Farm Pond Agrowon
ॲग्रो विशेष

CM Agriculture Irrigation : मुख्यमंत्री कृषी सिंचन अंतर्गत १५१ शेततळ्यांची कामे पूर्ण

Farm Pond Work Update : मुख्यमंत्री शाश्‍वत कृषी सिंचन योजनांतर्गत सोमवार (ता. ८) पर्यंत परभणी जिल्ह्यात १०४ व हिंगोली जिल्ह्यात ४७ शेततळ्यांची कामे पूर्ण झाली आहेत.

Team Agrowon

Parbhani News : मुख्यमंत्री शाश्‍वत कृषी सिंचन योजनांतर्गत सोमवार (ता. ८) पर्यंत परभणी जिल्ह्यात १०४ व हिंगोली जिल्ह्यात ४७ शेततळ्यांची कामे पूर्ण झाली आहेत. त्याबद्दल परभणी जिल्ह्यात ६८ लाख ७१ हजार रुपये, तर हिंगोली जिल्ह्यात २८ लाख ३५ हजार रुपये अनुदान वाटप करण्यात आले आहे.

मुख्यमंत्री शाश्‍वत कृषी सिंचन योजनांतर्गत परभणी जिल्ह्यात ४२० वैयक्तिक शेततळ्याचे उद्दिष्ट आहे. या योजनेच्या लाभासाठी सोडतीसाठी ३ हजार ८४१ शेतकऱ्यांच्या अर्जाची निवड करण्यात आली होती. त्यापैकी ५५ अर्ज नाकारण्यात आले, तर ३ हजार २२८ अर्ज रद्द करण्यात आले. ५५८ अर्ज प्रक्रियेत आहेत.

शेततळे पूर्ण केलेल्या ११० शेतकऱ्यांना अनुदान वितरणास मंजुरी देण्यात आली त्यापैकी १०४ लाभार्थींना ६८ लाख ८१ हजार रुपये अनुदान वितरित करण्यात आले. हिंगोली जिल्ह्यात २८० शेततळ्यांचे उद्दिष्ट आहे. सोडतीसाठी २ हजार ७७१ शेतकऱ्यांच्या अर्जाची निवड करण्यात आली. त्यापैकी ४९ अर्ज नाकारण्यात आले.

तर २ हजार ३८ अर्ज रद्द करण्यात आले. एकूण ६८४ अर्ज प्रक्रियेत आहेत. पूर्ण झालेल्या ४७ शेततळ्यांच्या लाभार्थ्यांना २८ लाख ३७ हजार रुपये अनुदान वितरित करण्यात आले. कृषी विभागामार्फत राज्यात नोव्हेंबर २०२२ पासून मुख्यमंत्री शाश्‍वत कृषी सिंचन योजना राबविली जात आहे. शेततळ्याच्या माध्यमातून पाणीसाठा निर्माण केल्यास पावसाच्या खंड काळात, खरीप पिके तसेच फळबागांच्या संरक्षित सिंचनासाठी पाणी उपलब्ध होते.

दुष्काळी स्थितीत शेततळ्यातील पाणी उपयोगी येते. या योजनेअंतर्गत ३० बाय ३० मीटर आकाराच्या शेततळ्याच्या खोदकामासाठी ७५ हजार रुपये, तर अस्तरीकरणासाठी ७५ हजार रुपये असे एकूण १ लाख ५० हजार रुपयांपर्यंत अनुदान आहे. जिल्हास्तरावर काम पूर्ण झाल्यानंतर १५ दिवसांच्या आत लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर अनुदानाची रक्कम जमा करण्यात येते.

यापूर्वी शेततळे योजनेचा लाभ न घेतलेल्या शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर सीएससी केंद्रामार्फत किंवा वैयक्तिकरीत्या ऑनलाइन नोंद करून या योजनेचा लाभ घ्यावा अधिक माहितीसाठी संबंधित कृषी सहायक, तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहिणींना दोन हप्ते एकदम?; मार्च, एप्रिलचा ७३० कोटी निधी मंजूर

Soybean Seed Treatment: कमी पावसाच्या संकटात सोयाबीन लागवडीपूर्वीचे नियोजन कसे करावे?

Papaya Cultivation: पपई लागवड क्षेत्र १५ हजार हेक्टरवर पोहोचण्याचा अंदाज

Agrowon Podcast: कापसातील तेजी कायम; सोयाबीनमध्ये सुधारणा, कांदा दबावातच तर हळद-हरभरा स्थिर

Water Levels Drop: उन्हामुळे जलसाठ्यात झपाट्याने घट

SCROLL FOR NEXT