Kolhapur Rain Alert agrowon
ॲग्रो विशेष

Kolhapur Rain Alert : कोल्हापुरात पावसाचा येलो अलर्ट, पुढचे दोन दिवस जोरदार पावसाची शक्यता

sandeep Shirguppe

Kolhapur Rain : कोल्हापुरात मागच्या ८ दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे मागच्या २४ तासांत जिल्ह्यात एकूण ९.९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पुढचे २ दिवस हा पाऊस राहणार असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. रविवार (ता.२०) पर्यंत विजांच्या कडकडाटासह येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. भात, सोयाबीन आणि भूईमुगाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात गगनबावड्यात सर्वाधिक १७.६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्यापाठोपाठ करवीर १७.५. शाहूवाडी १६, राधानगरी १३.५. चंदगड १०.६, पन्हाळा ९.६. हातकणंगले ८.१, कागल ७.२, शिरोळ ६.७, भुदरगड ४.७, आजरा ३.६, गडहिंग्लज २.८ मिमी पावसाची नोंद झाली.

सोयाबीन, भात कापणीत व्यत्यय

परतीच्या पावसामुळे भात कापणीच्या कामामध्ये अडथळा निर्माण होत आहे. पावसाने अनेक ठिकाणच्या भाताचे व पिंजराचे मोठे नुकसान झाले आहे. यावर्षी भात पिकाची उगवण समाधानकारक झाली आहे. परंतु, गेले चार दिवस परिसरात परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांचा सुगीचा हंगाम अडचणीत आला आहे.

ऐन भात कापणीच्या काळात पडत असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडत आहे. पावसाने अनेक ठिकाणी भात व पिंजराचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरीवर्गात अस्वस्थतेचे वातावरण असून पाऊस थांबण्याची प्रतीक्षा करीत आहे. दरम्यान, पावसामुळे परिसरातील अनेक ठिकाणच्या सोयाबीन पिकाचेही मोठे नुकसान झाले आहे.

सायंकाळी पडणारा पाऊस डोकेदुखी

शेतकऱ्यांची काढणी, मळणीची धांदल सुरू असतानाच दररोज सायंकाळी पडणारा पाऊस डोकेदुखी ठरला आहे. त्यामुळे काढणीस आलेल्या पिकांचे नुकसान होत आहे. हातातोंडाशी आलेल्या पिकाचे डोळ्यांदेखत होणाऱ्या नुकसानीने शेतकरी हतबल झाला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

MSP Procurement : शिराढोणला सोयाबीन हमीभाव केंद्र सुरू होणार

Crop Damage : ‘ओझरखेड’च्या आवर्तनाने पिके पाण्याखाली

Crop Damage : पावसामुळे सोयाबीनसह तुरीचे पीक पाण्यात

Soil Erosion : जमिनीची धूप थांबविली तरच भविष्यात शाश्‍वत उत्पादन

Soybean Harvesting : सोयाबीन कापणीला एकरी सहा हजारांचा खर्च

SCROLL FOR NEXT