब्बल २ लाख ३८ हेक्टरवर मकाच्या पिकाखाली गुंतवले आहे. कमी खर्चात मका हा उत्तम पर्याय ठरत आहे. पोल्ट्री व स्टार्च उद्योगामुळे मक्याची मागणी वाढ कायम आहे.

वाढलेल्या मागणीमुळे मागीलवर्षी तर खासगी बाजारात दोन हजार ३०० रुपयांच्या आसपास दर पोहोचले होते. केंद्र शासनाने देखील १३२ रुपये दर वाढ करत यावर्षी २ हजार २२५ रुपये हमीभाव निश्चित केल्याने मका पीक परवडणारे पीक म्हणून शेतकऱ्यांकडून पसंती मिळत आहे.

जिल्ह्यातील मक्याचे क्षेत्र (हेक्टरमध्ये)

तालुका पेरणी टक्के

येवला ४५१५३ १२८

मालेगाव ४२२१० १०८

सटाणा ३६६६० १०५

कळवण १६९५८ ९७

देवळा २०३५४ १२७

नांदगाव ३६५४४ १२३

नाशिक ४१५ ३०

दिंडोरी २२२ ७९

निफाड १०१०४ ८०

सिन्नर १५८२३ १४०

चांदवड १४००७ ७१

एकूण २३८४५० ११०

पोल्ट्री, स्टार्च उद्योगामुळे अच्छे दिन!

पाऊस कमी असो की जास्त मात्र मक्याचे पीक निघतेच. हे पीक घेऊन रब्बीतील गव्हासह उन्हाळ कांद्याचेही पीक घेता येते. बियाण्याच्या किमती मर्यादित फक्त दोन-तीन फवारण्या, मर्यादित खते,आंतरमशागतीसह काढणीचा यंत्रामुळे येणारा अल्प खर्च,जनावरांना चारा तसेच बिट्या झाकून ठेवत केव्हाही मका तयार करून विक्री करता येते.शिवाय भावही परवडणारा मिळत असल्याने सर्वाधिक मकाला पसंती मिळत आहे.

विशेष म्हणजे मकाचे भाव १००-१५० रुपये कमी जास्त होतात.पण,भाव पडले असे कधीच होत नाही. त्यामुळे हे पीक भरवशाचे झाले आहे.सर्वाधिक लागवड येवला तालुक्यात झाली असून त्याखालोखाल मालेगावमध्ये मका घेतली आहे. बागलाण व नांदगावमध्ये मका खाली क्षेत्र गुंतले आहे.दहा तालुके मक्याकडे वळले असून,वर्षागणिक क्षेत्र वाढत आहे.

पोल्ट्रीचे प्रमाण वाढले आहे. परवडणारा भाव व कमी उत्पादन खर्च, साठवणूक करून केव्हाही पीक विक्रीची पर्याय अन् भावातील सातत्य यामुळे शेतकरी मक्याला प्रथम स्थान देत आहेत. जिल्ह्यातील मका युक्रेन, मलेशियासह तामिळनाडूपर्यंत जातो. शेतकऱ्यांसाठी चार पैसे देणारे नगदी पीक म्हणून मक्याला पसंती मिळताना दिसते.
हितेंद्र पगार, मंडळ कृषी अधिकारी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Baramati Agriculture Development : दुबईतील परिषदेत बारामतीतील उपक्रमाची दखल

Ind-US Trade War : डोनाल्ड ट्रम्प यांचे करयुद्ध आणि भारत

Heavy Rainfall: राज्यात मुसळधार पावसाचा तडाखा; नांदेडमध्ये पूरस्थिती, मुंबईसह अनेक जिल्ह्यांत संततधार

Deforestation In India : इंग्रज, वन विभाग आणि जंगलांचा ऱ्हास

Healthy Tiffin: व्यस्त दिनचर्येतही आरोग्यदायी टिफिनचा सोपा पर्याय

SCROLL FOR NEXT